सीधे मुख्य सामग्री पर जाएं

'एव्हेंडस वेल्थ-हुरुन इंडिया युथ सिरीज २०२६' सादर

'यू३५' यादीत देशभरात व्यवसाय उभारणाऱ्या १८० तरुण लीडर्सचा गौरवण्यात आले

मुंबई। आपल्या भागीदारीच्या दुसऱ्या वर्षात पदार्पण करत, एव्हेंडस वेल्थ आणि हुरुन इंडिया यांनी 'एव्हेंडस वेल्थ – हुरुन इंडिया युथ सिरीज २०२६' सादर केली आहे. या मालिकेतील 'यू३५' यादीत देशभरात व्यवसाय उभारणाऱ्या आणि ते यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या १८० तरुण लीडर्सचा गौरव करण्यात आला आहे. या यादीची ही दुसरी आवृत्ती असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत १६% मोठी झाली आहे. २०२५ मध्ये या यादीत १५५ उद्योजक सामील होते, जे देशभरात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या तरुण बिझनेस लीडर्सची वाढती संख्या दर्शवते.

उमंग पपनेजा, एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमन आणि सीईओ, एव्हेंडस वेल्थ मॅनेजमेंट म्हणाले,"व्यवसायाची दिशा ठरवणारे निर्णय कधीही केवळ त्या व्यवसायापुरते मर्यादित नसतात. उद्योजक भांडवलाचा कसा वापर करतात, वाढीचा मार्ग कसा निवडतात आणि जोखमीचे व्यवस्थापन कसे करतात, याचा थेट परिणाम त्यांच्या गुंतवणुकीवर, कुटुंबांवर आणि त्यांनी निर्माण केलेल्या वारशावर होतो. ही 'यू३५' यादी हे महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या तरुण चेहऱ्यांची एक प्रभावी झलक दाखवते, तसेच भारताच्या विकासाचा पुढचा टप्पा घडवण्याचा त्यांचा आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा यातून स्पष्ट होते. एव्हेंडसमध्ये आम्ही उद्योजकांच्या व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत काम करतो मग ते व्यवसाय वाढवण्यासाठी निधी उभारणे असो, वित्तीय बाजारपेठांपर्यंत पोहोचणे असो, किंवा पिढ्यानपिढ्या संपत्तीचे व्यवस्थापन आणि हस्तांतरण करणे असो. एव्हेंडस वेल्थमध्ये आमचा दृष्टिकोन बहुआयामी आहे, कारण संपत्ती म्हणजे केवळ गुंतवणूक नसून त्यामध्ये व्यावसायिक हितसंबंध, कौटुंबिक प्राधान्यक्रम आणि येणाऱ्या पिढ्यांच्या आकांक्षांचाही समावेश होतो, असे आम्ही मानतो. हे तरुण उद्योजक भारतीय उद्योजकतेचे भविष्य घडवत असल्यामुळे, ही पुढची पिढी निधी, वाढ आणि संपत्ती निर्मितीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल."

या वर्षी या गटातील उद्योजकांची संख्या १६ टक्क्यांनी वाढून १८० झाली आहे, ज्यांच्या कंपन्यांचे एकूण मूल्यांकन ४८ लाख कोटी रुपये आहे. हे मूल्यांकन गेल्या वर्षीच्या तुलनेत २३% जास्त आहे. या यादीत ७१% पहिल्या पिढीतील उद्योजक आहेत, तर एआय आणि मशीन लर्निंगशी संबंधित फाउंडर्सची संख्या ३ वरून १२ वर पोहोचली आहे, म्हणजेच यात चार पटीने वाढ झाली आहे. हा बदल भारतात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या नवीन उद्योगांच्या निर्मितीची साक्ष देतो.

हुरुन इंडियाचे फाउंडर आणि चीफ रिसर्चर अनस रहमान जुनैद म्हणाले,"एव्हेंडस वेल्थ हुरुन इंडिया यू३५ लिस्ट २०२६ देशाच्या अर्थव्यवस्थेतील तरुण उद्योजकांचे मोठे योगदान स्पष्टपणे अधोरेखित करते. या यादीत अशा १८० लीडर्सचा समावेश आहे, ज्यांचे उद्योग ५.८८ लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देतात आणि यातील ३७ कंपन्यांचे मूल्यांकन १ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. 'यू३०' यादी आपल्याला व्यवसायाची सुरुवात कुठून होते हे सांगते, तर 'यू३५' यादी ते व्यवसाय किती मोठे होऊ शकतात हे दाखवते. आता अर्थव्यवस्थेसाठी पुढची कसोटी ही असेल की, ही वाढ सातत्याने उत्पादकता, नफा आणि कुशल रोजगाराच्या निर्मितीमध्ये बदलते की नाही. हा तरुण गट भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक अत्यंत मजबूत आणि मोठा पाया तयार करत आहे. भारताचे आर्थिक भविष्य घडवणाऱ्या तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ही भागीदारी अशीच पुढे नेण्यासाठी आम्ही एव्हेंडस वेल्थचे मनापासून आभार मानतो."

या यादीची रचना अनेक रंजक गोष्टी समोर आणते. या गटामध्ये ७१% पहिल्या पिढीतील फाउंडर्स आहेत, तर पुढच्या पिढीतील ५३ लीडर्स पूर्वीपासून सुरू असलेले आपले कौटुंबिक व्यवसाय नव्या रूपाने पुढे नेत आहेत. नवीन उद्योग सुरू होणे आणि कौटुंबिक व्यवसायांमध्ये होणारे बदल, या दोन्हीमुळे भारतात उद्योजकतेचा विस्तार सातत्याने होत आहे. स्पेस, डिफेन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या क्षेत्रांसोबतच या यादीत एआय आणि मशीन लर्निंग शी जोडलेल्या उद्योजकांची संख्या चार पटीने वाढली आहे. स्वतःचे तंत्रज्ञान व उत्पादने तयार करणे, परदेशी बाजारपेठेत ओळख निर्माण करणे आणि आपल्या कल्पकतेचा देशाला जास्तीत जास्त फायदा मिळवून देणे, ही तरुण उद्योजकांची मोठी महत्त्वाकांक्षा यातून दिसून येते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६, मुग्धा गोडसे हिने पुरस्कार प्रदान केले

मुंबई: रिअल्टी क्वार्टर, एक अग्रगण्य रिअल इस्टेट मीडिया, प्रकाशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने, आपला ९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६ यशस्वीरित्या आयोजित केला. उद्योग क्षेत्रातील अनुभवी पवन चौहान यांनी सुरू केलेल्या या वार्षिक प्रमुख कार्यक्रमात, कंपनीच्या प्रकाशनाची नऊ वर्षे आणि प्रॉपर्टी एक्स्पो व गुंतवणूकदार मेळाव्यांच्या आयोजनातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १७ वर्षांच्या उपस्थितीचा उत्सव साजरा करण्यात आला. या भव्य सोहळ्याची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन समारंभाने झाली, ज्याला श्री. चौहान, कंपनी संचालक शाइस्ता अन्सारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. असोसिएट डायरेक्टर सिद्धांत ठाकूर यांनी सूत्रसंचालन केलेली "बी२बी आणि बी२सी साठी एकात्मिक दृष्टिकोन आणि रिअल इस्टेटचा दृष्टिकोन २०२६" या विषयावरील माहितीपूर्ण पॅनल चर्चा हे या सायंकाळचे मुख्य आकर्षण होते. पॅनेलमध्ये सुहेल खंडवाणी (खंडवाणी ग्रुप), डॉ. अजय एल. दुबे (मीरा-भयंदर प्रॉपर्टी डीलर्स वेल्फेअर असोसिएशन), चिंतन वसानी (वाइझबिझ रियल्टी), संजीव गुप्ता...

स्वस्त कर्ज, विमा आणि पेन्शनही वित्तीय समावेशनाचा भाग असावेत: राज्यपाल

३० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी बँकिंग क्षेत्र बनणार मुख्य आधार  मुंबई: "वित्तीय समावेशन हे केवळ बँक खाती उघडणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यापुरते मर्यादित न राहता, विशेषतः ग्रामीण कुटुंबे, महिला आणि लहान उद्योजकांसाठी परवडणारे कर्ज, विमा आणि पेन्शन कवच सुनिश्चित करण्यापर्यंत विस्तारले पाहिजे," असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत केले. 'असोचॅम'च्या नॅशनल कौन्सिल फॉर बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर लेंडिंग कंपनीजच्या २१ व्या वार्षिक शिखर परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. "रेझिलियन्स, रीइन्व्हेंशन अँड इंडियाज राइज" या संकल्पनेखाली आयोजित या परिषदेत भारताच्या विकास आकांक्षांना पाठबळ देण्यात वित्तीय संस्थांच्या भूमिकेवर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा पुढे म्हणाले, "बँका आणि वित्तीय संस्था या केवळ कर्ज आणि वित्तीय सेवा पुरवठादार नाहीत; तर त्या राष्ट्र उभारणीतील महत्त्वपूर्ण भागीदार आहेत. तंत्रज्ञान बँकिंग क्षेत्राला नवे रूप दे...

जगद्गुरु शंकराचार्य श्री त्रिकालभवंत सरस्वती जी महाराज यांच्या हस्ते राजयोगी बी.के. हरिलाल भानुशाली यांचा सत्कार

मुंबई। राजस्थानातील माउंट अबू येथे ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या अखिल भारतीय संत संमेलनाचे उद्घाटन सत्र ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आनंद सरोवर परिसरात आयोजित करण्यात आले होते. या भव्य कार्यक्रमात भारतातील शंकराचार्य, महंत, संन्यासी, संत आणि आध्यात्मिक नेते उपस्थित होते, ज्यांनी या कार्यक्रमाची आध्यात्मिक प्रतिष्ठा वाढवली. त्याच प्रसंगी, गॉडलीवुड स्टुडिओ (ब्रह्माकुमारी, माउंट अबू) चे कार्यकारी संचालक राजयोगी बी.के. हरिलाल भानुशाली यांना जगद्गुरु शंकराचार्य श्री त्रिकालभवंत सरस्वती जी महाराज यांनी कौतुकाचे पत्र प्रदान केले. हा सन्मान सनातन धर्माच्या जतन, प्रसार आणि सेवेसाठी ब्रह्मा कुमारींच्या समर्पणाचे प्रतीक आहे. प्रयागराज महाकुंभ मेळा २०२५ च्या शुभ प्रसंगी, गॉडलीवुड स्टुडिओने कुंभस्थळी एक भव्य स्टुडिओ उभारला असल्याचे ज्ञात आहे. या स्टुडिओद्वारे, कुंभमेळ्यादरम्यान आयोजित केलेले सर्व सेवात्मक उपक्रम आणि आध्यात्मिक कार्यक्रम 'पीस न्यूज' द्वारे 'पीस ऑफ माइंड' टीव्ही चॅनेलवर प्रसारित केले जात होते, ज्यामुळे भारत आणि परदेशातील लाखो भाविक...