सीधे मुख्य सामग्री पर जाएं

निवम ऑर्थोपेडिक्स - सूर्या हॉस्पिटल्स सोबत सहयोग करार


मुंबई: ऑर्थोपेडिक सर्जन्स डॉ. निलेन शाह आणि डॉ. मनन शाह यांनी स्थापन केलेल्या निवम ऑर्थोपेडिक्सने मुंबई येथे विशेष ऑर्थोपेडिक केंद्रांचे नेटवर्क उभारण्यासाठी सूर्या हॉस्पिटल सोबत सहयोग केला आहे. सांताक्रूझ आणि चेंबूर येथील केंद्रे आधीच कार्यान्वित झाली आहेत, तसेच सांताक्रूझ मधील प्रमुख केंद्राचे औपचारिक उद्घाटन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे. सर्वसमावेशक आणि रुग्णकेंद्रित उपचार देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या केंद्रांमध्ये आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट्स सेवांचे उत्तम संयोजन आहे. वर्षाच्या अखेरीस कांदिवलीमध्ये एका केंद्रासह या नेटवर्कचा आणखी विस्तार होण्याची अपेक्षा आहे, ज्यानंतर दक्षिण मुंबईतील केंद्र सुरू करण्यात येईल.

हा सहयोग निवमचे विशेष ऑर्थोपेडिक कौशल्य आणि सूर्या हॉस्पिटल्सच्या प्रस्थापित वैद्यकीय पायाभूत सुविधा व बहुविद्याशाखीय क्षमतेला एकत्र आणतो. ही केंद्रे सांध्यांचे विकार, मणक्याचे आजार, क्रीडा दुखापती आणि ऑर्थोपेडिक ट्रामा यासाठी उपचार देतील, ज्यामध्ये प्राथमिक व गुंतागुंतीचे सांधे रोपण, रिव्हिजन प्रक्रिया, तसेच रोबोटिक-साहाय्यित आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

तपासणी आणि उपचार नियोजनापासून शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेदरम्यान व शस्त्रक्रियेनंतर काळजी, फिजिओथेरपी आणि पुनर्वसनापर्यंत रुग्णाच्या संपूर्ण प्रवासात हे उपचार उपलब्ध असतील. सखोल तपासणीनंतर केवळ वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाईल. तसेच ही केंद्रे विना-शस्त्रक्रिया उपचारांसाठीही सक्षम विभाग चालवतील. रुग्णाची योग्य निवड, सुरक्षितता आणि बरे होण्यावर भर देऊन उपचारांचे पर्याय वैयक्तिक वैद्यकीय गरजांनुसार निश्चित केले जातील.

डॉ.भूपेंद्र एस.अवस्थी, फाऊंडर-चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, सूर्या हॉस्पिटल्स म्हणाले,"निवम ऑर्थोपेडिक्ससोबत आमचा सहयोग मुंबईतील सूर्याच्या सर्व केंद्रांमध्ये अतिरिक्त विशेष ऑर्थोपेडिक कौशल्य घेऊन येत आहे. पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक उपचारांसाठी सूर्या आधीपासून ओळखले जाते, तसेच सांधे रोपणासह सांधे व ऑर्थोपेडिक समस्यांमध्ये महिलांचे प्रमाण जवळपास ८० टक्‍के असल्याने आमच्या विशेष सेवांचा हा स्वाभाविक विस्तार आहे. डॉ.निलेन शाह आणि डॉ. मनन शाह यांनी सांधे रोपण आणि सर्वसमावेशक ऑर्थोपेडिक उपचारांचे केंद्रित मॉडेल विकसित केले आहे. एकत्रित, आमचा या सेवा आमच्या हॉस्पिटल्समध्ये अधिक सहज उपलब्ध करण्याचा आणि उपचारांच्या व बरे होण्याच्या प्रत्येक टप्प्यावर रुग्णांना सहकार्य करण्याचा मनसुबा आहे."

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६, मुग्धा गोडसे हिने पुरस्कार प्रदान केले

मुंबई: रिअल्टी क्वार्टर, एक अग्रगण्य रिअल इस्टेट मीडिया, प्रकाशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने, आपला ९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६ यशस्वीरित्या आयोजित केला. उद्योग क्षेत्रातील अनुभवी पवन चौहान यांनी सुरू केलेल्या या वार्षिक प्रमुख कार्यक्रमात, कंपनीच्या प्रकाशनाची नऊ वर्षे आणि प्रॉपर्टी एक्स्पो व गुंतवणूकदार मेळाव्यांच्या आयोजनातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १७ वर्षांच्या उपस्थितीचा उत्सव साजरा करण्यात आला. या भव्य सोहळ्याची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन समारंभाने झाली, ज्याला श्री. चौहान, कंपनी संचालक शाइस्ता अन्सारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. असोसिएट डायरेक्टर सिद्धांत ठाकूर यांनी सूत्रसंचालन केलेली "बी२बी आणि बी२सी साठी एकात्मिक दृष्टिकोन आणि रिअल इस्टेटचा दृष्टिकोन २०२६" या विषयावरील माहितीपूर्ण पॅनल चर्चा हे या सायंकाळचे मुख्य आकर्षण होते. पॅनेलमध्ये सुहेल खंडवाणी (खंडवाणी ग्रुप), डॉ. अजय एल. दुबे (मीरा-भयंदर प्रॉपर्टी डीलर्स वेल्फेअर असोसिएशन), चिंतन वसानी (वाइझबिझ रियल्टी), संजीव गुप्ता...

स्वस्त कर्ज, विमा आणि पेन्शनही वित्तीय समावेशनाचा भाग असावेत: राज्यपाल

३० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी बँकिंग क्षेत्र बनणार मुख्य आधार  मुंबई: "वित्तीय समावेशन हे केवळ बँक खाती उघडणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यापुरते मर्यादित न राहता, विशेषतः ग्रामीण कुटुंबे, महिला आणि लहान उद्योजकांसाठी परवडणारे कर्ज, विमा आणि पेन्शन कवच सुनिश्चित करण्यापर्यंत विस्तारले पाहिजे," असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत केले. 'असोचॅम'च्या नॅशनल कौन्सिल फॉर बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर लेंडिंग कंपनीजच्या २१ व्या वार्षिक शिखर परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. "रेझिलियन्स, रीइन्व्हेंशन अँड इंडियाज राइज" या संकल्पनेखाली आयोजित या परिषदेत भारताच्या विकास आकांक्षांना पाठबळ देण्यात वित्तीय संस्थांच्या भूमिकेवर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा पुढे म्हणाले, "बँका आणि वित्तीय संस्था या केवळ कर्ज आणि वित्तीय सेवा पुरवठादार नाहीत; तर त्या राष्ट्र उभारणीतील महत्त्वपूर्ण भागीदार आहेत. तंत्रज्ञान बँकिंग क्षेत्राला नवे रूप दे...

जगद्गुरु शंकराचार्य श्री त्रिकालभवंत सरस्वती जी महाराज यांच्या हस्ते राजयोगी बी.के. हरिलाल भानुशाली यांचा सत्कार

मुंबई। राजस्थानातील माउंट अबू येथे ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या अखिल भारतीय संत संमेलनाचे उद्घाटन सत्र ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आनंद सरोवर परिसरात आयोजित करण्यात आले होते. या भव्य कार्यक्रमात भारतातील शंकराचार्य, महंत, संन्यासी, संत आणि आध्यात्मिक नेते उपस्थित होते, ज्यांनी या कार्यक्रमाची आध्यात्मिक प्रतिष्ठा वाढवली. त्याच प्रसंगी, गॉडलीवुड स्टुडिओ (ब्रह्माकुमारी, माउंट अबू) चे कार्यकारी संचालक राजयोगी बी.के. हरिलाल भानुशाली यांना जगद्गुरु शंकराचार्य श्री त्रिकालभवंत सरस्वती जी महाराज यांनी कौतुकाचे पत्र प्रदान केले. हा सन्मान सनातन धर्माच्या जतन, प्रसार आणि सेवेसाठी ब्रह्मा कुमारींच्या समर्पणाचे प्रतीक आहे. प्रयागराज महाकुंभ मेळा २०२५ च्या शुभ प्रसंगी, गॉडलीवुड स्टुडिओने कुंभस्थळी एक भव्य स्टुडिओ उभारला असल्याचे ज्ञात आहे. या स्टुडिओद्वारे, कुंभमेळ्यादरम्यान आयोजित केलेले सर्व सेवात्मक उपक्रम आणि आध्यात्मिक कार्यक्रम 'पीस न्यूज' द्वारे 'पीस ऑफ माइंड' टीव्ही चॅनेलवर प्रसारित केले जात होते, ज्यामुळे भारत आणि परदेशातील लाखो भाविक...