सीधे मुख्य सामग्री पर जाएं

ऑडी इंडियाकडून ऑल-न्यू ऑडी क्यू३ लाँच

प्रगत ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टीम आणि नऊ एअरबॅग्जने सुसज्ज 

मुंबई। ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू३ लाँच केली. या कॉम्पॅक्ट लक्झरी एसयूव्हीमध्ये १५० किलोवॅट पॉवर, क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह आणि डिजिटल, लाइटिंग, तसेच कम्फर्ट तंत्रज्ञानाचा उत्तम मेळ साधण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या केबिनमध्ये डिजिटल स्टेज पॅनोरॅमिक डिस्प्ले, हेड-अप डिस्प्ले आणि सोनोस प्रीमियम साउंड सिस्टीम देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल प्लांटमध्ये स्थानिक पातळीवर असेंबल केलेली ही ऑल-न्यू ऑडी क्यू३ ५१,९९,०००/- रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.

ऑल-न्यू ऑडी क्यू३ मध्ये मायक्रो-एलईडी तंत्रज्ञानासह डिजिटल मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स, चार निवडण्यायोग्य डे-टाइम-रनिंग-लाइट सिग्नेचर्स आणि तीन प्रगत डायनॅमिक लाइट सिक्वेन्सिंग देण्यात आले आहेत, तर मागील बाजूस इल्यूमिनेटेड ऑडी रिंग्ज वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करतात. नवीन डिजिटल इंटरफेस ड्रायव्हरच्या भोवती सर्व डिस्प्ले, कंट्रोल्स आणि इन्फोटेनमेंट फंक्शन्स एकत्र आणतो, ज्यामुळे कार चालवण्याचा अनुभव अधिक सुलभ आणि कनेक्टेड बनतो. तसेच या मॉडेलमध्ये नवीन इंटिग्रेटेड स्विच मॉड्यूल सादर करण्यात आले आहे, ज्यामध्ये उजवीकडील लिव्हरने गिअर निवडता येतो, तर डावीकडील लिव्हर लाइटिंग, विंडशील्ड वायपर आणि क्लिनिंग फंक्शन्स नियंत्रित करतो. हेड-अप डिस्प्ले ड्रायव्हरच्या थेट दृष्टीक्षेपात प्रवासाची महत्त्वाची माहिती प्रोजेक्ट करतो, ज्यामुळे डिजिटल कॉकपिटला पूरक ठरत आवश्यक माहिती सहज उपलब्ध होते.

या लाँचबाबत मत व्यक्त करत ऑडी एजीच्या सेल्स ओव्हरसीजच्या सीनियर डायरेक्टर व्हिक्टोरिया कॉफमन-रीगर म्हणाल्या, “आजचा दिवस ऑडी इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मला या क्षणाचा भाग होताना खूप आनंद होत आहे. ऑल-न्यू ऑडी क्यू३ चे लाँच महत्त्वाचा टप्पा आहे आणि ऑडी एजी बोर्डाचे सेल्स व मार्केटिंग सदस्य मार्टिन सँडर भारतात उपस्थित राहिल्यामुळे हा प्रसंग अधिक खास बनला आहे. त्यांची उपस्थिती केवळ या नवीन मॉडेलचे महत्त्व अधोरेखित करत नाही, तर ऑडी एजीसाठी उदयोन्मुख बाजारपेठ म्हणून भारताचे वाढते महत्त्वही दर्शवते. भारतातील लक्झरी बाजारपेठ सातत्याने विकसित होत आहे आणि आम्ही आमच्या ग्राहकांच्या आकांक्षा, तसेच आमच्या ब्रँडचे वैशिष्ट्यपूर्ण रूप प्रतिबिंबित करणारी उत्पादने, तंत्रज्ञान आणि अनुभव सातत्याने देत राहू. ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा व अपेक्षा वाढत आहेत आणि ऑडीमध्ये त्यांच्यासोबत पुढे जाण्यासाठी आम्ही स्वतःला सज्ज ठेवू इच्छितो.”

या प्रसंगी मत व्यक्त करत एसएव्हीडब्ल्यूआयपीएलचे एमडी आणि सीईओ पियुष अरोरा म्हणाले, “ऑल-न्यू ऑडी क्यू३ चे लाँच ऑडी इंडियासाठी महत्त्वाचा टप्पा आहेत, तसेच यामधून नवीन पिढीतील लक्झरी ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. मागील मॉडेलप्रमाणे, नवीन क्यू३ ची निर्मितीही येथे भारतात छत्रपती संभाजीनगर येथील आमच्या अत्याधुनिक प्लांटमध्ये केली जात आहे. आम्ही एसएव्हीडब्ल्यूआयपीएलमध्ये विकसित केलेल्या कौशल्यांचे हे उत्तम सादरीकरण आहे, जे सिद्ध करते की, भारत आमच्यासाठी केवळ प्रमुख वाढणारी बाजारपेठ म्हणून नाही, तर प्रमुख मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनिअरिंग केंद्र म्हणूनही दुहेरी भूमिका बजावत आहे.”

ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “भारतात ऑडी ब्रँडसाठी ऑडी क्यू३ फार पूर्वीपासून महत्त्वाची प्रवेशद्वार राहिली आहे आणि या कारची आतापर्यंतचे सर्वाधिक आधुनिक एडिशन सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ऑल-न्यू ऑडी क्यू३ क्वाट्रोचा आत्मविश्वास, शक्तिशाली कार्यक्षमता आणि दैनंदिन उपयुक्ततेसोबत लक्षणीयरित्या सुलभ टेक्निकल अनुभव तसेच अनेक विचारपूर्वक दिलेल्या आरामदायी व सुरक्षित वैशिष्ट्यांचा संगम घडवून आणते. या कारचे स्थानिक पातळीवरील असेंब्ली भारतातील बाजारपेठेप्रती असलेल्या आमच्या कटिबद्धतेचे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, या कारचे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व, प्रगत तंत्रज्ञान आणि हाताळणीतील सहजता आधुनिक कॉम्पॅक्ट लक्झरी एसयूव्हीच्या शोधात असलेल्या ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल.”

नवीन ऑडी क्यू३: प्रमुख वैशिष्ट्ये आणि तांत्रिक माहिती

ड्राइव्ह आणि कार्यक्षमता: नवीन ऑडी क्यू३ मध्ये डायनॅमिक ड्रायव्हिंग अनुभवासाठी १५० किलोवॅट पॉवर आणि ३२० एनएम टॉर्क निर्माण करणारे २.०-लिटर टीएफएसआय पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार अवघ्या ७.१ सेकंदात ० ते १०० किमी/तास इतका वेग प्राप्त करू शकते. रस्त्यावर उत्तम ट्रॅक्शन आणि नियंत्रणासाठी यात प्रसिद्ध क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम देण्यात आली आहे. याशिवाय, प्रोग्रेसिव्ह स्टिअरिंग आणि पाच ड्रायव्हिंग मोड्स (बॅलन्स्ड, डायनॅमिक, कम्फर्ट, एफिशिअन्सी आणि ऑफरोड+) सह ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, कम्फर्ट सस्पेंशन तसेच चढाव आणि उतारावर अधिक सुरक्षिततेसाठी हिल होल्ड असिस्ट आणि डाउनहिल असिस्ट यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये मिळतात.

एक्सटीरियर आणि उपलब्ध रंग: कारच्या बाह्य डिझाइनमध्ये २५,६०० मायक्रो-एलईडी (प्रत्येकी ४० मायक्रोमीटर आकाराचे) असलेल्या प्रगत डिजिटल मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्सचा समावेश आहे, ज्या लेन आणि ओरिएंटेशन लाइटिंग फंक्शन्स सक्षम करतात. यामध्ये चार निवडण्यायोग्य डे-टाइम-रनिंग-लाइट सिग्नेचर्स आणि तीन लाइट प्रोजेक्शन्ससह प्रगत डायनॅमिक लाइट सिक्वेन्सिंग मिळते. मागील बाजूस एलईडी रिअर लाइट्स प्रो आणि इल्यूमिनेटेड ऑडी रिंग्ज देण्यात आल्या आहेत. स्पोर्टी लूकसाठी ४५.७२ सेमी (आर१८) आकाराचे ब्लॅक, ग्लॉस-टर्न फिनिशमधील ५-आर्म एरो अलॉय व्हील्स, ऑटो-डिमिंग व मेमरी फंक्शनसह पॉवर-अॅडजस्टेबल, हीटेड व फोल्डिंग एक्सटीरियर मिरर्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि मिरर्समध्ये इंटिग्रेटेड प्रोजेक्शन लाइट्स मिळतात. ही एसयूवी सेज ग्रीन, मिथॉस ब्लॅक, ग्लेशियर व्हाईट, नव्हेरा ब्लू आणि तंबोरा ग्रे या पाच आकर्षक एक्सटीरियर रंगांमध्ये तसेच टॅमरिंड ब्राऊन आणि पर्गामेंट बेज या दोन इंटीरियर थीम्समध्ये उपलब्ध आहे.

इंटेरियर आणि इन्फोटेनमेंट: केबिनमध्ये डिजिटल स्टेज पॅनोरॅमिक डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये ३०.२२ सेमी ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट आणि ३२.५१ सेमी सेंट्रल एमएमआय टच डिस्प्लेचा समावेश आहे. ड्रायव्हरच्या सुलभतेसाठी हेड-अप डिस्प्ले, मल्टिफंक्शन कंट्रोल्स व शिफ्ट पॅडल्ससह ट्विन-स्पोक फ्लॅट-टॉप/बॉटम लेदर स्टिअरिंग व्हील आणि गिअर सिलेक्टर, लाइटिंग व वायपर फंक्शन्स एकत्र आणणारे नवीन इंटिग्रेटेड स्विच मॉड्यूल दिले आहे, ज्यामुळे सेंटर कन्सोलमध्ये अधिक मोकळी जागा मिळते. मनोरंजनासाठी १२ हाय-परफॉर्मन्स स्पीकर्स, ४२०-वॅट अॅम्प्लिफायर आणि कस्टमायझेबल प्रोफाईल्ससह सोनोस प्रीमियम साउंड सिस्टीम आहे. यासोबतच दारांच्या खिडक्यांना फ्रंट अकौस्टिक ग्लेझिंग, ऑडी वायरलेस स्मार्टफोन इंटरफेस, वायरलेस चार्जिंग, यूएसबी पोर्ट्स आणि ३० रंगांचे अँबियंट लाइटिंग पॅकेज प्लस मिळते.

आराम आणि सोयीसुविधा: प्रवाशांच्या आरामासाठी ड्रायव्हर सीटकरिता मेमरी फंक्शनसह पॉवर-अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, प्रीमियम लेदर/आर्टिफिशियल लेदर अपहोल्स्ट्री आणि स्लाइडिंग व रेक्लाइन सुविधा असलेली रिअर सीट देण्यात आली आहे. केबिनमध्ये थ्री-झोन डिलक्स ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर-व्ह्यू कॅमेऱ्यासह पार्क असिस्ट प्लस, ५० मीटर रिव्हर्स-रूट मेमरीसह रिव्हर्सिंग असिस्ट, कन्वीनियन्स की आणि इलेक्ट्रिकली उघडणारे व बंद होणारे बूट लिड (टेलगेट) समाविष्ट आहे.

सुरक्षा आणि तंत्रज्ञान: सुरक्षिततेच्या बाबतीत कारमध्ये ९ एअरबॅग्ज, आरामदायी ड्रायव्हिंगसाठी अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फ्रंट इमर्जन्सी ब्रेक असिस्ट, ड्रायव्हर अटेंशन आणि फटीग मॉनिटर, सीट बेल्ट प्रिटेन्शनर आणि चाकांच्या सुरक्षेसाठी अँटी-थेफ्ट व्हील बोल्ट्स यांसारखी आधुनिक सुरक्षा यंत्रणा देण्यात आली आहे.

ओनरशिप पॅकेजेस: ग्राहकांसाठी २+३ वर्षे विस्तारित वॉरंटीसह २ किंवा ५ वर्षांचे कॉम्प्रीहेन्सिव्ह सर्व्हिस व्हॅल्यू पॅकेज उपलब्ध आहे. तसेच १५ वर्षांपर्यंत कव्हरेज असलेले रोडसाइड असिस्टन्स पॅकेजेस, १० वर्षांपर्यंत कव्हरेज असलेले सर्व्हिस प्लॅन व एक्सटेंडेड वॉरंटी पॅकेजेस् मिळतात. आर्थिक सुलभतेसाठी विविध फायनान्सर्सकडून १० वर्षांपर्यंतचे दीर्घ मुदतीचे कर्ज, कमी ईएमआयच्या 'बलून ऑफर्स' आणि अ‍ॅश्युअर्ड बायबॅक ऑफर्सचा लाभ घेता येईल.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६, मुग्धा गोडसे हिने पुरस्कार प्रदान केले

मुंबई: रिअल्टी क्वार्टर, एक अग्रगण्य रिअल इस्टेट मीडिया, प्रकाशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने, आपला ९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६ यशस्वीरित्या आयोजित केला. उद्योग क्षेत्रातील अनुभवी पवन चौहान यांनी सुरू केलेल्या या वार्षिक प्रमुख कार्यक्रमात, कंपनीच्या प्रकाशनाची नऊ वर्षे आणि प्रॉपर्टी एक्स्पो व गुंतवणूकदार मेळाव्यांच्या आयोजनातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १७ वर्षांच्या उपस्थितीचा उत्सव साजरा करण्यात आला. या भव्य सोहळ्याची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन समारंभाने झाली, ज्याला श्री. चौहान, कंपनी संचालक शाइस्ता अन्सारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. असोसिएट डायरेक्टर सिद्धांत ठाकूर यांनी सूत्रसंचालन केलेली "बी२बी आणि बी२सी साठी एकात्मिक दृष्टिकोन आणि रिअल इस्टेटचा दृष्टिकोन २०२६" या विषयावरील माहितीपूर्ण पॅनल चर्चा हे या सायंकाळचे मुख्य आकर्षण होते. पॅनेलमध्ये सुहेल खंडवाणी (खंडवाणी ग्रुप), डॉ. अजय एल. दुबे (मीरा-भयंदर प्रॉपर्टी डीलर्स वेल्फेअर असोसिएशन), चिंतन वसानी (वाइझबिझ रियल्टी), संजीव गुप्ता...

स्वस्त कर्ज, विमा आणि पेन्शनही वित्तीय समावेशनाचा भाग असावेत: राज्यपाल

३० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी बँकिंग क्षेत्र बनणार मुख्य आधार  मुंबई: "वित्तीय समावेशन हे केवळ बँक खाती उघडणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यापुरते मर्यादित न राहता, विशेषतः ग्रामीण कुटुंबे, महिला आणि लहान उद्योजकांसाठी परवडणारे कर्ज, विमा आणि पेन्शन कवच सुनिश्चित करण्यापर्यंत विस्तारले पाहिजे," असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत केले. 'असोचॅम'च्या नॅशनल कौन्सिल फॉर बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर लेंडिंग कंपनीजच्या २१ व्या वार्षिक शिखर परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. "रेझिलियन्स, रीइन्व्हेंशन अँड इंडियाज राइज" या संकल्पनेखाली आयोजित या परिषदेत भारताच्या विकास आकांक्षांना पाठबळ देण्यात वित्तीय संस्थांच्या भूमिकेवर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा पुढे म्हणाले, "बँका आणि वित्तीय संस्था या केवळ कर्ज आणि वित्तीय सेवा पुरवठादार नाहीत; तर त्या राष्ट्र उभारणीतील महत्त्वपूर्ण भागीदार आहेत. तंत्रज्ञान बँकिंग क्षेत्राला नवे रूप दे...

आयटेलने लॉन्च केला 'सिटी ३०० ५जी' स्मार्टफोन

परवडणाऱ्या किमतीत ५जी कनेक्टिव्हिटी, स्मूथ डिस्प्ले, दमदार बॅटरी परफॉर्मन्स  मुंबई: भारतातील आघाडीच्या टेक्नॉलॉजी ब्रँड्सपैकी एक असलेल्या आयटेल ने आयटेल सिटी ३०० ५जी स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली. तरुण आणि महत्त्वाकांक्षी ग्राहकांना लक्षात घेऊन तयार केलेला हा स्मार्टफोन १४,९९९ रुपये किमतीत उपलब्ध आहे. परवडणाऱ्या किमतीत ५जी कनेक्टिव्हिटी, स्मूथ डिस्प्ले, दिवसभर साथ देणारी बॅटरी आणि अनावश्यक अॅप्सपासून मुक्त सॉफ्टवेअरचा अनुभव देण्याचा सिटी ३०० ५जी चा प्रयत्न आहे. सिटी ३०० ५जी मध्ये १२० हर्ट्झ पंच-होल डिस्प्ले आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहणं, सोशल मीडियावर स्क्रोल करणं किंवा हलकेफुलके गेम खेळणं अधिक सहज आणि प्रतिसादक्षम होतं. टी८२०० ऑक्टा-कोर ६एनएम ५जी प्रोसेसरमुळे रोजच्या कामांसाठी विश्वासार्ह परफॉर्मन्स मिळतो. अधिक चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी हा फोन एनआरसीए तंत्रज्ञानासह १० ५जी बँड्सना सपोर्ट करतो. दिवसभर चालणारी बॅटरी आणि अनावश्यक अॅप्स नसलेला इंटरफेस यामुळे फोन वापरण्याचा अनुभव स्वच्छ, सोपा आणि त्रासमुक्त राहतो. त्यामुळे फीचर्सने भरलेला, पण बजेटमध्ये बसणारा स्मार्ट...