सीधे मुख्य सामग्री पर जाएं

किया सेल्‍टोसने ६ लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा गाठला

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकरने जाहीर केले की, सेल्‍टोसने २०१९ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून भारतात एकूण ६ लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा पार केला आहे. या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामधून व्‍हेरिएण्‍ट्सप्रती ग्राहकांची, तसेच बाजारपेठांमध्‍ये शाश्वत स्‍वीकृती दिसून येते, ज्‍यासह हे मॉडेल मिड-एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये सर्वाधिक सातत्‍यपूर्ण परफॉर्मर ठरले आहे.

सुरूवातीपासून सेल्‍टोसने स्‍पष्‍ट उत्‍पादन तत्त्वासह बाजारपेठेत प्रवेश केला. या वेईकलमध्‍ये विशिष्‍ट जागतिक डिझाइन, विविध पॉवरट्रेन पर्याय, तसेच पेट्रोल व डिझेल पर्याय, इंधन प्रकारांमध्‍ये ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन्‍स, मोठ्या स्‍वरूपातील इन्‍फोटेन्‍मेंट असलेली वैशिष्‍ट्य-संपन्‍न केबिन, कनेक्‍टेड कार तंत्रज्ञान आणि प्रीमियम इंटीरिअर फिनिशेस् आहेत. श्रेणीमध्‍ये मोठ्या प्रमाणात उपयुक्‍ततेला प्राधान्‍य दिले जात असताना सेल्‍टोसने केबिनमधील उत्‍सावहर्धक अनुभव, तंत्रज्ञान एकीकरण आणि व्हिज्‍युअल आकर्षकता यांवर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केले.

सुरक्षितता आणि तंत्रज्ञानाने स्‍वीकृतीला चालना देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली. यशस्‍वी अपडेट्ससह मॉडेलने आपल्‍या ऑफरिंग वाढवत अॅडवान्‍स्‍ड ड्रायव्‍हर असिस्‍टण्‍स सिस्‍टम्‍स (एडीएएस), सुधारित कनेक्‍टीव्‍हीटी सोल्‍यूशन्‍स आणि व्‍यापक सेफ्टी पॅकेजची भर केली. टॉप ट्रिम्‍सकडून सतत देण्‍यात आलेल्‍या २९ टक्‍के योगदानामधून निदर्शनास येते की, ग्राहक मोठ्या प्रमाणात उच्‍च स्‍तरीय सुरक्षितता, आरामदायीपणा व डिजिटल एकीकरणाचा अवलंब करत आहेत. तसेच एण्‍ट्री व मिड व्‍हेरिएण्‍ट्सप्रती स्थिर मागणीमधून मॉडेलचे संतुलित मूल्‍य तत्त्व दिसून येते. 

सेल्‍टोसने विशेषत: उच्‍च श्रेणींमध्‍ये असलेली वैशिष्‍ट्ये अपल्‍या किमतीच्‍या मर्यादेत उपलब्‍ध करून देत ग्राहकांच्‍या अपेक्षा वाढवल्‍या. यामुळे ग्राहकांना हॅचबॅक्‍स, सेदान्‍स व कॉम्‍पॅक्ट एसयूव्‍हींवरून अपग्रेड करत अधिक प्रीमियम मालकीहक्‍क अनुभवाचा आनंद घेता आला, ज्‍यासाठी त्‍यांना मोठ्या श्रेणीतील वेईकल खरेदी करण्‍याची गरज भासली नाही. सेल्‍टोसच्‍या व्‍यापक व्‍हेरिएण्‍ट ट्रिम्‍समुळे मूल्‍याला व वैशिष्‍ट्यांना महत्त्व देणाऱ्या ग्राहकांसाठी ही वेईकल अनुकूल ठरली.

या महत्त्‍वपूर्ण टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाचे चीफ सेल्‍स ऑफिसर सनहॅक पार्क म्‍हणाले, ''६ लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा गाठण्‍यामधून डिझाइन, सुरक्षितता, तंत्रज्ञान व कार्यक्षमतेमध्‍ये प्रबळ तत्त्वे देणाऱ्या उत्‍पादनासाठी ग्राहकांची स्थिर पसंती दिसून येते. सेल्‍टोसने लाँचच्‍या वेळी उपलब्‍ध नसलेली वैशिष्‍ट्ये व कॉन्फिग्‍युरेशन्‍स देत मिड-एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये अपेक्षा वाढवल्‍या. व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये सतत सुधारणा, तसेच टॉप ट्रिम्‍ससाठी प्रबळ मागणीमधून प्रगत सुरक्षा यंत्रणा व कनेक्‍टेड तंत्रज्ञानांमध्‍ये ग्राहकांचा वाढता आत्‍मविश्वास दिसून येतो.''

नेक्‍स्‍ट-जनरेशन सेल्‍टोस प्रबळ वारसा आणि ग्राहक विश्वासाला अधिक दृढ करते, तसेच कियाचे मुलभूत उत्‍पादन आधारस्‍तंभ मोठी उपस्थिती, आकर्षक डिझाइन आणि प्रगतीशील सुरक्षितता व तंत्रज्ञानाला अधिक प्रगत करते. श्रेणीमधील आघडीची ४,४६० मिमी लांबी, १,८३० मिमी रूंदी आणि २,६९० मिमी लांब व्‍हीलबेससह ही वेईकल आतील बाजूस एैसपैस जागा आणि रस्‍त्‍यावर लक्षवेधक उपस्थिती देते. नवीन सेल्‍टोसमध्‍ये अद्वितीय आरामदायीपणा, विस्‍तारित डिजिटल इंटरफेस, अपग्रेडेड एडीएएस सूट आणि सुधारित सेफ्टी आर्किटेक्‍चर आहे. केबिनमध्‍ये सुधारणा आणि एकीकृत करण्‍यात आलेली वैशिष्‍ट्ये वेईकलच्‍या दैनंदिन उपयुक्‍ततेला अधिक वाढवतात, तसेच ग्राहक महत्त्व देणाऱ्या विविध पॉवरट्रेन व ट्रान्‍समिशन संयोजनांना कायम ठेवण्‍यात आले आहे.

किया इंडिया विकासाच्‍या भावी टप्‍प्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत असताना सेल्‍टोस सुस्‍पष्‍ट, सर्वांगीण मूल्‍य तत्त्व देत कंपनीच्‍या मिड-एसयूव्‍ही धोरणाला दिशा देत आहे. ६ लाख युनिट्स विक्रीच्‍या टप्‍प्‍यामधून वेईकलप्रती शाश्वत स्‍वीकृती दिसून येते. यासह अपग्रेडेड मॉडेल विमान ग्राहकांमध्‍ये, तसेच व्‍यावहारिकता व महत्त्‍वाकांक्षी एसयूव्‍हीचा शोध घेत असलेल्‍या नवीन ग्राहकांमध्‍ये देखील नवीन मागणीला चालना देण्‍यास सज्‍ज आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...