सीधे मुख्य सामग्री पर जाएं

बीकेटीने ऑन-हायवे टायर पोर्टफोलिओसह भारतातील ग्राहक टायर बाजारपेठेत प्रवेश

मुंबई: बाळकृष्‍ण इंडस्‍ट्रीयल लिमिटेड (बीकेटी) या ऑफ-हायवे टायर (ओएचटी) विभागातील जागतिक अग्रणी कंपनीने आपला ऑन-हायवे पोर्टफोलिओ लाँच करत भारतातील ग्राहक टायर बाजारपेठेत प्रवेशाची घोषणा केली. आपल्‍या ओएचटी नेतृत्‍वापलीकडे धोरणात्‍मक विस्‍तारीकरण करत बीकेटीने दुचाकी (स्‍कूटर्स व मोटरसायकल्‍स) आणि मीडियम अँड हेवी कमर्शियल वेईकल्‍स (एमअँडएचसीव्‍ही) साठी उद्देशासह डिझाइन करण्‍यात आलेली उत्‍पादने सादर केली, ज्‍यामधून भारतातील झपाट्याने वाढत असलेल्‍या ग्राहक व रिप्‍लेसमेंट टायर विभागांप्रती त्‍यांची दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते.

यासोबत कंपनीने आपली राष्‍ट्रीय ब्रँड मोहिम 'एलीव्‍हेट युअर ड्राइव्‍ह ' देखील लाँच केली, ज्‍यामध्‍ये ब्रँड अॅम्‍बेसेडर रणवीर सिंग आहेत. या मोहिमेसह कंपनीने आपला ग्राहक ब्रँड प्रवास सुरू केला आहे, जेथे स्‍वदेशी विकसित जागतिक टायर उत्‍पादकासाठी नवीन अध्‍याय दिसून येतो

नवीन ब्रँड चॅप्‍टर: बीकेटी टायर्स आणि बीकेटी कार्बन : आपली एकात्मिक ब्रँड ओळख 'बीकेटी - ग्रोईंग टूगेदर' अंतर्गत कंपनीने दोन विशिष्‍ट ओळखीसह नवीन ब्रँड आर्किटेक्‍चरचे अनावरण केले - ऑफ-हायवे व ऑन-हायवे श्रेणींमधील कंपनीच्‍या परिपूर्ण टायर पोर्टफोलिओला सादर करणारे बीकेटी टायर्स आणि कंपनीच्‍या कार्बन ब्‍लॅक व औद्योगिक साहित्‍य व्‍यवसायाला सादर करणारे बीकेटी कार्बन. या दोन आधारस्‍तंभ असलेल्‍या संरचना ब्रँडबाबत सुस्‍पष्‍टता वाढवतात, तसेच एकीकृत गतीशीलता उद्योग म्‍हणून बीकेटीच्‍या उत्‍क्रांतीला दाखवतात. 

बीकेटीचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक अरविंद पोद्दार, बीकेटीचे संयुक्त व्‍यवस्‍थापकीय संचालक राजीव पोद्दार, बीकेटीच्‍या व्‍यवसाय विकास व धोरणाचे वरिष्‍ठ अध्यक्ष व संचालक सतिश शर्मा, बीकेटी युरोपच्‍या मॅनेजिंग डायरेक्‍टर लुसिया साल्‍मासो आणि बीकेटी टायर्सचे भारतातील चीफ मार्केटिंग ऑफिसर महेश कोप्‍पड यांच्‍या उपस्थितीत ही घोषणा करण्‍यात आली. 

बीकेटीचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक अरविंद पोद्दार म्‍हणाले, ''ऑन-हायवे विभागातील आमच्‍या प्रवेशामधून बीकेटीचा उद्देश दिसून येतो, तो म्‍हणजे वास्‍तविक विश्वातील स्थितींसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या उत्‍पादनांसह भारतातील सर्वसमावेशक गतीशीलता गरजांची पूर्तता करणे. आम्‍ही सुरक्षितता, विश्वसनीयता आणि मूल्‍य देणारे टायर्स सादर करण्‍यासाठी दशकभराच्‍या उत्‍पादन वारसाचा फायदा घेत आहोत. बीकेटी - ग्रोईंग टूगेदर या तत्त्वामधून मार्गदर्शित आमचा ग्राहक, वितरक व डिलर्ससाठी विश्वासार्ह सहयोगी बनण्‍याचा मनसुबा आहे.''

बीकेटीचे संयुक्त व्‍यवस्‍थापकीय संचालक राजीव पोद्दार म्‍हणाले, ''बीकेटीचा ऑन-हायवे टायर विभागातील प्रवेश जबाबदारीने विकास करणे आणि आमची गतीशीलता उपस्थिती वाढवणे या आमचा भारत-केंद्रित उपक्रम 'व्हिजन २०३०' अंतर्गत धोरणात्‍मक टप्‍पा आहे. आमच्‍या दृष्टिकोनामध्‍ये महत्त्वाकांक्षा व शिस्‍तबद्धता यांचे संतुलन आहे, बीकेटीच्‍या व्‍यवसाय विकास व धोरणाचे वरिष्‍ठ अध्‍यक्ष व संचालक सतिश शर्मा म्‍हणाले, ''आम्‍ही विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍यामध्‍ये प्रवेश करत असताना दुचाकी, ट्रक बस रॅडियल, पॅसेंजर व लाइट ट्रक श्रेणींमध्‍ये टिकाऊपणा, मायलेज, आरामदायीपणा व प्रगत कार्यक्षमता देण्‍यावर अविरत लक्ष केंद्रि‍त केले आहे, ज्‍याला सखोल ग्राहक माहिती आणि उत्‍पादन नेतृत्‍वाप्रती कटिबद्धतेचे पाठबळ आहे. आमचे उत्‍पादन नेतृत्‍व, वितरण क्षमता आणि ग्राहक विश्वासावरील शिस्‍तबद्ध, भारत-केंद्रित धोरणाच्‍या माध्‍यमातून आर्थिक वर्ष २०३० पर्यंत ५ टक्‍के मार्केट शेअर संपादित करण्‍याचा मनसुबा आहे.''

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मिन्त्राचा बिग फॅशन फेस्टिव्हल

८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, १००+ नवीन लॉन्च आणि २१,००० उदयोन्मुख लेबल्सचा सहभाग मुंबई: सणासुदीच्या खरेदी हंगामाची सुरुवात करत मिन्त्राने आपल्या प्रमुख बिग फॅशन फेस्टिव्हलची (बीएफएफ) घोषणा केली आहे. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांसाठी ८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, हजारो ब्रँड्स आणि १०० हून अधिक नवीन ब्रँड्स व कलेक्शन्स उपलब्ध असतील. यासोबतच २१,००० उदयोन्मुख ब्रँड्स आणि लेबल्स सहभागी होत असून, त्यापैकी १३,००० ब्रँड्स प्रथमच बीएफएफमध्ये सहभागी होत आहेत. मिन्त्राच्या प्रमुख शेरॉन पैस म्हणाल्या, “बिग फॅशन फेस्टिव्हल हा भारताच्या उत्सवी कॅलेंडरमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा बनला आहे. प्रादेशिक विक्रेते आणि लघुउद्योगांना सक्षम करण्यापासून ते जागतिक आणि भारतीय फॅशन व लाइफस्टाइल ब्रँड्समधील सर्वोत्तम उत्पादने लाखो घरांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत, तो संपूर्ण इकोसिस्टमला जोडतो. एआय आणि विस्तारित डिलिव्हरी नेटवर्कच्या मदतीने आम्ही ८० दशलक्षांहून अधिक ग्राहकांसाठी फॅशन अधिक सुलभ, वैयक्तिकृत आणि अखंड बनवत आहोत.” यंदाच्या बीएफएफमध्ये पुरुष व महिलांचे एथनिक वेअर, पुरुषांचे कॅज्युअल वेअर, महिला...

झेन डायमंड रेडियंट रिफ्लेक्शन्स

सादर केले करवा चौथ स्पेशल झेन डायमंड कलेक्शन मुंबई: प्रेम, समर्पण आणि आयुष्यभराची सोबत यांचा सण करवा चौथ, यंदा नैसर्गिक हिऱ्यांसह अधिक चमकदार बनवा. संध्याकाळी चंद्राचे दर्शन आणि उपवास सोडण्याच्या पवित्र क्षणी हिऱ्यांचे सदाबहार तेज तुमचा आनंद अधिक संस्मरणीय बनवेल. झेन डायमंड इंडिया या खास क्षणासाठी निवडलेले शानदार डायमंड ज्वेलरी कलेक्शन घेऊन आले आहे. तुमच्या जीवनसाथीसाठी प्रेमाची सुंदर भेट द्यायची असो किंवा तुम्हाला तुमचा करवा चौथ लुक सर्वात वेगळा आणि खास बनवायचा असेल - ही अद्वितीय डिझाइन्स तुमचा आनंद द्विगुणित करतील. प्रेमाचे अतूट बंधन आणि आयुष्यभराच्या वचनांचे प्रतीक, हा क्लासिक बँड अस्सल सॉलिटेयर हिऱ्यांच्या अद्वितीय चमकेने सजला आहे. करवा चौथला अंगठीचे खूप खास आणि भावनिक महत्त्व असते. हा सुंदर बँड तुमच्या लग्नातील अंगठीला एक आधुनिक आणि शानदार अपग्रेड देण्यासाठी परफेक्ट आहे. हा तुम्हाला त्या वचनांची आठवण करून देत राहील, जी या पवित्र रात्रीच्या चंद्राप्रमाणे कायम चमकत राहतील. रोज गोल्ड, यलो गोल्ड आणि व्हाईट गोल्डमध्ये उपलब्ध असलेली ही शानदार स्प्लिट-बँड सॉलिटेयर रिंग अतिशय...

आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड ने लॉन्च केले आकाश इनव्हिक्टस - इंजिनियरिंग 2.0

मुंबई: आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड, जे भारतातील आघाडीच्या परीक्षा-तयारी प्रदात्यांपैकी एक आहे, त्यांनी आकाश इनव्हिक्टस-इंजिनियरिंग 2.0 द्वारे आपल्या अभियांत्रिकी तयारी परिसंस्थेला बळकट केल्याची घोषणा केली आहे. ही एक नवीन कामगिरी-चालित शैक्षणिक रचना आहे, जी जेईई मेन, जेईई ॲडव्हान्स्ड आणि राज्य सीईटी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुव्यवस्थित मार्ग तयार करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. एक ३६०-अंश तयारीचा अनुभव, सहा स्तंभांवर आधारित विद्यार्थ्यांना वर्गात, त्यांच्या पुस्तकांमध्ये, त्यांच्या चाचण्यांमध्ये आणि त्यांना मिळणाऱ्या मार्गदर्शनामध्ये प्रत्येक टप्प्यावर इनव्हिक्टसचा फरक जाणवेल. हा कार्यक्रम सहा स्तंभांवर उभा आहे: परिणाम-केंद्रित शैक्षणिक दृष्टिकोन: प्रत्येक वर्ग, सराव सत्र आणि उजळणी चक्र एका उद्देशाने नियोजित केले जाते — जेईई ॲडव्हान्स्ड, जेईई मेन, बिटसॅट आणि राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमध्ये सर्वोत्तम शक्य रँक मिळवणे. रँक-सिद्ध झालेली शिक्षक टीम: शिक्षक टीम ही आकाश इनव्हिक्टसची सर्वात मोठी ताकद आहे. हीच शैक्षणिक टीम आहे जिने इनव्हिक्टस अभ्यासक...