सीधे मुख्य सामग्री पर जाएं

वर्ल्‍ड सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट समिटच्‍या २५व्‍या पर्वाचे उद्घाटन

मुंबई। द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी)चा वार्षिक प्रमुख उपक्रम वर्ल्‍ड सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट समिट (डब्‍ल्‍यूएसडीएस) २०२६ च्या रौप्य महोत्सवी पर्वाचे औपचारिक उद्घाटन भारत सरकारचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंदर यादव यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मुख्य भाषणात माननीय मंत्री यांनी समानता, स्थिरता आणि शाश्वत वाढीवर आधारित भारताच्या हवामान विषयक महत्त्वाकांक्षेला प्रकाशझोतात आणले. हवामान आणि विकास कार्यातील परिवर्तनीय अजेंडा पुढे नेण्यासाठी या परिषदेत जागतिक नेते, धोरणकर्ते, उद्योजक, संशोधक आणि नागरी संस्था एकत्र आल्या आहेत.

'परिवर्तन: शाश्वत विकासासाठी दृष्टीकोन, आवाज आणि मूल्ये' या मुख्य संकल्पनेखाली आयोजित डब्‍ल्‍यूएसडीएसचे हे २५वे एडिशन समिटच्‍या वारशातील महत्त्वाचा टप्पा आहे. 'ग्लोबल साऊथमध्ये स्थित शाश्वत विकासावर स्वतंत्रपणे आयोजित केले जाणारे हे एकमेव आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे.

स्वागतपर भाषण सादर करत टेरीचे अध्यक्ष नितीन देसाई म्हणाले, “आजचे जग पूर्णपणे वेगळे आहे. आपल्या समोर जागरूकता निर्माण करण्‍याचे नाही तर प्रत्यक्ष कृती करण्‍याचे आव्‍हान आहे. वर्ल्‍ड सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट समिटचा संपूर्ण प्रवास फक्त जागरूकतेबाबत बोलण्‍यापर्यंत मर्यादित राहिला नाही, तर शाश्वततेला चालना देण्यासाठी आवश्‍यक असलेल्‍या कृती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याकडे वळला आहे. आपल्यासमोर प्रत्यक्ष अंमलबजावणीची अत्यंत गंभीर समस्या आहे."

 टेरीच्‍या डायरेक्‍टर जनरल डॉ. विभा धवन आपल्या प्रास्ताविक भाषणात म्‍हणाल्‍या, “गेल्या २५ एडिशन्‍समध्‍ये डब्‍ल्‍यूएसडीएस हे ग्लोबल साऊथसाठी हवामान बदल आणि शाश्वत विकासावरील चर्चेला आकार देणारे एकमेव स्वतंत्रपणे आयोजित व्यासपीठ म्हणून विकसित झाले आहे. आपण आतापर्यंत पुरेशी चर्चा केली आहे, पण आज आपल्याला भारत आणि जागतिक अशा दोन्ही स्तरांवर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे."

आपल्‍या भाषणाची सांगता करण्‍यापूर्वी डॉ. धवन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला एक विशेष संदेश वाचून दाखवला. त्‍यामधील एक भाग होता की, ''आमचा दृष्टीकोन अंत्योदय म्हणजेच अगदी वंचित घटकाच्या उत्थानाने प्रेरित आहे. हवामान कृतीतून सर्वात आधी असुरक्षित, गरीब आणि वंचित घटकांचे संरक्षण झाले पाहिजे. हवामान बदलाचा सर्वाधिक आणि विसंगत फटका ग्लोबल साऊथला बसत आहे. तरीही, त्यांच्यासाठी विकास अनिवार्य गरज आहे. म्हणूनच हवामान न्याय अत्यंत आवश्यक आहे. विकसनशील देशांनी पृथ्वीचे रक्षण करताना गरिबी आणि भूक यांचेही निर्मूलन केले पाहिजे. यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण, वित्तपुरवठा आणि भागीदारीची आवश्यकता आहे. विकसित देशांवर अधिक वेगाने पावले उचलण्याची, शाश्वत जीवन जगण्याची आणि मोठ्या प्रमाणावर वित्त व तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची विशेष जबाबदारी आहे. ही परिषद आपला संकल्प दृढ करो, सहकार्य वाढवो आणि आपल्या पृथ्‍वीसाठी शाश्वत भविष्य सुरक्षित करो. मी डब्‍ल्‍यूएसडीएसच्या या रौप्य महोत्सवी एडिशनमध्‍ये उत्‍पादनक्षम आणि भविष्यवेधी चर्चेसाठी शुभेच्छा देतो."

आपल्या भाषणात टाटा ट्रस्टचे सीईओ सिद्धार्थ शर्मा म्‍हणाले, “ही प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आहे. महत्त्वाचे म्‍हणजे, आपण हवामान बदलाबाबत करत असलेल्‍या चर्चेला प्रत्‍यक्षात कृतीत आणले पाहिजे. हा विषय फक्त परिषदा, बैठका किंवा बोर्डरूममधील चर्चेपुरता मर्यादित राहता कामा नये. तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांना प्रत्‍यक्ष कृतीचा होणारा परिणाम समजला पाहिजे. त्यानंतर आपल्याला स्‍थानिक स्‍तराशी संलग्‍न असलेल्‍या उपायांवर काम करावे लागेल आणि यामध्‍ये आपण निराकरणासह अनुकूलन प्रक्रियेला देखील महत्त्व दिले पाहिजे.''

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

ऑडिओच्या पलीकडे झेप घेणार 'boAt'; नवीन श्रेणी आणि परदेशी बाजारपेठांवर देणार भर

मुंबई। ऑडिओ आणि वेअरेबल्स क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी भारतीय कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ' boAt' (बोट) आता आपल्या वाढीच्या (ग्रोथ) पुढील टप्प्यासाठी नवीन कन्झ्युमर टेक श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी प्रोजेक्टर्स, पर्सनल ग्रूमिंग, चार्जिंग सोल्यूशन्स आणि एंटरटेनमेंट व लाइफस्टाइल तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपल्या अस्तित्वाचा विस्तार करत आहे. कंपनी या पुढील टप्प्याकडे ‘boAt 2.0’ म्हणून पाहत आहे. या अंतर्गत ऑडिओ हा boAt च्या व्यवसायाचा मुख्य पाया राहील, तर नवीन श्रेणी आणि जागतिक बाजारपेठांना भविष्यातील वाढीचे प्रमुख इंजिन म्हणून विकसित करण्यावर भर दिला जाईल. 'boAt 2.0' साठी कंपनी सज्ज: boAt चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव नायर यांनी सांगितले की, "आता आमचा भर पुनर्लाभाकडून (टर्नअराउंड) शाश्वत वाढीकडे आहे. भक्कम ताळेबंद (बॅलन्स शीट), कार्यक्षम शिस्त आणि मजबूत मूळ व्यवसायाच्या जोरावर आम्ही 'boAt 2.0' साठी सज्ज होत आहोत." त्यांनी पुढे नमूद केले की, "आम्ही ऑडिओ व्यवसायातील आमचे अग्रस...

शालेय विद्यार्थ्यांनीही 'सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज' स्पर्धेत सहभागी व्हावे - मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई: 'सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज' ही बहुराज्यीय नवोन्मेष स्पर्धा केंद्रीय कौशल्य विकास विभागाने आयोजित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभाग राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न करत आहे. स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी, नवोन्मेष क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोलापूरस्थित 'स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन'चे सहकार्य घेतले जाईल. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नवोन्मेष क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांनाही पुढे येण्याचे आवाहन केले. 'सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज' स्पर्धेत जिल्हा परिषद आणि इतर शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सोलापूर येथे मंत्रालयात 'स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन' (SIR) सोबत आयोजित बैठकीत मंत्री श्री लोढा बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य नवोन्मेष सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, राज्य नवोन्मेष आणि संशोधन प्रतिष्ठ...

आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड ने लॉन्च केले आकाश इनव्हिक्टस - इंजिनियरिंग 2.0

मुंबई: आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड, जे भारतातील आघाडीच्या परीक्षा-तयारी प्रदात्यांपैकी एक आहे, त्यांनी आकाश इनव्हिक्टस-इंजिनियरिंग 2.0 द्वारे आपल्या अभियांत्रिकी तयारी परिसंस्थेला बळकट केल्याची घोषणा केली आहे. ही एक नवीन कामगिरी-चालित शैक्षणिक रचना आहे, जी जेईई मेन, जेईई ॲडव्हान्स्ड आणि राज्य सीईटी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुव्यवस्थित मार्ग तयार करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. एक ३६०-अंश तयारीचा अनुभव, सहा स्तंभांवर आधारित विद्यार्थ्यांना वर्गात, त्यांच्या पुस्तकांमध्ये, त्यांच्या चाचण्यांमध्ये आणि त्यांना मिळणाऱ्या मार्गदर्शनामध्ये प्रत्येक टप्प्यावर इनव्हिक्टसचा फरक जाणवेल. हा कार्यक्रम सहा स्तंभांवर उभा आहे: परिणाम-केंद्रित शैक्षणिक दृष्टिकोन: प्रत्येक वर्ग, सराव सत्र आणि उजळणी चक्र एका उद्देशाने नियोजित केले जाते — जेईई ॲडव्हान्स्ड, जेईई मेन, बिटसॅट आणि राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमध्ये सर्वोत्तम शक्य रँक मिळवणे. रँक-सिद्ध झालेली शिक्षक टीम: शिक्षक टीम ही आकाश इनव्हिक्टसची सर्वात मोठी ताकद आहे. हीच शैक्षणिक टीम आहे जिने इनव्हिक्टस अभ्यासक...