सीधे मुख्य सामग्री पर जाएं

अजय देवगण यांच्या दमदार आवाजात ‘शतक’चा ट्रेलर प्रदर्शित

‘शतक: संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला बॉलिवूड सुपरस्टार अजय  देवगण यांच्या प्रभावी आवाजामुळे चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या आवाजामुळे ट्रेलरमध्ये गंभीरता आणि भावनिकता वाढली असून प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होते.

ट्रेलरमध्ये त्याग, संघर्ष आणि राष्ट्रप्रथम या भावनेने प्रेरित १०० वर्षांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. शिस्त, सेवा आणि समर्पण यांच्या बळावर समाज आणि देशासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्यांना हा चित्रपट श्रद्धांजली अर्पण करीत आहे.

हा चित्रपट अशा एका विचारसरणीची कथा सांगतो, जिचा काळानुसार अंत होईल असे कधी वाटले होते. मात्र प्रत्येक पिढीसोबत ती अधिक मजबूत होत गेली. गुरुजी एम. एस. गोलवलकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत, संघ ‘काळासारखा अखंड’ असल्याचे चित्रपटात मांडले आहे. लोकांना जोडणे हे या प्रवासाचे मुख्य वैशिष्ट्य राहिले आहे. हा चित्रपट केवळ इतिहास सांगत नाही, तर अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या समजुती आणि गैरसमजांवरही आपली भूमिका मांडतो. 

चित्रपटाबद्दल अजय देवगण म्हणाले की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. एक शतक हे केवळ कालगणनेतील टप्पा नसून, ते पिढ्यान् पिढ्यांच्या बांधिलकी, त्याग आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रतीक आहे. या शंभर वर्षांत संघाने सेवा, एकात्मता आणि सांस्कृतिक ओळख यांविषयीच्या चर्चांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘शतक’ या दीर्घ प्रवासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी या कथेला आवाज देणे हा खरोखरच सन्मान आहे. ही केवळ एका संस्थेची गोष्ट नाही, तर एका विचाराची कथा आहे, जी काळाच्या ओघात अनेक आव्हानांना सामोरे जात ठामपणे उभी राहिली. जिद्द, श्रद्धा आणि सामूहिक ध्येय यांविषयी बोलणाऱ्या या कथेला माझा आवाज देणे ही अत्यंत अर्थपूर्ण अनुभूती आहे."

‘शतक: संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट पॅनोरमा यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. निर्माते वीर कपूर, दिग्दर्शक आशीष मल्ल आणि सहनिर्माते आशीष तिवारी आहेत. हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर सध्या प्रदर्शित झाला आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर पुनर्विकासातून ठाणेकरांना सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य

ठाणे: ठाणे पश्चिमेतील सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर येथील क्लस्टर पुनर्विकासाचा मुख्य उद्देश अनेक पिढ्यांपासून या परिसराला आपले घर मानणाऱ्या कुटुंबांचे राहणीमान उंचावणे हा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रहिवाशांना सुरक्षित, नियोजनबद्ध आणि उच्च दर्जाची घरे उपलब्ध करून देण्याबरोबरच आधुनिक सुविधा, सुधारित पायाभूत सुविधा आणि प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या आणि घरांची गरज लक्षात घेता, पुढील १५ वर्षांत एमएमआरमध्ये ३० लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवले असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सिद्धेश्वर तलाव क्लस्टर प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी विकासकांना हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करून नागरिकांच्या हातात घरांच्या चाव्या देण्याचे निर्देश दिले. सिद्धेश्वर तलाव परिसरात सुमारे ६ हजार नागरिक राहत असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्विकासाला आता गती मिळाली आहे. सुगी ग्रुप या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. क्लस्टर पुनर्विकासाचा प्रमुख उद्देश नागरिकांचे राहणीमान उंचा...

आयटेलने म्युझिक-फर्स्ट फीचर फोन 'म्युझिक ४५० एल' लाँच केला

सुपर लाउड ३डी साऊंड आणि २५०० एमएएच मेगा बॅटरी  मुंबई। भारतातील अग्रगण्य तंत्रज्ञान ब्रँड्सपैकी एक असलेल्या आयटेलने 'आयटेल म्युझिक ४५० एल' या म्युझिक-फर्स्ट फीचर फोनच्या लाँचची घोषणा केली . हा फोन मुख्यत्वे 'सुपर लाउड ३डी साऊंड' या वैशिष्ट्यावर आधारित आहे. टू-इन-वन सुपर लाउड स्पीकर, २५०० एमएएच बॅटरी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, २.४ इंच क्यूव्हीजीए डिस्प्ले आणि १३.४ मिमी स्लिम डिझाइन असलेला हा फोन दैनंदिन मनोरंजन, प्रवास आणि मैदानी वापरासाठी डिझाइन केला गेला आहे. आयटेल म्युझिक ४५० एल हा फोन बस किंवा ट्रेनचा प्रवास, रस्त्यावरील थांबे, मैदानी वातावरण आणि सामाजिक कार्यक्रम यांसारख्या दैनंदिन प्रवासात ग्राहक ज्या पद्धतीने संगीत आणि मनोरंजनाचा आनंद घेतात, ते लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. जिथे सामान्य फोनचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही, अशा ठिकाणीही यातील 'सुपर लाउड ३डी साऊंड'मुळे संगीत, एफएम आणि कॉल्स स्पष्टपणे ऐकू येतात. या लाँचविषयी बोलताना आयटेल इंडिया (ट्रांसन होल्डिंग्स) चे सीईओ अरिजित तालापात्रा म्हणाले, "भारत हा असा देश आहे जिथे दैनंदिन प्रवास, मैद...

'एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६' चे १५वे संस्करण प्रसिद्ध

      मुंबई: एम३एम इंडिया आणि हुरुन इंडिया यांनी ‘एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६ ' चे १५वे संस्करण प्रसिद्ध केले. सध्याचे वास्तव्याचे ठिकाण किंवा पासपोर्ट विचारात न घेता भारतात जन्मलेल्या किंवा लहानाचे मोठे झालेल्या आणि १,००० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या व्यक्तींची ही यादी आहे. ही संपत्ती गणना २४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या स्थितीनुसार करण्यात आली आहे, त्यावेळी प्रति अमेरिकन डॉलरचा विनिमय दर (एक्स्चेंज रेट) ९५.६३ रुपये होता. एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६ मध्ये १६३ शहरांमधील १,८१० व्यक्तींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या १२८ ने वाढली आहे, तसेच यातील १०६ शहरे भारतातील आहेत. या कालावधीत निफ्टी ५० मध्ये ३.९ टक्‍के आणि सेन्सेक्समध्ये ५.८ टक्‍के घसरण झाली असली, तरी या सर्वांची एकत्रित संपत्ती १२.८ टक्‍क्‍यांनी वाढून १८७.५ लाख कोटी रुपयांवर (१.९६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स) पोहोचली आहे. भारतात आता विक्रमी ३९१ डॉलर अब्जाधीश असून गेल्या वर्षापेक्षा ही संख्या २७ ने अधिक आहे. गौतम अदानी (६४) आणि कुटुंबियांनी ९.२३ लाख कोटी रुपयांच्या संपत्ती...