सीधे मुख्य सामग्री पर जाएं

फोनपेतर्फे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसह यूपीआय पेमेंट्सची सुविधा सुरू

मुंबई। फोनपेतर्फे आज यूपीआय पेमेंट्ससाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुविधा सुरू केल्याची घोषणा करण्यात आली असून, या सुविधेमुळे वापरकर्त्यांना अधिक जलद आणि सहज ‘वन-टच’ पेमेंट अनुभव मिळणार आहे. या नव्या सुविधेच्या माध्यमातून युजर त्यांच्या स्मार्टफोनमधील नेटिव्ह सिक्युरिटी, उदा. फिंगरप्रिंट किंवा फेस रिकग्निशनचा वापर करून व्यवहार ऑथोराइझ करू शकतात, त्यामुळे प्रत्येक व्यवहारासाठी यूपीआय पिन मॅन्युअली एंटर करण्याची आवश्यकता राहणार नाही. या सुविधेमुळे, फोनपे हे मोठ्या प्रमाणावर ही क्षमता प्रत्यक्षात उपलब्ध करून देणाऱ्या आघाडीच्या पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक ठरले आहे.

युजरच्या पेमेंट प्रवासातील सामान्य अडथळे दूर करून डिजिटल पेमेंट्सची सुरक्षितता आणि विश्वासार्हता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही सुविधा तयार करण्यात आली आहे. डिव्हाइस स्तरावरील बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनचा वापर केल्यामुळे गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणीही युजर सुरक्षितपणे व्यवहार करू शकतात आणि ‘शोल्डर सर्फिंग’ किंवा UPI पिन उघड होण्याचा धोका प्रभावीपणे टाळला जातो. सुरक्षिततेबरोबरच, विसरलेला किंवा चुकीचा यूपीआय पिन एंटर केल्यामुळे होणारे व्यवहार अयशस्वी होण्याचे प्रमाण कमी झाल्याने या एकात्मिक सुविधेमुळे व्यवहार यशस्वी होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. सातत्यपूर्ण अनुभवासाठी या सुविधेमध्ये फॉलबॅक यंत्रणा देण्यात आली असून, प्रकाश कमी असेल किंवा सेन्सरशी संबंधित अडचणींमुळे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनमध्ये अडथळा आल्यास युजर त्वरित त्यांच्या नेहमीच्या यूपीआय पिनचा वापर करून व्यवहार करू शकतात.

सध्याच्या नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ही ‘वन-टच’ पद्धत ₹५,००० पर्यंतच्या UPI व्यवहारांसाठी डिव्हाइस स्तरावरील बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनचा सुरक्षित टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन लेयर म्हणून वापर करते. या मर्यादेपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी कमाल सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यूपीआय पिन ऑथेंटिफिकेशन आवश्यक असेल. युजरना ही बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुविधा दैनंदिन वापरातील विविध ठिकाणी वापरता येणार असून, यामध्ये पीअर-टू-पीअर मनी ट्रान्सफर, दुकानांमध्ये क्यूआर स्कॅन करून पेमेंट करणे, ऑनलाइन पेमेंट्स तसेच बँक बॅलन्स तपासणे यांचा समावेश आहे.

सुविधेच्या लाँचबद्दल फोनपेचे पेमेंट्स विभाग प्रमुख दीप अग्रवाल म्हणाले, “प्रत्येक भारतीयासाठी डिजिटल पेमेंट्स अधिक सहज, समजण्यास सोपे आणि ॲक्सेसिबल करणे हेच फोनपेमध्ये आमचे ध्येय राहिले आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची एकात्मिक सुविधा देऊन आम्ही खऱ्या अर्थाने सुलभ व विनाअडथळा पेमेंट अनुभवाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ही सुविधेमुळे वेळेची बचत होतेच, त्याचप्रमाणे युजरना त्यांच्या दैनंदिन परिस्थितीत सुरक्षित ठेवणारी हार्डवेअर-ग्रेडचा सुरक्षा स्तर मिळतो. सामान्य अडथळे दूर करून आम्ही डिजिटल पेमेंट्स सर्वांसाठी अधिक सुलभ आणि सुरक्षित करत असल्याचा आम्हाला विश्वास आहे.”

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...