सीधे मुख्य सामग्री पर जाएं

फेडएक्सने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हबची पायाभरणी केली

• २,५०० कोटी रु. पेक्षा अधिक दीर्घकालीन गुंतवणुकीसह फेडएक्स एनएमआयए येथे एक ३००,००० चौ. फुटात विस्तारलेला संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हब विकसित करणार

• ही सुविधा भारताला दक्षिण-पूर्व आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिकेला जोडणारा एक स्थानिक हब म्हणून कार्य करेल

• पश्चिम भारताचा आंतरराष्ट्रीय ट्रेड कॉरिडॉर सशक्त करण्यासाठी हा हब एनएमआयएच्या मल्टी-मोडल इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग करेल

नवी मुंबई: फेडएक्स आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) यांनी फेडएक्सच्या संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हबच्या उभरणीचा शुभारंभ केला. हा उपक्रम भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय ट्रेड कॉरिडॉरमधील क्षमता वाढवेल तसेच पश्चिम भारतासाठी एकात्मिक लॉजिस्टिक्स आणि व्यापार प्रवेशद्वार म्हणून त्यांची भूमिका मजबूत करेल.

फेडएक्सद्वारा करण्यात आलेली २,५०० कोटी रु. ची दीर्घकालीन गुंतवणूक प्रस्तावित ३००,००० चौ. फुट सुविधेस साहाय्य करेल. ही सुविधा प्रादेशिक एकीकरण आणि पुनर्वितरण केंद्र म्हणून डिझाईन करण्यात आली असून अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज लि. (एएएचएल) यांच्या भागीदारीत विकसित करण्यात येत आहे. हा हब पश्चिम भारताचा आंतरराष्ट्रीय ट्रेड कॉरिडॉर सशक्त करण्यासाठी एनएमआयए च्या मल्टी-मोडल इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग करेल. हा हब जेव्हा कार्यरत होईल, तेव्हा लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, वाहतूक आणि संबंधित सेवाक्षेत्रात ६,००० पेक्षा जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण करेल असे अनुमान आहे.

प्रस्तुत समारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, फेडएक्सचे अध्यक्ष आणि सीईओ राज सुब्रमण्यम, फेडएक्सचे सीओओ, इंटरनॅशनल आणि सीईओ, एअरलाइन- रिचर्ड स्मिथ, फेडएक्स मध्य पूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिका (एमइआयएसए)चे अध्यक्ष कामी विश्वनाथन आणि एएएचएलचे संचालक जीत अदाणी यांच्या उपस्थितीत साजरा झाला.

एएएचएलचे संचालक जीत अदाणी म्हणाले, “भारताची व्यापाराची स्पर्धात्मकता मजबूत करणारे एकात्मिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची एनएमआयए ची दीर्घदृष्टी या घडामोडीतून दिसून येते. जवाहरलाल नेहरू बंदर, औद्योगिक कॉरिडॉर आणि मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट नेटवर्क जवळ असल्यामुळे एनएमआयए उच्च-विकासाच्या निर्यात क्षेत्रांना पाठबळ देण्यासाठी मोक्याच्या स्थानी आहे आणि जागतिक लॉजिस्टिक्सचे प्रवेशद्वार म्हणून महाराष्ट्राची भूमिका अधिक सशक्त करते.”

फेडएक्स एमईआयएसएच्या अध्यक्ष कामी विश्वनाथन म्हणाल्या, “जागतिक व्यापारातील भारताची स्पर्धात्मकता भारताच्या लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चरची विश्वासार्हता आणि गती यांच्यावर दिवसेंदिवस अधिक विसंबून असणार आहे.  एनएमआयए येथे हा हब उभरल्यामुळे आम्ही जागतिक नेटवर्कची ताकद आणि भारताच्या सर्वात जलद विकसित होणाऱ्या ट्रेड कॉरिडॉरची सांगड घालू शकू आणि ग्राहकांना दृढ खात्री, वेग आणि कार्यक्षमता प्रदान करू शकू.”

हा उपक्रम दक्षिणपूर्व आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिकेतील व्यापार प्रवाहाला पाठबळ मिळेल आणि जागतिक नेटवर्क कनेक्टिव्हिटी थेट भारताच्या प्रमुख ट्रेड कॉरिडॉरमध्ये समाविष्ट होईल. प्रगत ऑटोमेटेड सॉर्टिंग सिस्टम्स, डायमेन्शनल स्कॅनिंग, हाय-स्पीड स्क्रीनिंग टेक्नॉलॉजी आणि खास एअरक्राफ्ट पार्किंग बेज यांनी सुसज्ज असलेले हे केंद्र एकाच वेळी इनबाउंड आणि आउटबाउंड शिपमेंट्सवर प्रक्रिया करू शकेल, रूटिंगची लवचिकता वाढवेल आणि वाहतुकीच्या वेळेचे बऱ्यापैकी अनुमान करू शकेल. या क्षमतांचा लाभ खास करून इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनियरिंगचे सामान, फार्मास्यूटीकल्स आणि पेरिशेबल (नष्ट होणाऱ्या) वस्तूंसारख्या उच्च मूल्याच्या आणि जेथे वेळ मोलाचा असतो अशा क्षेत्रांना मिळेल. सुधारित विश्वसनीयतेमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) आयात-निर्यात क्षमतांना देखील बळ मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्याच वेळी, लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल आणि टर्न-अराऊंड टाइमही कमी होईल.

एनएमआयएचे कार्गो इन्फ्रास्ट्रक्चर वार्षिक सुमारे ०.५ मिलियन मेट्रिक टन (एमएमटी) इतक्या प्रारंभिक हॅंडलिंग क्षमतेसह सुरू करण्यात येईल आणि टप्प्याटप्प्यात वाढ करून अंतिम विकासाच्या टप्प्यात 3.25 एमएमटीपर्यंत ही क्षमता नेण्यात येईल. मोजून मापून केलेला हा क्षमता-विस्तार मुंबई महानगर क्षेत्राला (एमएमआर) भारतातील एक अत्यंत प्रगत एअर फ्रेट आणि लॉजिस्टिक्स प्रवेशद्वार म्हणून स्थापित करण्याच्या विमानतळाच्या दीर्घकालीन धोरणाला पाठबळ देतो.

भारतातील सुमारे तीन दशकाच्या संचालन अनुभवावर आधारित, हा हब फेडएक्सच्या समर्पित उपस्थितीचा विस्तार करतो आणि जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये एक इंटिग्रेटेड एव्हीएशन आणि मल्टीमोडल ट्रेड फ्लॅटफॉर्म म्हणून एनएमआयएच्या भूमिकेला पाठबळ देतो.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

पर्नोड रिकार्डकडून वंचित तरुणांना शिक्षण व रोजगाराची मोठी संधी

२५०० हून अधिक विद्यार्थ्यांना ११.६८ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती  मुंबई। पर्नोड रिकार्ड इंडिया फाउंडेशन (पीआरआयएफ) ने युथ ड्रीमर्स फाउंडेशनसोबत भागीदारी करून वंचित समुदायातील तरुणांना शिक्षण, कौशल्य विकास आणि अर्थपूर्ण रोजगाराचे मार्ग उपलब्ध करून देत त्यांना सक्षम करण्याचे कार्य अधिक वेगाने पुढे नेले आहे. २०१९ पासून सुरू असलेल्या 'PRIF शिष्यवृत्ती सहाय्य कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानमधील २,५७६ विद्यार्थ्यांना यशस्वीपणे सहाय्य करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत थेट शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ६.९१ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, सरकारी आणि खाजगी शिष्यवृत्ती योजनांद्वारे आणखी ४.७७ कोटी रुपयांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण ११.६८ कोटी रुपयांचे शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. केवळ आर्थिक मदत न देता तरुणांना शिक्षणापासून थेट रोजगारापर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी शिष्यवृत्तीसोबतच मार्गदर्शन, करिअर गाईडन्स आणि रोजगारासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. बदलत्या तंत्रज्ञानानुसार तरुणांना सक्षम करण्यासाठी पीआ...

कॉईनडीसीएक्सची दैनिक आणि मासिक एसआयपी सुविधा

अवघ्या १०० रुपयांच्या गुंतवणुकीसह क्रिप्टो गुंतवणूक केली अधिक सुलभ  मुंबई। भारतातील प्रमुख क्रिप्टो एक्सचेंज असलेल्या कॉईनडीसीएक्सने आपल्या 'दैनिक एसआयपी' सुविधेची घोषणा केली आहे. कंपनीच्या आधीपासूनच लोकप्रिय असलेल्या मासिक एसआयपी सुविधेचा हा एक नवीन विस्तार असून, याद्वारे वापरकर्त्यांना आता दररोज अवघ्या १०० रुपयांपासून क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करता येईल. ही नवीन सुविधा गुंतवणूक प्रक्रियेस सोपी, स्वयंचलित आणि सहज ठेवण्यासोबतच, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अधिक नियमितता प्रदान करते. याव्यतिरिक्त, कॉईनडीसीएक्सने एक्सआयआरआर ट्रॅकिंग देखील सुरू केले आहे. हे उद्योग क्षेत्रातील एक मानक मूल्य आहे, जे आवर्ती (रिकरिंग) गुंतवणुकीतून मिळणाऱ्या वार्षिक परताव्याचे अचूक चित्र मांडते आणि वेळेनुसार पोर्टफोलिओच्या कामगिरीचे योग्य मूल्यमापन करण्यास वापरकर्त्यांना मदत करते. या सुधारणेबाबत बोलताना, कॉईनडीसीएक्सचे एक्झिक्युटिव्ह व्हीपी - ग्रोथ अँड क्रिप्टो बिझनेस हेड, मिनाल ठुकराल म्हणाले, "एसआयपी हे कॉईनडीसीएक्स वरील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक उत्पादनांपैकी एक राहिले आहे आणि दैनिक तसेच मा...

खाडी देशांमध्ये महिलांसाठी सात ‘वन-स्टॉप सेंटर’

संकटग्रस्त भारतीय महिला कामगारांना तातडीने मदत; वैद्यकीय, कायदेशीर सेवांसह समुपदेशनाची सुविधा मुंबई। खाडी देशांमध्ये रोजगारासाठी गेलेल्या भारतीय महिला कामगारांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, त्यांच्या मदतीसाठी खाडीतील प्रमुख शहरांमध्ये सात ‘वन-स्टॉप सेंटर’ सुरू करण्यात आली आहेत. संकटात सापडलेल्या भारतीय महिलांना तातडीने आणि समन्वयाने मदत मिळावी, हा या केंद्रांचा उद्देश आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. राज्यसभा सदस्य राजीव सिंह यांनी खाडी देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाडी देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. त्यापैकी संयुक्त अरब अमिरातीमध्ये ४५ लाख, सौदी अरेबियात २७ लाख, कुवेतमध्ये १० लाख, कतारमध्ये ८.२० लाख, ओमानमध्ये ६.७० लाख आणि बहरीनमध्ये ३.१० लाख भारतीय आहेत. २०१४ ते जून २०२६ या...