सीधे मुख्य सामग्री पर जाएं

फोर्स मोटर्सकडून नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंज लाँच

मुंबई। फोर्स मोटर्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या व्हॅनमेकर आणि आघाडीच्‍या ऑटोमोटिव्ह कंपनीने नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंज लाँच केली. या श्रेणीमध्ये रुग्णवाहिका, डिलिव्हरी व्हॅन आणि स्कूल बस या उपयोगांसाठीच्या वेईकल्‍सचा समावेश आहे.

कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये लक्षणीय भर टाकणारी ही नवीन श्रेणी आराम, सुविधा, विश्वासार्हता आणि कामगिरीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणते. तसेच, यामुळे मालकीचा एकूण खर्च कमी होण्यास आणि देखभाल प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे. नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंज प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांना अधिक प्रगत आणि उच्‍च दर्जाचा अनुभव प्रदान करते. या लाँचसह, फोर्स मोटर्स आता पूर्णपणे नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंजकडे वळणार आहे, भविष्यातील सर्व उत्पादन या नवीन श्रेणीनुसार केले जाईल. ही नवीन श्रेणी सध्याच्या पिढीतील ट्रॅव्हलरची जागा घेईल.

चार दशकांहून अधिक काळ लाभलेला वारसा असलेला फोर्स ट्रॅव्हलर या क्षेत्रातील खऱ्या अर्थाने नवीन श्रेणी निर्माण करणारा ब्रँड आहे, जो ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बाजारपेठेतील हिश्श्यासह आजही आघाडीवर आहे. रुग्णवाहिका आणि स्कूल बसपासून ते डिलिव्हरी व्हॅनपर्यंत विविध गरजा पूर्ण करणाऱ्या ट्रॅव्हलरने उद्योगात नवनवीन मानके प्रस्थापित केली आहेत. ट्रॅव्‍हलर भारतातील सर्वात पसंतीचे रुग्णवाहिका प्लॅटफॉर्म आणि आपल्या श्रेणीतील सर्वात वेगाने वाढणारी स्कूल बस उत्पादक म्हणून समोर आली आहे.

नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंजच्या लाँचप्रसंगी आपले मत व्यक्त करत फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया म्हणाले, "फोर्स ट्रॅव्हलर अनेक वर्षांपासून भारतातील सामायिक गतिशीलता क्षेत्रात प्रस्थापित उत्पादन असून आपल्या सेगमेंटमध्ये नेतृत्व करत आहे.

नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंजच्या माध्यमातून आम्ही महत्त्वाच्या बाबी सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मालक, चालक आणि प्रवासी यांच्याकडून मिळालेल्या अभिप्रायांच्‍या आधारे आम्ही आराम, उपयुक्तता, विश्वासार्हता आणि मालकीचा खर्च यात सुधारणा केली आहे. तसेच, दुरुस्तीसाठी लागणारा वेळ कमी करून फ्लीट ऑपरेटर्सना त्यांच्या वाहनांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करता येईल, याची खात्री केली आहे.

तसेच, आम्ही ट्रॅव्हलरच्या रचनेची प्रक्रिया अधिक मजबूत केली आहे. अर्बनियाकडून मिळालेल्या अनुभवामुळे आम्हाला आमची उत्पादन प्रक्रिया आणि गुणवत्ता प्रणाली अधिक सुधारित करण्यास मदत झाली आहे, ज्यामुळे रचनेमध्ये अधिक सुसंगतता आणि सुधारित दर्जा आला आहे. अनेक अर्थांनी, नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंज ही फोर्स ट्रॅव्हलरने गेल्या अनेक वर्षांत कमावलेल्या दृढ विश्वासावर आधारित आहे. पण,  आता ही वेईकल अधिक प्रगत, सक्षम आणि आजच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक सज्ज झाली आहे."

प्रत्यक्ष वापराच्या सुलभतेवर लक्ष केंद्रित करून नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंज उत्पादनाच्या अनुभवामध्ये सर्वसमावेशक सुधारणा घेऊन आली आहे. केबिनमधील वातावरणाचा दर्जा लक्षणीयरित्या वाढवताना यात अधिक आधुनिक आणि कारसारखा अनुभव देणारे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये डिजिटल क्लस्टर आणि ९-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीनसह पूर्णपणे नवीन कार-सारखे कॉकपीट, नवीन एर्गोनॉमिकली डिझाइन करण्‍यात आलेल्‍या आरामदायी सीट्स आणि केबिनमधील शांततेसाठी सुधारित एनव्‍हीएच लेव्हलचा समावेश आहे. या सोयींना अधिक प्रभावी कुलिंग देणाऱ्या नवीन एचव्‍हीएसी यंत्रणेची जोड देण्यात आली आहे. वेईकलचे व्हिज्‍युअल अपील अधिक आकर्षक करण्‍यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी बाह्य भागातही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्यामध्ये डीआरएल व एलईडी टर्न इंडिकेटर्ससह नवीन फ्रंट फॅसिआ (समोरील भाग) आणि आधुनिक दिसणारा रिडिझाइन केलेला रिअर फॅसिआ'(मागील भाग) यांचा समावेश आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

अभिनेत्री ज़ारा पटेल दोन चित्रपटांमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून

मुंबई। आपल्या प्रतिभेने, मेहनतीने आणि अभिनयाप्रती असलेल्या समर्पणाने मनोरंजन विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केलेली अभिनेत्री ज़ारा पटेल आता मोठ्या पडद्यावर एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. तिचे दोन हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. एका चित्रपटाचे चित्रीकरण आधीच पूर्ण झाले असून, दुसरा अंतिम टप्प्यात आहे. ज़ारा या दोन चित्रपटांमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ज़ारा दोन्ही चित्रपटांमध्ये पूर्णपणे भिन्न आणि आव्हानात्मक भूमिका साकारणार आहे. एका चित्रपटात ती एका भारतीय गुप्तहेराची (गुप्तचर अधिकारी) भूमिका साकारणार आहे, तर दुसऱ्या चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती एक कडक पोलीस अधिकारी आणि एक मनमोकळी, उत्साही आणि निश्चिंत गावची मुलगी अशा दोन भूमिका साकारणार आहे. झारा सांगते की, तिने दोन्ही भूमिकांसाठी स्वतंत्रपणे तयारी केली असून, आजपर्यंतच्या तिच्या भूमिकांपैकी या सर्वात आव्हानात्मक आहेत. तिरुपती प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटांचे दिग्दर्शन अजित वर्मा करत आहेत. ज़ारा सांगते की दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तिची प्रतिभा ओळखली आणि ति...

जुही तिवारी: लहानपणापासून अभिनयाचा प्रवास, आता एका हिंदी चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण करत आहे

मुंबई। आपल्या प्रतिभेने, मेहनतीने आणि समर्पणाने मनोरंजन क्षेत्रात झपाट्याने ओळख मिळवलेली अभिनेत्री जुही तिवारी आता तिच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. लहानपणापासून दूरदर्शन मालिका आणि विविध मालिकांमध्ये काम करत असल्यामुळे, जुहीने लहान वयातच अनुभवातून अभिनयातील बारकावे शिकले आहेत आणि स्वतःला सतत अधिक निखारले आहे. तिचा आत्मविश्वास, सहजसुंदर अभिनय आणि शिकण्याची उत्सुकता तिला नव्या पिढीतील उदयोन्मुख प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक बनवते. अभिनयाव्यतिरिक्त, जुही तिवारी मॉडेलिंगच्या जगातही सक्रिय आहे. तिने दागिने, साड्या, सौंदर्यप्रसाधने आणि इतर प्रतिष्ठित ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये आपली छाप सोडली आहे. अनेक संगीत अल्बममधील तिच्या अभिनयाचेही कौतुक झाले आहे. कॅमेऱ्यासमोरचा तिचा सहजसुंदर अभिनय आणि पडद्यावरील वावर तिला नवनवीन संधी मिळवून देत आहे. आता, जुही तिवारी तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तराखंडमधील सुंदर शहर डेहराडूनच्या निसर्गरम्य खोऱ्यांमध्ये सुरू आहे. हा चित्रपट पुढी...

सॅमसंगने ३०-महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय प्लॅन लॉन्च केला

मुंबई। सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ साठी ३०-महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांच्या लाँचसह प्रीमियम स्मार्टफोन मालकीला नव्या उंचीवर घेऊन जात आहे, ज्यामुळे सॅमसंगच्या आधुनिक फोल्डेबल नाविन्यता सुलभपणे उपलब्‍ध होत आहेत. मासिक मालकीचा अडथळा कमी करण्यासाठी डिझाइन केलेले नवीन फायनान्सिंग पर्याय अधिकाधिक ग्राहकांना शून्य डाऊन पेमेंटसह गॅलेक्सी एआयद्वारे समर्थित सॅमसंगच्या नवीन गॅलेक्सी झेड सिरीजचा अनुभव घेण्याची सुविधा देतो. फोल्डेबल नाविन्यतेचे सात जनरेशन्स आणि ग्राहकांच्या अभिप्रायावर डिझाइन केलेली सॅमसंगची नवीन गॅलेक्सी झेड सिरीज हिंग डिझाइन, डिस्प्ले, टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेमध्ये उत्कृष्ट अभियांत्रिकीसह विशेष हेतूने बनवलेले गॅलेक्सी एआय एकत्रित करून आतापर्यंतचा सर्वात परिष्कृत फोल्डेबल अनुभव देते. हे नवीन फायनान्सिंग प्रपोजल सॅमसंगचे नवीन फोल्डेबल अनुभव खरेदी करणे सोपे करून या नाविन्यतेचा डिवाईसच्या पलीकडे विस्तार करते. ग्राहक आता गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा प्रति महिना फक्त ६६६७ रुपये यापासून सुरू होणार्‍या ईएमआयसह खरेदी ...