सीधे मुख्य सामग्री पर जाएं

यामी गौतम धर यांचा 'द अँबर प्रॉमिस फॉर विमेन्स हेल्थ' उपक्रमात सहभाग

यामी ने महिलांना प्रतिबंधात्मक आरोग्य आणि आजारांच्या लवकर निदानावर अधिक लक्ष केंद्रित करणारा संदेश दिला

मुंबई। महिला आणि मुलांच्या आरोग्य सेवांमधील उत्कृष्टतेचे प्रतीक असलेल्या सूर्या हॉस्पिटल्सने 'अँबर विंग' या केवळ महिलांसाठी समर्पित आरोग्य सुविधेचे उद्घाटन केले. ही सुविधा महिलांसाठी विशेष, प्रतिबंधात्मक आणि प्रगत आरोग्य सेवा सादर करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री आणि आरोग्य जागृती समर्थक श्रीमती यामी गौतम धर यांच्यासह ज्येष्ठ डॉक्टर, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सूर्या हॉस्पिटल्सचे नेतृत्व संघ उपस्थित होते.

डॉ. भूपेंद्र एस.अवस्थी, संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सूर्या हॉस्पिटल्स म्हणाले,"महिलांच्या आरोग्यासाठी केवळ प्रतिबंधात्मक आणि निदानात्मक गरजाच नव्हे, तर विशेष शस्त्रक्रियेच्या हस्तक्षेपांची पूर्तता करू शकेल अशा समर्पित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. अँबर विंगची निर्मिती महिलांसाठी एक प्रगत शस्त्रक्रिया केंद्र म्हणून करण्यात आली आहे, ज्यामुळे आमच्या सध्याच्या युनिटच्या क्षमतेत मोठी भर पडेल आणि विशेष शस्त्रक्रिया, क्रिटिकल केअर आणि एकत्रित उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध होतील. जागतिक दर्जाच्या आरोग्य परिसंस्थेच्या माध्यमातून महिलांना वेळेवर निदान, प्रगत शस्त्रक्रिया नैपुण्य आणि संवेदनशील काळजी प्रदान करणे, हे आमचे ध्येय आहे."

भारतातील एकत्रित आणि विशेष महिला आरोग्य पायाभूत सुविधांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी अँबर विंगची संकल्पना मांडण्यात आली यामध्ये अतिरिक्त ५५ बेड्समुळे सांताक्रूझ येथील समर्पित महिला व बाल-केंद्रित आरोग्य पायाभूत सुविधेची एकूण क्षमता २५० पेक्षा जास्त खाटांवर पोहोचली आहे, विशेष सल्लागार कक्ष, प्रगत निदान आणि स्क्रीनिंग सहाय्य, कार्डिओलॉजी आणि कार्डियाक सर्जरी, अँब्युलेटरी आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेसाठी उत्कृष्ट केंद्र, प्लास्टिक आणि कॉस्मेटिक शस्त्रक्रिया, किमान आक्रमक गॅस्ट्रोइंटेस्टाइनल शस्त्रक्रिया, अत्याधुनिक क्रिटिकल केअर सुविधा, रोबोटिक सर्जरीसाठी उत्कृष्ट केंद्र (लवकरच येत आहे), महिलांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी कार्यक्रम.

अभिनेत्री यामी गौतम धर म्हणाल्या,"अनेक महिला स्वतःच्या आरोग्यापेक्षा कुटुंबाच्या कल्याणाला प्राधान्य देतात, त्यामुळे त्यांचे आरोग्य अनेकदा दुर्लक्षित राहते. अँबर विंगसारखे समर्पित आरोग्य उपक्रम वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे, नियमित तपासणी (screenings), प्रतिबंधात्मक काळजीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि गरज पडल्यास विशेष शस्त्रक्रिया उपचार उपलब्ध करून देणे यासाठी महत्त्वाचे आहेत. महिलांचे आरोग्य आणि आजारांचे लवकर निदान यावर विशेष लक्ष केंद्रित करणाऱ्या या उपक्रमाला पाठिंबा देताना मला मनापासून आनंद होत आहे."

डॉ.भुवन डी, झोनल डायरेक्टर, सूर्या हॉस्पिटल्स म्हणाले,"नवीन अँबर विंग हा संपूर्ण मुंबईतील रुग्णांसाठी प्रगत शस्त्रक्रिया निगा प्रबळ करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही सुविधा आम्हाला आधुनिक पायाभूत सुविधा आणि बहुशाखीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्डियाक सायन्सेस, कार्डियाक सर्जरी, ऑर्थोपेडिक्स आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी यांसारख्या प्रमुख विभागांची ओळख करून देण्यास आणि त्यांचा विस्तार करण्यास सक्षम करेल. या विस्तारामुळे, प्रगत क्लिनिकल सेवांची उपलब्धता सुधारणे आणि तंत्रज्ञान, नैपुण्य व समन्वयित वैद्यकीय सहाय्याद्वारे दर्जेदार आरोग्य सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे."

या लाँचचा एक भाग म्हणून, सूर्या हॉस्पिटल्सने 'द अँबर प्रॉमिस फॉर विमेन्स हेल्थ' हा एक प्रतीकात्मक जागरूकता उपक्रम देखील सुरू केला आहे. महिलांना प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, नियमित तपासणी आणि वेळेवर वैद्यकीय मदतीला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करणे हे याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमात पाहुणे, डॉक्टर, आरोग्य तज्ज्ञ आणि उपस्थितांना महिलांचे आरोग्य आणि प्रतिबंधात्मक काळजीबद्दल त्यांचे संदेश आणि वचनबद्धता सामायिक करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले, ज्यामुळे महिलांमध्ये अधिक जागरूकता आणि पुढाकार घेण्याच्या वृत्तीची गरज अधोरेखित झाली.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर पुनर्विकासातून ठाणेकरांना सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य

ठाणे: ठाणे पश्चिमेतील सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर येथील क्लस्टर पुनर्विकासाचा मुख्य उद्देश अनेक पिढ्यांपासून या परिसराला आपले घर मानणाऱ्या कुटुंबांचे राहणीमान उंचावणे हा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रहिवाशांना सुरक्षित, नियोजनबद्ध आणि उच्च दर्जाची घरे उपलब्ध करून देण्याबरोबरच आधुनिक सुविधा, सुधारित पायाभूत सुविधा आणि प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या आणि घरांची गरज लक्षात घेता, पुढील १५ वर्षांत एमएमआरमध्ये ३० लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवले असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सिद्धेश्वर तलाव क्लस्टर प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी विकासकांना हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करून नागरिकांच्या हातात घरांच्या चाव्या देण्याचे निर्देश दिले. सिद्धेश्वर तलाव परिसरात सुमारे ६ हजार नागरिक राहत असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्विकासाला आता गती मिळाली आहे. सुगी ग्रुप या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. क्लस्टर पुनर्विकासाचा प्रमुख उद्देश नागरिकांचे राहणीमान उंचा...

आयटेलने म्युझिक-फर्स्ट फीचर फोन 'म्युझिक ४५० एल' लाँच केला

सुपर लाउड ३डी साऊंड आणि २५०० एमएएच मेगा बॅटरी  मुंबई। भारतातील अग्रगण्य तंत्रज्ञान ब्रँड्सपैकी एक असलेल्या आयटेलने 'आयटेल म्युझिक ४५० एल' या म्युझिक-फर्स्ट फीचर फोनच्या लाँचची घोषणा केली . हा फोन मुख्यत्वे 'सुपर लाउड ३डी साऊंड' या वैशिष्ट्यावर आधारित आहे. टू-इन-वन सुपर लाउड स्पीकर, २५०० एमएएच बॅटरी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, २.४ इंच क्यूव्हीजीए डिस्प्ले आणि १३.४ मिमी स्लिम डिझाइन असलेला हा फोन दैनंदिन मनोरंजन, प्रवास आणि मैदानी वापरासाठी डिझाइन केला गेला आहे. आयटेल म्युझिक ४५० एल हा फोन बस किंवा ट्रेनचा प्रवास, रस्त्यावरील थांबे, मैदानी वातावरण आणि सामाजिक कार्यक्रम यांसारख्या दैनंदिन प्रवासात ग्राहक ज्या पद्धतीने संगीत आणि मनोरंजनाचा आनंद घेतात, ते लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. जिथे सामान्य फोनचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही, अशा ठिकाणीही यातील 'सुपर लाउड ३डी साऊंड'मुळे संगीत, एफएम आणि कॉल्स स्पष्टपणे ऐकू येतात. या लाँचविषयी बोलताना आयटेल इंडिया (ट्रांसन होल्डिंग्स) चे सीईओ अरिजित तालापात्रा म्हणाले, "भारत हा असा देश आहे जिथे दैनंदिन प्रवास, मैद...

'एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६' चे १५वे संस्करण प्रसिद्ध

      मुंबई: एम३एम इंडिया आणि हुरुन इंडिया यांनी ‘एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६ ' चे १५वे संस्करण प्रसिद्ध केले. सध्याचे वास्तव्याचे ठिकाण किंवा पासपोर्ट विचारात न घेता भारतात जन्मलेल्या किंवा लहानाचे मोठे झालेल्या आणि १,००० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या व्यक्तींची ही यादी आहे. ही संपत्ती गणना २४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या स्थितीनुसार करण्यात आली आहे, त्यावेळी प्रति अमेरिकन डॉलरचा विनिमय दर (एक्स्चेंज रेट) ९५.६३ रुपये होता. एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६ मध्ये १६३ शहरांमधील १,८१० व्यक्तींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या १२८ ने वाढली आहे, तसेच यातील १०६ शहरे भारतातील आहेत. या कालावधीत निफ्टी ५० मध्ये ३.९ टक्‍के आणि सेन्सेक्समध्ये ५.८ टक्‍के घसरण झाली असली, तरी या सर्वांची एकत्रित संपत्ती १२.८ टक्‍क्‍यांनी वाढून १८७.५ लाख कोटी रुपयांवर (१.९६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स) पोहोचली आहे. भारतात आता विक्रमी ३९१ डॉलर अब्जाधीश असून गेल्या वर्षापेक्षा ही संख्या २७ ने अधिक आहे. गौतम अदानी (६४) आणि कुटुंबियांनी ९.२३ लाख कोटी रुपयांच्या संपत्ती...