सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सॅमसंग आणि गुगलने दिली नवीन इंटेलिजेंट आयवेअरची पहिली झलक

मुंबई। सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड आणि गुगलने गुगल आय/ओ २०२६ मध्ये आयवेअर भागीदार जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्कर यांच्या सहयोगाने डिझाइन केलेल्‍या दोन प्रीमियम मॉडेल्सची पहिली झलक दाखवत नवीन इंटेलिजेंट आयवेअरचे अनावरण केले. मोबाइल फोनसाठी सहयोगी डिवाईस म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेले हे नवीन आयवेअर वापरकर्त्‍यांना आवाजाच्या संवादाद्वारे मदत मिळवण्यास आणि त्यांच्या फोनशी विनासायासपणे जोडले जाण्यास सक्षम करते, जेथे ही सुविधा नेहमीच्या चष्म्याच्या रचनेत मिळते.

आयवेअर भागीदारांसह सह-निर्मित केलेले हे इंटेलिजेंट आयवेअर क्रांतिकारी एआय क्षमतांना आराम आणि शैलीसोबत एकत्र आणते, ज्यामध्ये सॅमसंगचे हार्डवेअर इंजिनिअरिंगमधील अग्रस्थान आणि गुगलचे एआय तंत्रज्ञान प्रीमियम आयवेअर डिझाइनशी जोडले गेले आहे. प्रत्येक आयवेअर ब्रँड या डिवाईसला वेगळा डिझाइन दृष्टिकोन देतो. फॅशन आयवेअरमधील आपल्या परंपरेसाठी प्रसिद्ध असलेले जेंटल मॉन्स्टर हे नाविन्यपूर्ण तरीही सुबक शैली सादर करते, तर वॉर्बी पार्कर परिष्कृत आणि चिरंतन डिझाइन्सचे प्रदर्शन करते.

वापरकर्त्‍यांच्‍या सोबतीने रिअल टाइममध्ये जगाला समजून घेण्यासाठी तयार केलेले हे नवीन इंटेलिजेंट आयवेअर वापरकर्त्‍यांचे हात मोकळे ठेवून आणि त्यांचे लक्ष समोर ठेवून दैनंदिन मदत पुरवते. वापरकर्ते फक्त आपल्या आवाजाद्वारे जेमिनीला विचारून नेव्हिगेशन मदत मिळवू शकतात, त्यांच्या चालण्याच्या मार्गावरील जवळचे कॉफी शॉप सारखे वैयक्तिकृत सल्ले मिळवू शकतात किंवा पिकअपसाठी ऑर्डर देखील देऊ शकतात. वापरकर्ते महत्त्वाच्या मेसेजच्या संक्षिप्त सूचना देखील मिळवू शकतात आणि त्यांच्या कॅलेंडरमध्ये कार्यक्रमाची भर करू शकतात. अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये बोलणाऱ्याच्या आवाजाशी जुळणाऱ्या ऑडिओसह रिअल-टाइम भाषांतर, तसेच वापरकर्त्‍यांच्या नजरेत येणारे मेनू किंवा चिन्हांवरील मजकूराचे भाषांतर करण्याची क्षमता समाविष्ट आहे. गॅलेक्सी परिसंस्‍थेत विनासायासपणे काम करत हे डिवाईस वापरकर्त्‍यांना आपला फोन बाहेर न काढता दैनंदिन कामे सहजपणे व्यवस्थापित करण्यास किंवा अगदी सहजतेने फोटो काढण्यास मदत करते.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समधील मोबाइल एक्सपिरियन्स (एमएक्‍स) बिझनेसचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ कस्टमर एक्सपिरियन्स ऑफिस जे किम म्हणाले, "हे इंटेलिजेंट आयवेअर सॅमसंगच्या एआय दृष्टिकोनातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. या नवीन एआय फॉर्म फॅक्टरसह आम्ही गॅलेक्सी डिवाईस परिसंस्‍थेचा अधिक विस्तार करत आहोत, जिथे प्रत्येक डिवाईस त्याच्या रचनेला सर्वोत्तम सुधारेल असा अद्वितीय एआय अनुभव देण्यासाठी ऑप्टिमाइझ केले गेले आहे."

गुगलमधील अँड्रॉइड एक्सआरचे व्हाईस प्रेसिडेंट आणि जीएम शाहराम इजादी म्‍हणाले, "इंटेलिजेंट आयवेअर हे एआयला दैनंदिन जीवनात अधिक उपयुक्त आणि सुलभ बनवण्याच्या सॅमसंगसोबतच्या आमच्या सामायिक दृष्टिकोनातील प्रबळ पाऊल आहे. गुगलचे सर्वोत्तम एआय आणि अँड्रॉइड परिसंस्‍था या दोघांना सॅमसंगचे मोबाइल हार्डवेअरमधील अग्रस्थान, तसेच जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्करच्या प्रीमियम डिझाइनशी जोडून आम्ही वापरकर्त्‍यांना अधिक नैसर्गिक आणि हँड्स-फ्री पद्धतीने कनेक्टेड व फॅशनेबल राहण्यास मदत करत आहोत."

जेंटल मॉन्स्टरचे संस्थापक आणि सीईओ हँकूक किम म्‍हणाले, "इंटेलिजेंट आयवेअर हे तांत्रिकदृष्ट्या प्रगत असण्यासोबतच भावनिकदृष्ट्या व्यक्त होणारे देखील वाटले पाहिजे. आमचा दृष्टिकोन फॅशन आणि तंत्रज्ञानाला अशा प्रकारे एकत्र आणण्याचा होता, जे धाडसी, सुंदर आणि मानवी वाटेल. सॅमसंग आणि गुगलच्या सोबतीने जेंटल मॉन्स्टरची नाविन्यपूर्ण डिझाइन ओळख इंटेलिजेंट आयवेअरच्या एका नवीन युगात घेऊन जाण्याचा आमचा हा प्रयत्‍न आहे."

वॉर्बी पार्करचे सह-संस्थापक आणि को-सीईओ डेव्ह गिल्बोआ म्‍हणाले, "आयवेअर हे अत्यंत वैयक्तिक असते, म्हणून व्‍यक्ती दररोज वापरत असलेल्या फ्रेम्समध्ये प्रगत तंत्रज्ञान समाविष्ट करताना प्रत्येक लहान तपशील महत्त्वाचा ठरतो. आमचे इंटेलिजेंट आयवेअर वापरण्यास अत्यंत सोपे वाटेल अशा पद्धतीने डिझाइन केले आहे, ज्यामध्ये वॉर्बी पार्करच्या सिग्नेचर डिझाइनला अचूक ऑप्टिक्स आणि अपवादात्मक आरामाची जोड दिली गेली आहे, ज्यामुळे व्‍यक्तींना त्यांच्यासमोरील क्षणांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल."

इंटेलिजेंट आयवेअरचे पहिले कलेक्शन या वर्षाच्या अखेरीस निवडक बाजारपेठांमध्ये लाँच करण्याचे नियोजित आहे, ज्याचा अतिरिक्त तपशील आगामी महिन्यांत घोषित केला जाईल.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...