सीधे मुख्य सामग्री पर जाएं

महालक्ष्मी सरस २०२६ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सात दिवसांत १५ कोटींची उलाढाल

मुंबई। २ मे २०२६ पासून सुरू झालेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अवघ्या सात दिवसांत प्रदर्शनातून सुमारे १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सीईओ निलेश सागर आणि सीओओ निखिल कुमार ओसवाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

महिलांना दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य:

सीईओ निलेश सागर यांनी सांगितले की, महिलांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवल कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंडच्या माध्यमातून दिले जाते. याअंतर्गत यापूर्वी ६० हजार रुपये दिले जात होते; मात्र आता हा निधी वाढवून तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. महिलांच्या व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन गटस्तरावर निर्णय घेतले जातात. यासाठी कोणतीही जमीन किंवा सोने तारण घेतले जात नाही.

केवळ बचत गटांनाच नव्हे, तर वैयक्तिक महिलांनाही त्यांच्या गरजेनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. महिलांच्या घरगुती परिस्थितीचा, व्यवसायाच्या गरजांचा आणि आर्थिक स्थितीचा विचार करून त्यांना आर्थिक मदत केली जाते. यामुळे ग्रामीण भागातील सावकारी पद्धतीला आणि जास्त व्याजदराने पैसे देणाऱ्या अनधिकृत आर्थिक व्यवस्थांना मोठ्या प्रमाणावर आळा बसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

७१ लाख महिलांचा अभियानात सहभाग:

यावेळी बोलताना निखिल कुमार ओसवाल यांनी सांगितले की, २०११ मध्ये केंद्र शासनामार्फत सुरू झालेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे हा होता. २०१८ पासून महाराष्ट्रभर या अभियानाचा विस्तार करण्यात आला. गावागावांमध्ये महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असून, एका गावातील किमान दहा महिलांना एकत्र आणून बचत गट उभारण्यात आले.

महाराष्ट्रात आजपर्यंत ६ लाख ७ हजार महिला बचत गटांची स्थापना झाली असून, त्यामध्ये ७१ लाखांहून अधिक महिलांचा सहभाग आहे. ग्रामीण भागात सुमारे ५५ टक्के आर्थिक सक्षमीकरण घडवून आणण्यात या अभियानाला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. एकल महिला, तृतीयपंथी, दिव्यांग आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांनाही या अभियानामध्ये विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

“उमेद मार्ट”मुळे महिलांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ:

उमेद अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या “उमेद मार्ट” या ऑनलाईन व्यासपीठामुळे महिला बचत गटांची उत्पादने आता जागतिक स्तरावर पोहोचत आहेत. दोन वर्षांत या व्यासपीठावर ४२०० हून अधिक उत्पादने नोंदवण्यात आली असून, यावर्षी आणखी १००० नवीन उत्पादने समाविष्ट करण्यात आली आहेत. महिलांना डिजिटल विपणन आणि ऑनलाईन विक्रीचे विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

एक लाख “लखपती दीदी” तयार करण्याचे उद्दिष्ट अभियानाने ठेवले असून, हा आकडा आणखी ५० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिलांना व्यवसाय, विपणन आणि आर्थिक स्वावलंबनासाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्य स्टॉल्सचे आकर्षण:

यंदाच्या महालक्ष्मी सरसमध्ये ५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्यपदार्थ स्टॉल्स सहभागी झाले आहेत. उत्पादनांची गुणवत्ता, पॅकेजिंग आणि नावीन्य लक्षात घेऊन सहभागींची निवड करण्यात आली आहे. नवोदित महिलांनाही मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे. नागरिकांसाठी मोफत बस सेवा, घरपोच  सामानाची सेवा तसेच दिव्यांगांसाठी  व्हील चेअरची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

४० कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा:

याआधी नागपूर येथे झालेल्या प्रदर्शनामध्ये १६ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता, तर वाशी येथे २२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. मुंबईतील महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये अवघ्या ७ दिवसांत १५ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला असून, यंदा ४० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमडीआर रचनेमुळे 'यूपीआय'ची शाश्वतता, नवोन्मेष आणि सुरक्षेला बळ मिळेल: असोचॅम

मुंबई। असोचॅमचे  अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी मोठ्या मूल्याच्या व्यापारी व्यवहारांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन यूपीआय फ्रेमवर्कचे स्वागत केले आहे. हे नवीन धोरण यूपीआयची शाश्वतता मजबूत करेल, नवोन्मेषाला पाठबळ देईल, फसवणूक रोखेल आणि त्याची स्वीकारार्हता वाढवेल. ही रचना पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वीकृती नेटवर्कला सक्षम करेल, ज्यामुळे यूपीआयचा विस्तार होऊन देशभरातील ग्राहक आणि व्यावसायिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल. असोचॅमने सरकारच्या संतुलित दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे, ज्याअंतर्गत सर्व व्यक्ती-ते-व्यक्ती यूपीआय व्यवहार, रक्कमेची मर्यादा न ठेवता, पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहेत. तसेच २,००० रुपयांपर्यंतची व्यापारी देयके देखील एमडीआर मुक्त राहतील. ही नवी रचना पात्र लहान व्यापाऱ्यांना, विशेषतः व्यक्ती-ते-व्यक्ती श्रेणीअंतर्गत यूपीआय क्यूआर कोडद्वारे दरमहा १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारणाऱ्या फेरीवाल्यांना आणि स्थानिक दुकानदारांना शून्य-एमडीआरचा लाभ देत राहील. यामुळे सूक्ष्म आणि लहान व्यावसायिकांना अतिरिक्त देयक खर्चापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. भारता...

सॅमसंगचा बीस्‍पोक एआय विंडफ्री एसीद्वारे स्मार्ट कूलिंगचा अनुभव

मुंबई। लाइनअप भारतातील कुटुंबांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. २३ मॉडेल्‍स, तसेच ४-स्‍टार व्‍हेरिएण्‍ट्स असलेली नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री श्रेणी सर्वोत्तम कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमतता आणि प्रीमियम डिझाइनवर लक्ष केंद्रित करते. भारतातील कुटुंबांना वाढत्‍या तापमानाचा आणि सतत बदलत असलेल्‍या हवामान स्थितींचा सामना करावा लागत असताना एअर कंडिशनिंगबाबत अपेक्षा साध्‍या कूलिंगपलीकडे जात आहेत. सॅमसंगची १०० टक्‍के बीस्‍पोक एआय विंडफ्री एअर कंडिशनर्सची २०२६ लाइनअप या परिवर्तनाचे निराकरण करते, जेथे या लाइनअपमध्‍ये सर्वोत्तम कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमता आणि प्रीमियम डिझाइन अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी भारतातील कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. हे एअर कंडिशनर्स रूममधील स्थिती आणि वापरकर्त्‍याच्‍या पसंतीशी सर्वोत्तमपणे जुळून जातात, जेथे योग्‍य कूलिंग व आरामदायीपणा देतात. रूममध्‍ये त्‍वरित कूलिंग निर्माण करायचे असल्‍यास एआय फास्‍ट व विंडफ्री कूलिंग+ वैशिष्‍ट्ये साह्य करतात, तर ड्राय कम्‍फर्ट मोड भारतातील मान्‍सूनच्‍या काळात आर्द्रतेवर देखरेख ठेवत...

दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती मुंबई। ज्येष्ठ पत्रकार आणि 'मुंबई तरंग' (गुजराती आणि हिंदी वृत्तपत्र) तसेच 'वेस्टर्न इंडिया टाइम्स' (इंग्रजी दैनिक) चे मुख्य संपादक, दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वश्रुत आहे की, दिलीप पटेल हे पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांच्या निःपक्षपाती आणि निर्भीड लेखनासाठी ओळखले जातात. ते मुंबईत, तसेच दिल्लीसह संपूर्ण गुजरातमध्ये आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनता, सरकार आणि प्रशासनाशी सक्रियपणे संवाद साधतात. कामगार, शेतकरी आणि सैनिकांचा आवाज नेहमीच उठवणाऱ्या, तसेच सरदार साहेबांच्या 'सामर्थ्यवान भारताचा पाया, सरदारांचे विचार' आणि 'राष्ट्र प्रथम' या तत्त्वांचे पालन करणाऱ्या व्यक्तीची पक्षाच्या या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने गुजरातमध्ये पक्षाला आणखी बळकटी मिळेल.