सीधे मुख्य सामग्री पर जाएं

किया इंडियाचा टेनिस प्रीमियर लीगसोबत सहयोग

मुंबई। किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीग (टीपीएल) यांनी एका ऐतिहासिक तीन वर्षांच्या सहयोगाची घोषणा केली आहे, ज्यांतर्गत किया इंडिया या लीगची एक्सक्लुझिव्ह स्पॉन्सर म्हणून जोडले गेली आहे. किया इंडियाचा टेनिस क्षेत्रातील प्रदीर्घ जागतिक वारसा आणि भारतातील या खेळाभोवती असलेली टीपीएलची वाढती परिसंस्था एकत्र आणणारा हा सहयोग टेनिसचे महत्त्व व व्याप्ती वाढवण्यासाठी आणि देशभरातील नवीन पिढीला प्रेरित करण्यासाठीच्या सामायिक उद्दिष्टावर आधारित आहे.

हा बहु-वर्षीय करार भारतातील टेनिसमधील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे. या कराराच्या माध्यमातून जगातील आघाडीचा ऑटोमोटिव्ह ब्रँड अशा एका स्वदेशी चळवळीशी जोडला गेला आहे, जी आपल्या लीग आणि अॅपच्या माध्यमातून देशातील टेनिसचा इतिहास नव्याने लिहीत आहे.

ऑस्ट्रेलियन ओपनसोबत सहयोगाच्‍या माध्‍यमातून जवळपास २५ वर्षांचा जागतिक टेनिस वारसा लाभलेल्या किया इंडियाने नेहमी तरुणांवर केंद्रित आणि प्रत्‍यक्ष सहभागाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांद्वारे या खेळाभोवती अर्थपूर्ण अनुभव निर्माण करण्यावर भर दिला आहे. टीपीएलसोबत या सहयोगामधून भारतातील समकालीन क्रीडा संस्कृतीला आकार देणाऱ्या आधुनिक क्रीडा मंचांना पाठिंबा देण्याप्रती किया इंडियाची निरंतर कटिबद्धता दिसून येते.

किया इंडियाचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट - सेल्स आणि मार्केटिंग, अतुल सूद म्हणाले, "किया इंडियामध्ये आमचा विश्वास आहे की, खेळांमध्ये आकांक्षांना प्रेरित करण्याची आणि अर्थपूर्ण सांस्कृतिक बंध निर्माण करण्याची ताकद असते. टेनिस खेळ आपल्या तरुण ऊर्जा, जागतिक आकर्षण आणि प्रीमियम वैशिष्ट्यांमुळे आमच्या ब्रँडच्या तत्त्वज्ञानाशी तंतोतंत जुळणारा आहे. टेनिस प्रीमियर लीगसोबत आमचा सहयोग भारतातील नवीन पिढीच्या प्रेक्षकांसाठी टेनिस अधिक मनोरंजक आणि सुसंगत बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टाला सादर करतो. टीपीएलची वाढती परिसंस्था आणि तळागाळातील स्तरावर असलेला त्यांचा भर यांच्या माध्यमातून या खेळातील वाढता सहभाग, लोकांमधील वाढती उत्सुकता आणि गुणवान खेळाडूंच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."

टेनिस प्रीमियर लीगचे सह-संस्थापक, कुणाल ठाकूर म्हणाले, "किया इंडियासोबत हा सहयोग आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. गेल्या काही वर्षांत, आम्ही आमच्या अॅप, लीग आणि रेस टू गोल्ड सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळात प्रबळ परिसंस्था निर्माण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. किया इंडियासारख्या जागतिक ब्रँडने आमच्या या उद्दिष्टाला ओळखणे आणि त्याला पाठिंबा देणे, यामुळे आम्‍हाला आमच्या प्रयत्‍नांना अधिक मोठ्या प्रमाणावर नेण्याचा आणि भारतातील टेनिसच्या भविष्यावर खऱ्या अर्थाने सकारात्मक प्रभाव पाडण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे."

टेनिस प्रीमियर लीगचे सह-संस्थापक मृणाल जैन म्हणाले "टीपीएलने नेहमी परिपूर्ण टेनिस परिसंस्था निर्माण करण्यावर विश्वास ठेवला आहे, ज्यामध्ये तरुण प्रतिभा शोधण्यापासून ते त्यांना सर्वोच्‍च पातळीवर एक व्यासपीठ मिळवून देण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. किया इंडियासोबत सहयोग करण्‍यासह आम्ही प्रायोजक मिळवला आहे, तसेच आम्‍हाला भारतासाठी चॅम्पियन्स (विजेते) घडवण्याच्या आमच्या उद्दिष्टाला पाठिंबा देणारा दीर्घकालीन भागीदार मिळाला आहे."

या बहु-वर्षीय सहयोगाचा भाग म्हणून, किया इंडिया टेनिस प्रीमियर लीगच्या संपूर्ण परिसंस्थेशी जोडली जाईल, ज्यामध्ये टीपीएल अॅप आणि सर्व ८ फ्रँचायझी टीम्सच्या जर्सीवर मुख्य स्‍पॉन्‍सर म्हणून किया इंडियाचे नाव समाविष्ट असेल. हा सहयोग या खेळाभोवती नागरिकांचा अधिक सहभाग आणि उत्साह वाढवण्याच्या किया इंडियाच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे, तसेच टीपीएलच्या तळागाळातील उपक्रमांना अधिक दृढ करेल, ज्यांनी देशभरात स्पर्धांचे आयोजन करण्यात आणि उदयोन्मुख टेनिसपटू शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

गेल्या दोन वर्षांत, टीपीएलने आपल्या 'रेस टू गोल्ड स्कॉलरशिप' या प्रमुख उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील ८० हून अधिक तरुण टेनिसपटूंना पाठबळ दिले आहे. आता किया इंडियासोबत सहयोगाने या उद्दिष्टाचा आणखी विस्तार केला जात आहे, तसेच येत्या काही वर्षांत आणखी १२० हून अधिक तरुण खेळाडूंना सक्षम करण्याचे ध्येय आहे. याद्वारे २०३६ च्या ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदके जिंकू शकतील अशा ऑलिम्पिक-स्तरीय प्रतिभावान खेळाडूंना घडवण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

टीपीएलचा तळागाळातील खेळाडूंवर असलेला फोकस आणि या खेळाची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन किया इंडिया या सहयोगाकडे भारतातील टेनिसमधील रस वाढवण्यासाठी आणि वाढता विस्तार, रचना व शाश्वत गुंतवणुकीच्या माध्यमातून या खेळाच्या दीर्घकालीन विकासाला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वपूर्ण मंच म्हणून पाहते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

पर्नोड रिकार्डकडून वंचित तरुणांना शिक्षण व रोजगाराची मोठी संधी

२५०० हून अधिक विद्यार्थ्यांना ११.६८ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती  मुंबई। पर्नोड रिकार्ड इंडिया फाउंडेशन (पीआरआयएफ) ने युथ ड्रीमर्स फाउंडेशनसोबत भागीदारी करून वंचित समुदायातील तरुणांना शिक्षण, कौशल्य विकास आणि अर्थपूर्ण रोजगाराचे मार्ग उपलब्ध करून देत त्यांना सक्षम करण्याचे कार्य अधिक वेगाने पुढे नेले आहे. २०१९ पासून सुरू असलेल्या 'PRIF शिष्यवृत्ती सहाय्य कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानमधील २,५७६ विद्यार्थ्यांना यशस्वीपणे सहाय्य करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत थेट शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ६.९१ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, सरकारी आणि खाजगी शिष्यवृत्ती योजनांद्वारे आणखी ४.७७ कोटी रुपयांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण ११.६८ कोटी रुपयांचे शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. केवळ आर्थिक मदत न देता तरुणांना शिक्षणापासून थेट रोजगारापर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी शिष्यवृत्तीसोबतच मार्गदर्शन, करिअर गाईडन्स आणि रोजगारासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. बदलत्या तंत्रज्ञानानुसार तरुणांना सक्षम करण्यासाठी पीआ...

कॉईनडीसीएक्सची दैनिक आणि मासिक एसआयपी सुविधा

अवघ्या १०० रुपयांच्या गुंतवणुकीसह क्रिप्टो गुंतवणूक केली अधिक सुलभ  मुंबई। भारतातील प्रमुख क्रिप्टो एक्सचेंज असलेल्या कॉईनडीसीएक्सने आपल्या 'दैनिक एसआयपी' सुविधेची घोषणा केली आहे. कंपनीच्या आधीपासूनच लोकप्रिय असलेल्या मासिक एसआयपी सुविधेचा हा एक नवीन विस्तार असून, याद्वारे वापरकर्त्यांना आता दररोज अवघ्या १०० रुपयांपासून क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करता येईल. ही नवीन सुविधा गुंतवणूक प्रक्रियेस सोपी, स्वयंचलित आणि सहज ठेवण्यासोबतच, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अधिक नियमितता प्रदान करते. याव्यतिरिक्त, कॉईनडीसीएक्सने एक्सआयआरआर ट्रॅकिंग देखील सुरू केले आहे. हे उद्योग क्षेत्रातील एक मानक मूल्य आहे, जे आवर्ती (रिकरिंग) गुंतवणुकीतून मिळणाऱ्या वार्षिक परताव्याचे अचूक चित्र मांडते आणि वेळेनुसार पोर्टफोलिओच्या कामगिरीचे योग्य मूल्यमापन करण्यास वापरकर्त्यांना मदत करते. या सुधारणेबाबत बोलताना, कॉईनडीसीएक्सचे एक्झिक्युटिव्ह व्हीपी - ग्रोथ अँड क्रिप्टो बिझनेस हेड, मिनाल ठुकराल म्हणाले, "एसआयपी हे कॉईनडीसीएक्स वरील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक उत्पादनांपैकी एक राहिले आहे आणि दैनिक तसेच मा...

खाडी देशांमध्ये महिलांसाठी सात ‘वन-स्टॉप सेंटर’

संकटग्रस्त भारतीय महिला कामगारांना तातडीने मदत; वैद्यकीय, कायदेशीर सेवांसह समुपदेशनाची सुविधा मुंबई। खाडी देशांमध्ये रोजगारासाठी गेलेल्या भारतीय महिला कामगारांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, त्यांच्या मदतीसाठी खाडीतील प्रमुख शहरांमध्ये सात ‘वन-स्टॉप सेंटर’ सुरू करण्यात आली आहेत. संकटात सापडलेल्या भारतीय महिलांना तातडीने आणि समन्वयाने मदत मिळावी, हा या केंद्रांचा उद्देश आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. राज्यसभा सदस्य राजीव सिंह यांनी खाडी देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाडी देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. त्यापैकी संयुक्त अरब अमिरातीमध्ये ४५ लाख, सौदी अरेबियात २७ लाख, कुवेतमध्ये १० लाख, कतारमध्ये ८.२० लाख, ओमानमध्ये ६.७० लाख आणि बहरीनमध्ये ३.१० लाख भारतीय आहेत. २०१४ ते जून २०२६ या...