सीधे मुख्य सामग्री पर जाएं

महालक्ष्मी सरस २०२६ ला चित्रा वाघ यांची भेट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्याचं कौतुक

मुंबई। बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या चित्रा वाघ यांनी भेट देत महिला बचत गटांच्या कार्याचं आणि प्रदर्शनाच्या भव्य नियोजनाचं कौतुक केलं. महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आत्मविश्वास आणि समाधान पाहून अतीव आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला एक वेगळं आणि भव्य रूप मिळालं असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं. ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देत हे प्रदर्शन आता जागतिक स्तरावर पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“हा २३ वर्षांचा प्रवास आहे. मी दरवर्षी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट देते आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं. महिलांच्या उत्पादनांमध्ये नाविन्य, आत्मविश्वास आणि व्यवसायिक दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो,” असे त्या म्हणाल्या.

महिला आणि बालकल्याण विभाग तसेच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून हजारो महिलांसाठी उभारण्यात आलेली व्यवस्था अत्यंत कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिलांच्या राहण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, उत्पादनांचे मार्केटिंग, पॅकेजिंग आणि व्यवसाय कौशल्य विकसित करण्यासाठी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून महिलांना प्रभावी प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्य सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ सुरू करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा महिलांसाठी मोठी संधी ठरणार असल्याचेही चित्रा वाघ म्हणाल्या. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिला आता आकाशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाल्या असून मुंबईकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देत महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच चित्रा वाघ यांनी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  निलेश सागर आणि मुख्य कार्यापालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांचे सुद्धा प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

प्रदर्शनासाठी नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात आला असून कुर्ला आणि वांद्रे येथून विशेष मोफत बससेवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला भेट देत आहेत.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमडीआर रचनेमुळे 'यूपीआय'ची शाश्वतता, नवोन्मेष आणि सुरक्षेला बळ मिळेल: असोचॅम

मुंबई। असोचॅमचे  अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी मोठ्या मूल्याच्या व्यापारी व्यवहारांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन यूपीआय फ्रेमवर्कचे स्वागत केले आहे. हे नवीन धोरण यूपीआयची शाश्वतता मजबूत करेल, नवोन्मेषाला पाठबळ देईल, फसवणूक रोखेल आणि त्याची स्वीकारार्हता वाढवेल. ही रचना पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वीकृती नेटवर्कला सक्षम करेल, ज्यामुळे यूपीआयचा विस्तार होऊन देशभरातील ग्राहक आणि व्यावसायिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल. असोचॅमने सरकारच्या संतुलित दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे, ज्याअंतर्गत सर्व व्यक्ती-ते-व्यक्ती यूपीआय व्यवहार, रक्कमेची मर्यादा न ठेवता, पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहेत. तसेच २,००० रुपयांपर्यंतची व्यापारी देयके देखील एमडीआर मुक्त राहतील. ही नवी रचना पात्र लहान व्यापाऱ्यांना, विशेषतः व्यक्ती-ते-व्यक्ती श्रेणीअंतर्गत यूपीआय क्यूआर कोडद्वारे दरमहा १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारणाऱ्या फेरीवाल्यांना आणि स्थानिक दुकानदारांना शून्य-एमडीआरचा लाभ देत राहील. यामुळे सूक्ष्म आणि लहान व्यावसायिकांना अतिरिक्त देयक खर्चापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. भारता...

लखोटिया रियॅलिटीने पनवेलमध्ये ५ आठवड्यांत रु.२५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली

लखोटिया रियॅलिटीने पनवेलमध्ये ५ आठवड्यांत रु.२५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली; देशातील परवडणाऱ्या घरांच्या बाजारात मंदीला छेद परवडणाऱ्या घरांच्या बाजारात राष्ट्रीय घसरणीच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय विक्री मुंबई।  लखोटिया रियॅलिटीने सांगितले की, केवळ ५ आठवड्यांत त्यांच्या केवाळे येथील GPS (ग्रेटर पनवेल सुपरझोन) प्रकल्पातील प्रत्येकी सुमारे रु. २५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली गेली आहेत. देशभरातील परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत मोठी घट होत असताना ही विक्री राष्ट्रीय कलाला छेद देणारी ठरली आहे. रु. २५ लाखांच्या घराच्या किमतीनुसार रु.२० लाखांच्या गृहकर्जावर अंदाजे रु. १७,००० मासिक ईएमआय येतो. त्यामुळे एकत्रित मासिक उत्पन्न रु. ५०,०००–६०,००० असलेल्या कुटुंबांसाठी घरमालकीची संधी अधिक सुलभ होते. याउलट, मुंबईच्या मध्यवर्ती भागात किंमत-उत्पन्न गुणोत्तर १०:१ पेक्षा अधिक असल्याने, एवढी रक्कम सरासरी सदनिकेच्या खरेदीसाठीच्या आगाऊ रकमेचा क्वचितच पुरेशी ठरते. नाईट फ्रँकच्या माहितीनुसार, भारतातील आघाडीच्या आठ निवासी बाजारपेठांमध्ये रु. ५० लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री ...

लोणावळ्यातील कैवल्यधाम येथे जगातील पहिल्या योग महाविद्यालयाच्या प्लॅटिनम ज्युबिलीचे उपराष्ट्रपती करणार उद्घाटन

लोणावळा: शतकभराचा वारसा असलेली योग संशोधन संस्था कैवल्यधाम येथे भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 18 सप्टेंबर 2026 रोजी उपस्थित राहणार असून, ते गोर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या प्लॅटिनम ज्युबिली सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम कैवल्यधामच्या लोनावळा कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. 1951 मध्ये स्थापन झालेले गोर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस हे योग शिक्षणासाठी समर्पित जगातील पहिले महाविद्यालय होते. 1962 मध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने या संस्थेला अखिल भारतीय उच्च शिक्षण संस्था (All India Institute of Higher Education) म्हणून मान्यता दिली. अशी मान्यता मिळवणारी ही देशातील पहिली योग संस्था ठरली. गेल्या 75 वर्षांत या महाविद्यालयाने शिक्षक आणि संशोधकांच्या अनेक पिढ्यांना प्रशिक्षण दिले असून, त्यांच्या माध्यमातून कैवल्यधामच्या पद्धती 65 हून अधिक देशांमध्ये पोहोचल्या आहेत. कार्यक्रमापूर्वी बोलताना कैवल्यधामचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), सुबोध तिवारी म्हणाले, “पंचाहत्तर वर्षांपूर्वी या महाविद्यालयाने...