सीधे मुख्य सामग्री पर जाएं

‘कामत्स लेगसी’कडून पारंपरिक दक्षिण भारतीय मेनूसह पोंगलचा उत्सव

मुंबई। यंदा पोंगल सणानिमित्त ‘कामत्स लेगसी’ने ग्राहकांना १४ ते १८ जानेवारीदरम्यान मीरा रोड, वाशी, मालाड आणि नरिमन पॉईंट येथील आउटलेटमध्ये उपलब्ध असलेल्या अस्सल आणि चवीने समृद्ध दक्षिण भारतीय फेस्टिव्हल मेनूसह कापणीचा उत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

पारंपरिक दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीप्रती असलेल्या निष्ठेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘कामत्स लेगसी’ने पोंगलसाठी खास अनुभव तयार केला असून, त्यात कालातीत सणासुदीचे आवडते पदार्थ समाविष्ट आहेत. पाहुणे येथे पोंगलचा खास पदार्थ असलेला रुचकर ‘वेन पोंगल’ चाखू शकतात. सणाच्या काळात नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यासाठी योग्य अशा विविध पदार्थांचा आस्वाद घेता येईल.

या प्रसंगी बोलताना ‘द विट्स कामत्स ग्रुप’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. विक्रम कामत म्हणाले, की ‘पोंगल हा कृतज्ञता, समृद्धी आणि एकत्र येण्याचा आनंद साजरा करणारा सण आहे. कामत्स लेगसीमध्ये आम्हाला हा कापणीचा सण साजरा करीत आमच्या पाहुण्यांसाठी अस्सल पोंगलची चव सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. आमचे पदार्थ दक्षिण भारतीय परंपरांची उब आणि पोंगलचे सांस्कृतिक महत्त्व प्रतिबिंबित करतात.’ शुद्ध आणि अस्सल प्रादेशिक अन्न देण्याच्या आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक राहून ‘कामत्स लेगसी’ पोंगलचा असा समृद्ध भोजनानुभव देऊन या सणाची कृतज्ञता, समृद्धी आणि एकोप्याची भावना साकारतो, असेही कामत यांनी नमूद केले.

या मेनूमधील विशेष आकर्षण म्हणजे गूळ पोंगल; वेलचीच्या सुगंधाने नटलेला आणि काजूंनी सजवलेला हा गोड पदार्थ. याशिवाय पोंगलमध्ये खारट आणि स्फटिक साखर पोंगल, चणा डाळ, केळीचे फुलवडे, मिक्स व्हेजिटेबल सांबार, डाळ रसम, शेवग्याची काडी आणि पिवळा भोपळा पोरियाल, वाफवलेल्या तांदळासह वाढलेला मिक्स व्हेजिटेबल कुटू, अननस पचाडी, घरी बनवलेले आंब्याचे लोणचे, ढल पायसम, ताक, पापड, तूप आणि सणाची ओळख असलेली केळी आणि काळा ऊस आदी पारंपरिक पदार्थांचा समावेश आहे.

कामत्स लेगसी’चे उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) पंकज देवकर म्हणाले, की ‘कामत्स लेगसीमधील पोंगल साजरा करण्याचा अर्थ म्हणजे परंपरेशी निष्ठा राखणे. वेन पोंगलपासून गोड गूळ पोंगलपर्यंत प्रत्येक पदार्थ अस्सल रेसिपी आणि घटकांचा वापर करून काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे. पाहुण्यांना पोंगलचा खरा आनंद अनुभवता यावा, हाच आमचा उद्देश आहे.’ सखोल तयारी आणि सणासुदीच्या वातावरणामुळे १४ ते १८ जानेवारीदरम्यान पोंगल साजरा करण्यासाठी कामत्स लेगसी हे आदर्श ठिकाण ठरत असल्याचेही देवकर म्हणाले.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

पीकेएफ इंडियाने 'ग्रीन वॉकॅथॉन'सह ५० वर्षे साजरी केली; देशभरात ५,००० झाडे लावण्याची प्रतिज्ञा

सामुदायिक सहभाग आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने मुंबईत आयोजित केलेल्या या उपक्रमात १३० हून अधिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला. मुंबई। पीकेएफ इंडिया च्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर चालणाऱ्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा एक भाग म्हणून, पीकेएफ इंडिया ग्रुपने शनिवारी सकाळी मुंबईतील माझगाव येथील जोसेफ बाप्टिस्टा गार्डनमध्ये ' वॉक फॉर अ कॉज - ग्रीन एन्व्हायर्नमेंट ' (एका ध्येयासाठी पदयात्रा - हरित पर्यावरण) आयोजित केली. या कार्यक्रमात अधिक हरित आणि शाश्वत भविष्याच्या समर्थनासाठी कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि समाजाचे प्रतिनिधी एकत्र आले. सकाळी ७:०० ते ९:३० या वेळेत आयोजित या वॉकॅथॉनमध्ये पीकेएफ श्रीधर अँड संथनम एलएलपी, पीकेएफ कन्सल्टिंग एलएलपी आणि पीकेएफ सर्व्हहब प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधित्व करणारे १३० हून अधिक कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. हा उपक्रम समूहाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात ५,००० झाडे लावण्याच्या व्यापक सुवर्ण महोत्सवी वचनबद्धतेचा एक भाग आहे, ज्यामुळे या सोहळ्याचा पर्यावरण आणि समुदाय-केंद्रित उद्देश अ...

भारतात स्वामी विवेकानंद नेत्र मंदिर ट्रस्ट तर्फे १०८ नेत्र-काळजी केंद्रे उभारली जाणार

मुंबई: देशभरातील दृष्टिहीन आणि गरजू रुग्णांना प्रगत, दर्जेदार आणि मोफत नेत्रोपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, ' स्वामी विवेकानंद नेत्र मंदिर ट्रस्ट , सुपा' ४५० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चातून जागतिक दर्जाचे नेत्र रुग्णालय उभारणार आहे. ट्रस्टच्या ' व्हिजन फॉर एव्हरी होम' (प्रत्येक घरात दृष्टी) या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, संपूर्ण भारतात १०८ नेत्रोपचार केंद्रे सुरू करण्याची योजना असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.भावीन पटेल यांनी मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांनी पत्रकारांना आव्हान केले कि तुमच्याकडे कुठेही गरजू रुग्ण दृष्टीपथात आहेत त्यांना आमच्या कडे घेऊन या किंवा आम्हाला कळवा त्यांना आम्ही त्यांना आमच्या संस्थेत मोफत किंवा माफक दरात इलाज करू. स्वामी विवेकानंद नेत्र मंदिर ट्रस्टचे मुख्य उद्दिष्ट डोळ्यांच्या आजाराने त्रस्त असलेल्या प्रत्येक रुग्णाचे दुःख दूर करणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हे आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम नेत्रसेवा सवलतीच्या दरात किंवा पूर्णपणे मोफत पोहोचवणे आहे. या प्रकल्पाच्या पहिल्य...

मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रात स्वच्छता अभियान

मुंबई: मलाबार ग्रुप च्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत मलाबार गोल्ड एंड डायमंड्सच्या शोरूमच्या वतीने नांदेड, जळगाव, लातूरमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका व नगरपालिका यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता मोहिमेत मलाबार गोल्ड एंड डायमंड्सच्या व्यवस्थापनातील अधिकारी, शोरूम प्रमुख, कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांनी एकत्रितपणे स्वच्छता उपक्रमात योगदान देत परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला. पर्यावरण, सामाजिक बांधिलकी आणि सुशासन या तत्त्वांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मलाबार ग्रुपच्या वतीने या महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील मलाबार ग्रुपच्या ९,००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यावेळी मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, "पर्यावरणाप्रती जबाबदारी, सामाजिक बांधिलकी, पारदर्शकता आणि नैतिक व्यावसायिक प्रशासन या मूल्यांचा व्यावसायिक कार्यपद्धतीत समावेश करून ईएसजी तत्त्वांना अधिक बळकटी द...