सीधे मुख्य सामग्री पर जाएं

जसलोक हॉस्पिटलमध्ये अति-लठ्ठ महिला रुग्णावर सुरक्षित उपचार

भारतात पहिल्यांदाच एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीच्‍या माध्‍यमातून शस्त्रक्रिया 

मुंबई: जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने ४५ वर्षीय महिलेवर यशस्‍वीपणे अत्यंत महत्त्वपूर्ण मोनोपोर्टल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी केली आहे. या महिलेला पाठदुखीचा तीव्र त्रास होत होता, तसेच हालचाल देखील करता येत नव्‍हती, ज्यामुळे तिला हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्यात आले होते. ही महिला रुग्ण अति-लठ्ठ होती. तिचे वजन १२० किलो आणि बीएमआय ५२ होता, ज्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. उच्‍च बीएमआय असलेल्या रुग्णावर सुरक्षितपणे शस्त्रक्रिया करण्याची भारतातील ही पहिली केस ठरली आहे, जेथे ही इंटरलॅमिनर एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया सुरक्षितपणे करण्‍यात आली. 

मूळची भारतीय असलेली आणि सध्या जर्मनीमध्ये राहणारी एक ४५ वर्षीय महिला वार्षिक सुट्टीसाठी मायदेशी परतली होती. पण, भारतात आल्यानंतर तिला अचानक पाठदुखीचा तीव्र त्रास होऊ लागला. ही वेदना इतकी वाढली की तिला साधे उभे राहणे किंवा चालणे देखील कठीण झाले. प्राथमिक तपासणीत एल४-एल५ डिस्क हर्निएशनचे निदान झाले, ज्‍यामुळे नसांवर प्रचंड दाब येत असल्‍याचे निदर्शनास आले. सामान्यतः अशा केसमध्‍ये शस्त्रक्रिया केली जाते, पण तिच्या अति वजनामुळे शस्त्रक्रियेचा पर्याय नाकारला जात होता. परिणामी, ती जवळपास दोन महिने अंथरुणाला खिळून होती आणि प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. दीर्घकाळ हालचाल न करण्‍यासोबत जर्मनीला परतणे शक्य नसल्यामुळे तिची नोकरी जाण्याची भीती निर्माण झाली होती.

त्यानंतर तिने जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचे ठरवले, जेथे एंडोस्कोपिक स्पाइन टीमने तिच्या केसची सविस्‍तरपणे तपासणी केली. सर्जन्‍सनी स्‍पष्‍टपणे सांगितले की, मोनोपोर्टल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीसाठी १ सेंटीमीटरपेक्षाही कमी आकाराचा छेद करावा लागतो. ही पद्धत शरीराची गुंतागुंतीची रचना असलेल्या रुग्णांसाठी देखील सुरक्षित आणि व्यवहार्य आहे, त्यामुळे ती अति-लठ्ठ असताना देखील उपचारामध्‍ये कोणताच अडथळा आला नाही. मेडिकल लिटरेचरचा अभ्यास केल्यावर निदर्शनास आले की, ती भारतातील सर्वाधिक बीएमआय असलेली पहिली रूग्‍ण आहे, जिच्‍यावर ही एंडोस्‍कोपिक शस्त्रक्रिया यशस्‍वीपणे करण्‍यात आली. या केसमधून किमान इन्‍वेसिव्‍ह स्‍पाइन केअरमध्‍ये जसलोक हॉस्पिटल नेतृत्‍व दिसून येते.

डॉ. मनिष कोठारी यांनी यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया केली आणि शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याची जबाबदारी अॅनेस्थेसिया विभागाच्या अतिरिक्‍त संचालक डॉ. राजश्री देवपुजारी आणि अॅनेस्‍थेसियोलॉजीचे कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. अनुराज जैन यांनी सांभाळली. शस्त्रक्रियेनंतर वेदनेपासून मोठा दिलासा मिळाल्याने महिला रुग्णाला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिने वजन कमी करण्‍यासाठी संतुलित आहाराचे सेवन व व्‍यायाम सुरू केला, ज्‍यामुळे पुढील दोन महिन्‍यांमध्‍ये तिचे वजन जवळपास २० किलो कमी झाले. आता ती जर्मनीला परतली असून पुन्‍हा कामावर जात आहे आणि आरोग्‍य उत्तम राखण्‍याची काळजी घेत आहे.

एंडोस्‍कोपिक स्‍पाइन सर्जरीचे कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. मनिष कोठारी म्‍हणाले, ''अशा उच्‍च बीएमआय असलेल्‍या रूग्‍णावर शस्त्रक्रिया करताना शरीररचनेतील सूक्ष्म बदलांकडे सतत लक्ष देणे आणि वैद्यकीय उपकरणांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक होते. मोनोपोर्टल एंडोस्कोपिक पद्धतीमुळे आम्हाला प्रत्येक टप्प्यावर अचूकता आणि स्थिरता राखण्‍यास मदत झाली, ज्यामुळे नसांवरील दाब सुरक्षितपणे कमी करता आला आणि शरीरावर जखमेची खूण देखील अत्यंत कमी राहिली. महिला रूग्‍ण यशस्‍वी शस्त्रक्रियेनंतर लवकर चालू व हालचाल करू लागली, ज्‍यामधून सिद्ध होते की प्रगत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य एकत्र आल्यास आव्‍हानात्‍मक केसेसमध्‍ये देखील यशस्‍वीरित्‍या उपचार करता येऊ शकतो.''  

चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्‍हणाले, ''या महिला रुग्णाचे वजन जास्त असल्यामुळे तिच्‍यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. असे असताना देखील जसलोक हॉस्पिटलमध्ये आम्ही सुरक्षितपणे व यशस्‍वीपणे किमान इन्‍वेसिव्‍ह उपचार करू शकलो. यासारख्‍या केसेसमधून गुंतागुंतीच्‍या स्‍पाइन केअरमध्‍ये आमचे कौशल्‍य व आत्‍मविश्वासासह करणाऱ्या उपचाराचा दर्जा दिसून येतो. या महिला रूग्‍णाला पुन्‍हा लवकर हालचाल करताना पाहिल्यानंतर आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे की, प्रगत एंडोस्‍कोपिक तंत्र शस्त्रक्रिया होऊ न शकणाऱ्या रूग्‍णांसाठी नवीन आशेचा किरण देऊ शकते.''

या यशामधून उच्‍च जोखीम असलेल्‍या रूग्‍णांमधील गुंतागुंतीच्‍या स्‍पाइन केसेसवर उपचार करण्‍यामध्‍ये जसलोक हॉस्पिटलचे कौशल्‍य दिसून येते. तसेच या केसमधून निदर्शनास येते की, प्रगत एंडोस्‍कोपिक तंत्र उपचार होऊ न शकणाऱ्या रूग्‍णांसाठी देखील उपयुक्‍त ठरू शकते. 


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

किआ इंडियाचा विक्रीत नवा उच्चांक

    ४१% वाढीसह सप्टेंबरमध्ये ३२,०१७ वाहनांची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये ३२,०१७ युनिट्सच्या घाऊक विक्रीसह भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद केली. या विक्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या २२,७०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर ४१ टक्‍के वाढ झाली. ही ऐतिहासिक कामगिरी किया इंडियाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, तसेच ब्रँडवरील आणि त्यांच्या विस्तारत जाणाऱ्या उत्पादन पोर्टफोलिओवरील ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास दर्शवते. कंपनीने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देखील ही गती कायम राखत ८९,२५९ युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६४,४४३ युनिट्सच्या तुलनेत ३८.५ टक्‍के वाढ झाली. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत किया इंडियाची एकत्रित विक्री २,५३,००८ युनिट्सवर पोहोचली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या २,०६,५८२ युनिट्सच्या तुलनेत यात २२.५ टक्‍के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमधून ब्रँडवरील वाढता ग्रा...