सीधे मुख्य सामग्री पर जाएं

टोयोटा किर्लोस्कर मोटरने अॅडवाण्टेज महाराष्ट्र २०२६ मध्ये तांत्रिक उत्कृष्टता सादर केली

मुंबई। टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पो २०२६ मध्‍ये सहभाग घेतला, जेथे महाराष्‍ट्रातील कौशल्‍य विकास उपक्रमांच्‍या माध्‍यमातून शाश्वत गतीशीलता, जबाबदार उत्‍पादन आणि तरूणांचे सक्षमीकरण करण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. या एक्‍स्‍पोमध्‍ये सहभाग घेण्‍यासह टोयोटा फ्लेक्‍स-फ्यूएल स्‍ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल (एसएचईव्‍ही) तंत्रज्ञानाच्‍या क्षमतेला प्रकाशझोतात आणत आहे. एक्‍स्‍पोमधील पॅव्हिलियनमधून उद्योग सहयोग आणि तंत्रज्ञानाबाबत जागरूकतेप्रती टीकेएमचा केंद्रित दृष्टिकोन देखील दिसून आला, जो भारताच्‍या ऊर्जा परिवर्तन ध्‍येयांशी संलग्‍न आहे.

अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पो २०२६ छत्रपती संभाजीनगर व मराठवाडा प्रांतामधील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन आहे, जे दर तीन वर्षांनी एकदा आयोजित केले जाते. आघाडीची उद्योग संस्‍था एमएएसएसआयए (मराठवाडा असोसिएशन ऑफ स्‍मॉल-स्‍केल इंडस्‍ट्रीज अँड अॅग्रीकल्‍चर) महाराष्‍ट्र सरकारसोबत सहयोगाने या प्रदर्शनाचे आयोजन करते.  

टेक्‍नॉलॉजी पॅव्हिलियनमध्‍ये टीकेएमने हायक्रॉस फ्लेक्‍झी-फ्यूएल स्‍ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल (एफएफव्‍ही एसएचईव्‍ही)सह प्रगत वेईकल तंत्रज्ञानांच्‍या उत्‍कृष्‍ट प्रदर्शनाला सादर केले. यासह टीकेएमचा दृष्टिकोन दिसून आला, ज्‍यामधून शाश्वत गतीशीलतेमध्‍ये संतुलन राखणारे कार्बन न्‍यूट्रॅलिटी संपादित करण्‍याप्रती बहु-मार्गीय दृष्टिकोनावर केंद्रित तत्त्व दिसून येते.

या एक्‍स्‍पोमधील आपला सहभाग अधिक दृढ करत टीकेएमने उद्योग व शैक्षणिक संस्‍थांमधील प्रतिनिधींसाठी टोयोटा कल्‍चरवर सत्राचे आयोजन केले. या सत्रामध्‍ये दर्जा-केंद्रित उत्‍पादन, सतत सुधारणा, कौशल्‍य विकास आणि ग्राहक केंद्रित नेतृत्‍व या टीकेएमच्‍या मुलभूत मूल्‍यांना दाखवण्‍यात आले, ज्‍यांचा महाराष्‍ट्रातील दीर्घकालीन सहयोग अधिक प्रबळ करण्‍याचा मनसुबा आहे.

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरचे चीफ कम्‍युनिकेशन ऑफिसर, वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष व संचालक सुदीप दळवी म्‍हणाले, ''टोयोटा किर्लोस्‍कर मोटर महाराष्‍ट्र सरकारचे राज्‍यातील आमच्‍या ग्रीनफिल्‍ड उत्‍पादन प्रकल्‍पाला सतत पाठिंबा देण्‍यासाठी आभार व्‍यक्‍त करते. आमची आगामी सुविधा राज्‍यातील टीकेएमच्‍या ऑपरेशनल उपस्थितीला अधिक वाढवेल, जेथे स्‍थानिकीकरणावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्‍यात येईल. तसेच स्‍थानिक विकासासाठी अधिक संधी निर्माण करण्‍यात येतील. अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पोमधील सहभागामधून प्रांतामध्‍ये सुरू असलेले सहयोगात्‍मक उपक्रम दिसून येतात, तसेच महाराष्‍ट्रामध्‍ये शाश्वत विकास, नाविन्‍यता आणि सामुदायिक सक्षमीकरणाला चालना देण्‍याप्रती आमची कटिबद्धता देखील दिसून येते. टीकेएमने आपल्‍या संरचित कौशल्‍य विकास व सीएसआर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्रात सतत मुलभूत क्षमता निर्माण करण्‍यावर आणि शैक्षणिक परिसंस्‍था प्रबळ करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. या प्रयत्‍नांना पूरक म्‍हणून आम्‍ही तंत्रज्ञान उपक्रम प्रगत करत राहू, जे शुद्ध गतीशीलता आणि अधिक कार्यक्षम पॉवरट्रेन यंत्रणांना पाठिंबा देतील.''

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने नुकतेच महाराष्‍ट्र सरकारसोबत सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली, ज्‍यासह राज्‍यामध्‍ये संरचित व मोठ्या प्रमाणात कौशल्‍य विकास परिसंस्‍थेच्‍या विकासाला साह्य करण्‍यासाठी सरकारसोबत सहयोग अधिक दृढ केला आहे. याव्‍यतिरिक्‍त औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थांचे सक्षमीकरण करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. तसेच, शिक्षणावरील आपल्‍या सीएसआर फोकसचा भाग म्‍हणून टीकेएमने छत्रपती संभाजीनगरमधील ११ सरकारी शाळांमध्‍ये पायाभूत सुविधा व शैक्षणिक सुविधा अपग्रेड केल्‍या आहेत आणि स्‍थानिक समुदायांसाठी शैक्षणिक वातावरणांना सुधारण्‍याप्रती योगदान देत आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...