सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सीटीसीच्या ‘शताब्दी समिट’ला प्रारंभ

वित्त व कायदा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

मुंबई। चेंबर ऑफ टॅक्स कन्सल्टं ट्स (सीटीसी) या अग्रगण्य व्यावसायिक संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘द शताब्दी समिट : सेंटेनरी कॉन्फरन्स’ या दोन दिवसाच्याव भव्य परिषदेला शुक्रवारी प्रारंभ झाला.
परिषदेचे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते इंडसइंड बँकेचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन डिझिग्नेट अरिजित बसू यांनी  “भारताच्या आर्थिक प्रवासात लवचिक वित्तव्यवस्था व जबाबदार विकास” या विषयावर बोलताना त्यांनी नैतिकता, दीर्घकालीन दृष्टिकोन आणि व्यावसायिकांच्या जबाबदारीवर भर दिला. बदलत्या आर्थिक व व्यावसायिक वातावरणात कर, कायदा व लेखा क्षेत्रातील तज्ज्ञांनी तंत्रज्ञान, प्रशासन आणि उत्तरदायित्वाशी सुसंगत राहणे आवश्यक आहे. शताब्दी समिट हे या दृष्टीने मार्गदर्शक ठरेल असे सीटीसीचे अध्यक्ष सीए जयंत गोखले यांनी सांगितले.
उपाध्यक्ष सीए नेहा राजेन गडा, संयुक्त मानद सचिव सीए मेहुल शेट्टी व सीए अंकित संघवी तसेच मानद खजिनदार सीए वितांग शाह उपस्थित होते.
शताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष सीए विपुल चौकसी यांनी सांगितले की, परिषदेत भांडवली बाजार, स्टार्टअप्स, जीएसटी, संबंधित पक्ष व्यवहार, कर नियोजन तसेच व्यावसायिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावावर सखोल चर्चा झाली.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमडीआर रचनेमुळे 'यूपीआय'ची शाश्वतता, नवोन्मेष आणि सुरक्षेला बळ मिळेल: असोचॅम

मुंबई। असोचॅमचे  अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी मोठ्या मूल्याच्या व्यापारी व्यवहारांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन यूपीआय फ्रेमवर्कचे स्वागत केले आहे. हे नवीन धोरण यूपीआयची शाश्वतता मजबूत करेल, नवोन्मेषाला पाठबळ देईल, फसवणूक रोखेल आणि त्याची स्वीकारार्हता वाढवेल. ही रचना पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वीकृती नेटवर्कला सक्षम करेल, ज्यामुळे यूपीआयचा विस्तार होऊन देशभरातील ग्राहक आणि व्यावसायिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल. असोचॅमने सरकारच्या संतुलित दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे, ज्याअंतर्गत सर्व व्यक्ती-ते-व्यक्ती यूपीआय व्यवहार, रक्कमेची मर्यादा न ठेवता, पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहेत. तसेच २,००० रुपयांपर्यंतची व्यापारी देयके देखील एमडीआर मुक्त राहतील. ही नवी रचना पात्र लहान व्यापाऱ्यांना, विशेषतः व्यक्ती-ते-व्यक्ती श्रेणीअंतर्गत यूपीआय क्यूआर कोडद्वारे दरमहा १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारणाऱ्या फेरीवाल्यांना आणि स्थानिक दुकानदारांना शून्य-एमडीआरचा लाभ देत राहील. यामुळे सूक्ष्म आणि लहान व्यावसायिकांना अतिरिक्त देयक खर्चापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. भारता...

सॅमसंगचा बीस्‍पोक एआय विंडफ्री एसीद्वारे स्मार्ट कूलिंगचा अनुभव

मुंबई। लाइनअप भारतातील कुटुंबांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. २३ मॉडेल्‍स, तसेच ४-स्‍टार व्‍हेरिएण्‍ट्स असलेली नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री श्रेणी सर्वोत्तम कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमतता आणि प्रीमियम डिझाइनवर लक्ष केंद्रित करते. भारतातील कुटुंबांना वाढत्‍या तापमानाचा आणि सतत बदलत असलेल्‍या हवामान स्थितींचा सामना करावा लागत असताना एअर कंडिशनिंगबाबत अपेक्षा साध्‍या कूलिंगपलीकडे जात आहेत. सॅमसंगची १०० टक्‍के बीस्‍पोक एआय विंडफ्री एअर कंडिशनर्सची २०२६ लाइनअप या परिवर्तनाचे निराकरण करते, जेथे या लाइनअपमध्‍ये सर्वोत्तम कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमता आणि प्रीमियम डिझाइन अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी भारतातील कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. हे एअर कंडिशनर्स रूममधील स्थिती आणि वापरकर्त्‍याच्‍या पसंतीशी सर्वोत्तमपणे जुळून जातात, जेथे योग्‍य कूलिंग व आरामदायीपणा देतात. रूममध्‍ये त्‍वरित कूलिंग निर्माण करायचे असल्‍यास एआय फास्‍ट व विंडफ्री कूलिंग+ वैशिष्‍ट्ये साह्य करतात, तर ड्राय कम्‍फर्ट मोड भारतातील मान्‍सूनच्‍या काळात आर्द्रतेवर देखरेख ठेवत...

दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती मुंबई। ज्येष्ठ पत्रकार आणि 'मुंबई तरंग' (गुजराती आणि हिंदी वृत्तपत्र) तसेच 'वेस्टर्न इंडिया टाइम्स' (इंग्रजी दैनिक) चे मुख्य संपादक, दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वश्रुत आहे की, दिलीप पटेल हे पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांच्या निःपक्षपाती आणि निर्भीड लेखनासाठी ओळखले जातात. ते मुंबईत, तसेच दिल्लीसह संपूर्ण गुजरातमध्ये आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनता, सरकार आणि प्रशासनाशी सक्रियपणे संवाद साधतात. कामगार, शेतकरी आणि सैनिकांचा आवाज नेहमीच उठवणाऱ्या, तसेच सरदार साहेबांच्या 'सामर्थ्यवान भारताचा पाया, सरदारांचे विचार' आणि 'राष्ट्र प्रथम' या तत्त्वांचे पालन करणाऱ्या व्यक्तीची पक्षाच्या या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने गुजरातमध्ये पक्षाला आणखी बळकटी मिळेल.