सीधे मुख्य सामग्री पर जाएं

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचा ईव्ही क्षेत्रात दमदार प्रवेश

टोयोटाची ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला सादर

टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला सादर

मुंबई। टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने भारतातील बॅटरी इलेक्ट्रिक वाहन (BEV) सेगमेंटमध्ये आपला पहिला प्रवेश करत ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला सादर केली.  
टोयोटाच्या ३० वर्षांच्या जागतिक इलेक्ट्रिफाईड मोबिलिटी तज्ज्ञतेवर आधारित, अर्बन क्रूझर एबेला ही गाडी आकर्षक एसयूव्ही डिझाइन, प्रशस्त व प्रीमियम केबिन, प्रगत तंत्रज्ञान आणि मृदू व आत्मविश्वासपूर्ण इलेक्ट्रिक परफॉर्मन्स यांचा उत्कृष्ट मिलाफ आहे.

हे वाहन ४९ केव्हॅट आणि ६१ केव्हॅट बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध असून, ६१ केव्हॅट बॅटरीसह एका चार्जवर ५४३ किमी (ARAI प्रमाणित) ड्रायव्हिंग रेंज देते.येत्या २० जानेवारीपासून बुकिंग सुरू असून किंमत लवकरच जाहीर केली जाणार आहे. 
‘अर्बन टेक’ डिझाइन संकल्पनेवर आधारित एबेला मध्ये हॅमरहेड फ्रंट, एलईडी हेडलॅम्प्स, १८-इंच अलॉय व्हील्स आणि आकर्षक एसयूव्ही स्टान्स आहे. केबिनमध्ये ड्युअल-टोन इंटिरिअर, पॅनोरामिक रूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, १२ रंगांची अॅम्बियंट लाइटिंग, JBL साउंड सिस्टीम, वायरलेस चार्जिंग आणि आधुनिक कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत.
सुरक्षिततेसाठी या वाहनात लेव्हल २ अँडास, ७ एअरबॅग्स, ३६०-डिग्री कॅमेरा आणि टोयोटाच्या जागतिक मानकांनुसार सुरक्षा प्रणाली उपलब्ध आहे.
ग्राहकांसाठी ८ वर्षांची बॅटरी वॉरंटी, Battery-as-a-Service, Assured Buy Back आणि भारतभर ५००+ BEV सक्षम सेवा केंद्रांद्वारे निश्चिंत मालकी अनुभव देण्यात येणार आहे.
अर्बन एसयूव्ही कॉन्सेप्टवर आधारित हे वाहन टोयोटाच्या मल्टी-पाथवे दृष्टिकोनाचा महत्त्वाचा टप्पा असून, ग्राहकांना विविध इलेक्ट्रिफाईड पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध करून देत भारताच्या ऊर्जा सुरक्षितता व डीकार्बोनायझेशनच्या उद्दिष्टांना यांमुळे पाठबळ मिळाले आहे. 

नव्या एबेलाच्या सादरीकरणाच्या प्रसंगी कंपनीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मसाकाझू योशिमुरा म्हणाले की, ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला ही आमच्या मल्टी-पाथवे दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा दुवा आहे. ज्याद्वारे आम्ही कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने वाटचाल करताना कोणालाही मागे न ठेवण्याचा प्रयत्न करतो. या वाहनाच्या माध्यमातून आम्ही भारताच्या हरित मोबिलिटीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाला पाठिंबा देण्याची आमची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करतो. आमचे मजबूत उत्पादन पोर्टफोलिओ, तंत्रज्ञान नेतृत्व, उत्कृष्ट आफ्टर-सेल्स सेवा व विस्तृत डीलर नेटवर्क याच्या जोरावर आम्ही शाश्वत मोबिलिटीचे उद्दिष्ट साध्य करू.”

तर यावेळी टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक तादाशी असाझुमा, डेप्युटी म्हणाले, “इलेक्ट्रिफाईड तंत्रज्ञानामध्ये टोयोटाला तीन दशकांचा जागतिक अनुभव आहे. यामुळे आज जगभरात ३८ दशलक्षांहून अधिक इलेक्ट्रिफाईड वाहने रस्त्यावर असून, ग्राहकांनी मिळून १९७ दशलक्ष टनांपेक्षा अधिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत केली आहे.

‘मास हॅपिनेस’ ही आमची तत्वज्ञानाची संकल्पना असून त्याचा पाया कार्बन न्यूट्रॅलिटीवर आधारित आहे. याच तत्वज्ञानावर टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या पहिल्या BEV — ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला — ची तयारी करण्यात आली आहे. उत्पादनासोबतच आम्ही ग्राहकांना जागतिक दर्जाचा, सुरक्षित व तणावमुक्त मालकी अनुभव देण्यासाठी सज्ज आहोत.”

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...