सीधे मुख्य सामग्री पर जाएं

GJEPC चा मुंबईत दोन ठिकाणी जागतिक B2B दागिन्यांचा मेळावा

प्रदर्शनात 12 आंतरराष्ट्रीय खरेदीदार प्रतिनिधी मंडळे सहभागी होणार

मुंबई: जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) या आठवड्याच्या शेवटी मुंबईतील दोन प्रमुख ठिकाणी आयोजित होणाऱ्या, वर्षातील पहिल्या जागतिक B2B दागिन्यांचा मेळावा - IIJS भारत – सिग्नेचर 2026च्या 18व्या आवृत्तीसाठी सज्ज आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आपल्या जागतिक दागिन्यांच्या कॅलेंडरची सुरुवात करणार आहे. हे प्रदर्शन दोन ठिकाणी सुरू होणार आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (JWCC) येथे 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान आणि IGJME भारत – सिग्नेचर 2026 या यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान प्रदर्शनासोबत 9 ते 12 जानेवारी 2026 दरम्यान गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (NESCO) येथे, आयोजित केले जाईल.

आयआयजेएस म्हणजे रत्न आणि दागिने क्षेत्रातील व्यवसायाला समानार्थी असलेले एक प्रतिष्ठित नाव आहे. वर्षातील पहिलाच मेळावा आयोजित करणारे IIJS भारत – सिग्नेचर हे मार्केटचा दृष्टिकोन ठरवते. आणि यातूनच आगामी वर्षासाठी सोर्सिंग, डिझाइन आणि व्यवसायाची दिशा ठरते. 1.25 लाख चौरस मीटर परिसरात आयोजित या प्रदर्शनात 3,300 हून अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून 1,600 हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील आणि भारतातील 800 हून अधिक शहरांमधून 25,000 पेक्षा जास्त व्यापारी खरेदीदारांचे, तसेच जगभरातील 40 देशांमधून 1,400 आंतरराष्ट्रीय खरेदीदारांचे स्वागत केले जाईल. सोने, हिरे, चांदी, नैसर्गिक सुटे हिरे, रंगीत रत्ने, कुटूर दागिने आणि प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे, तसेच यंत्रसामग्री आणि संबंधित विभागांसह एका सर्वसमावेशक सोर्सिंग वातावरणाचा खरेदीदारांना अनुभव घेता येईल.

प्रदर्शनात 12 आंतरराष्ट्रीय खरेदीदार प्रतिनिधी मंडळे देखील सहभागी होणार आहेत, ज्यामुळे एक जागतिक सोर्सिंग प्लॅटफॉर्म म्हणून आयायजेएस भारत – सिग्नेचरचे स्थान अधिक भक्कम करेल. विशेष म्हणजे, या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय प्रदर्शक देखील सहभागी होतील, ज्यात अमेरिका, यूएई, हाँगकाँग, जपान, थायलंड, तुर्की आणि जर्मनी येथील 21 दागिन्यांच्या कंपन्यांचे 43 स्टॉल्स, तसेच आंतरराष्ट्रीय यंत्रसामग्रीचे 4 आणि संबंधित कंपन्यांच्या 7 स्टॉल्सचा समावेश आहे.व्यावसायिक गती आणि उद्योगाची आवड दर्शवत, या प्रदर्शनात 368 हून अधिक नवीन कंपन्या सहभागी होणार आहेत, ज्यांनी एकत्रितपणे 472 स्टॉल्स घेतले आहेत. IIJS भारत – सिग्नेचरचा सातत्यपूर्ण विस्तार आणि प्रासंगिकता यातून अधोरेखित होते.

 किरीट भन्साळी, अध्यक्ष, जीजेईपीसी म्हणाले,“वर्षातील पहिले जागतिक दागिने व्यापार प्रदर्शन म्हणून, आयआयजेएस भारत – सिग्नेचर उद्योग क्षेत्राची दिशा ठरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. भारतातील रत्न आणि दागिने क्षेत्र जागतिक स्तरावरील विश्वास दृढ करण्यासोबतच, मार्केटमधील विस्तार आणि गुणवत्ता, नावीन्य तसेच  जबाबदार कार्यपद्धतींद्वारे दीर्घकालीन स्पर्धात्मकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आयआयजेएस याच व्यापक ध्येयाच्या हेतूने वाटचाल करते आहे.”

 शौनक पारिख, उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रदर्शनांचे संयोजक, जीजेईपीसी म्हणाले,“आयआयजेएस भारत सिग्नेचर येथूनच या क्षेत्राच्या नवीन वर्षाला सुरुवात होते. दोन ठिकाणी प्रदर्शन भरवण्याच्या कल्पनेमुळे आम्हाला प्रदर्शकांची वाढती मागणी पूर्ण करता येते, तसेच खरेदीदारांना एक वेगळा अनुभव देता येतो. खास तयार करण्यात आलेले विभाग, माहिती देणारी व्यवस्था ते तंत्रज्ञान-आधारित सेवांपर्यंत, हे प्रदर्शन व्यवसायांना वर्षाची सुरुवात स्पष्टता आणि आत्मविश्वासाने करण्यास मदत करते.”

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...