सीधे मुख्य सामग्री पर जाएं

एस.एल.रहेजा रुग्णालयात मुंबईतील पहिले क्रॅनिओफेशियल व टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉइंट शस्त्रक्रिया उत्कृष्टता केंद्र सुरु

चेहरा आणि जबड्यांच्या समस्येने त्रासलेल्या मुंबई व मुंबईबाहेरील रुग्णांना आता आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे तपासणी व उपचार असे दोन्ही एकत्रित सुविधा उपलब्ध करुन देणारे केंद्र उपलब्ध 

मुंबई। फोर्टिसशी संलग्न असलेल्या एस.एल.रहेजा हॉस्पिटलने आज मुंबईतील पहिल्या क्रॅनिओफेशियल आणि टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट (टीएमजे) सर्जरी एक्सलन्स सेंटरचा शुभारंभ केला. रुग्णाच्या चेह-यावरील हाडे, जबडा आणि कवटीच्या भागातील जन्मजात दोष, गंभीर दुखापती किंवा कार्यक्षमतेशी संबंधित गुंतागुंतीच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी हे केंद्र कार्यरत राहील. चेहरा आणि जबड्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना एकाच छताखाली सर्वसमावेशक आणि विशेष वैद्यकीय उपचार मिळावेत, या उद्देशाने या प्रगत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. 

या उद्घाटन कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चेह-याच्या आरोग्याशी संबंधित आजारावंर समाजात जागरुकता निर्माण व्हायला हवी. या समस्यांवर वेळीच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. 

नुकतेच सुरु कऱण्यात आलेले टीएमजे सर्जरी सेंटर ऑफ एक्सलन्स जबड्याशी संबंधित विविध गुंतागुंतीच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. या केंद्रामध्ये जबड्याचे दुखणे, चेह-याला ताठरता येणे, जबडा आकडणे किंवा उघडझाप करताना आवाज येणे, चेह-याची असंतुलित रचना, कवटी आणि चेह-याशी संबंधित जन्मजात व्यंग, दुंभगलेले ओठ व टाळू, चेह-याला झालेली गंभीर दुखापत, जबड्यावरील गाठी व ट्यूमर आणि चेह-याची पूनर्रचना यांसारख्या व्याधींवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. हे केंद्र प्रामुख्याने कमीत कमी शस्त्रक्रिया आणि अत्यंत अचूक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देते. या उपचारपद्धतीमुळे रुग्णाच्या जबड्याची कार्यक्षमता पुन्हा सुधारण्यास मदत होते, रुग्णाला वेदना कमी होतात शिवाय तब्येतीत लवकर सुधारणा दिसून येते. 

चेह-याशी संबंधित टीएमजे विकार हे प्रामुख्याने २० ते ४५ वयोगटातील प्रौढांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत असले तरीही हे विकार कोणत्याही वयोगटातील रुग्णाला प्रभावित करु शकतात. फोर्टिसशी संलग्न असलेले एस.एल.रहेजा हॉस्पिटल येथील क्रॅनिओफेशियल आणि टीएमजे शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. तौफिक बोहरा यांच्या मते, हॉस्पिटलमध्ये दरमहा साधारणपणे ५० रुग्ण टीएमजे समस्यांवरील उपचारांसाठी दाखल होतात. गेल्या काही वर्षांत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या वाढत्या संख्येमागणे मानसिक ताणतणाव, कामाचे अतिरिक्त तास, शरीराची चुकीची ठेवण, झोपेत दात खाणे आणि निद्रानाश आदी जीवनशैलीशी संबंधित घटक कारणीभूत असल्याचे डॉ. बोहरा यांनी सांगितले. अनेकदा टीएमजे आणि क्रॅनिओफेशियल विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना योग्य निदान आणि नियोजित उपचार मिळण्यापूर्वी अनेक वेगवेगळ्या उपचारांची प्रक्रिया पार पाडावी लागते. परिणामी रुग्णांचा पैसा आणि वेळ हे दोन्ही वाया जाते. ही समस्या ध्यानात घेत रहेजा रुग्णालयात हे अत्याधुनिक केंद्र उभारण्यात आले आहे. डॉ. बोहरा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या या सेंटर ऑफ एक्सलन्स या केंद्रात रुग्णांना अचूक निदान, इमेजिंग आणि वेदना व्यवस्थापन यांसारख्या सर्व आवश्यक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असतील. 

हे केंद्र दुभंगलेले ओठ आणि टाळू या समस्येचा सामना करणा-या रुग्णांसाठी बालपणापासून ते प्रौढावस्थेपर्यंत आवश्यक असणारी शस्त्रक्रिया आणि पूनर्वसनासह आयुष्यभर सर्वसमावेशक काळजी उपलब्ध करुन देते. टीएमजे शस्त्रक्रिया केंद्रातील बहुविद्याशाखीय संघ, तज्ज्ञ पथकाच्या मदतीने या समस्यांशी संबंधित रुग्णांच्या चेह-यांची रचना आणि कार्यक्षमता पूर्ववत करण्यासाठी समर्पित आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मॅरिलँड येथून डॉ. बोहरा यांनी टीएमजे मिनी रेसिडेन्सीचे अत्याधुनिक प्रगत प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. दुर्मिळ आजारावर उच्च शिक्षण घेणा-या डॉ. बोहरा यांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जन, रुग्णाच्या वेदना कमी करण्यासाठी नियुक्त तज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट अशा अनुभवी डॉक्टरांच्या टीएमला एकत्र आणते. हे पथक रुग्णाची शारिरीक कार्यक्षमता आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करुन उपचार देते. या केंद्रात वेदनेपासून मुक्तता मिळण्यासाठी शस्त्रक्रियेला पर्यायी असे रामबाण उपचार दिले जातात. याकरिता अत्याधुनिक ३डी इमेजिंग आणि प्लॅनिंगद्वारे केली जाणारी गुंतागुंतीची टीएम जॉइंट पुनर्रचना यांसाऱख्या विविध अत्याधुनिक सेवा एकाच छताखाली उपलब्ध करुन दिल्या जातात.

या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी. फोर्टिसशी संलग्न एस.एल.रहेजा हॉस्पिटलच्या क्रॅनिओफेशियल आणि टीएमजे सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. तौफिक बोहरा म्हणाले, ‘‘आमचे उद्दिष्ट गाठण्यासाठी या सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती करण्यात आली आहे. अचूकता, कार्यक्षमता आणि सौंदर्यशील रचना हे आमचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. चेहरा आणि जबड्याशी संबंधित प्रत्येक समस्या ही वैविध्यपूर्ण असते, त्यामुळेच आमचा भर टीएमजे व जबड्याचे विकार, गुंतागुंतीच्या क्रॅनिओफेशियल समस्या आणि चेह-यावरील लिम्फॅटिक संबंधित आजारांवर प्रगत उपाययोजना देण्यावर आहे. यासाठी आम्ही अत्याधुनिक, कमीत कमी छेद देणा-या आणि अत्यंत अचूक सर्जिकल तंत्रज्ञानाचा वापर करतो. केवळ रुग्णांवर उपचार करणे हे आमचे ध्येय नसून, त्यांना दीर्घकालीन आराम मिळावा तसेच रुग्णांच्या जबड्याची कार्यक्षमता पूर्ववत व्हावी आणि त्याद्वारे रुग्णांचा आत्मविश्वास पूर्ववत व्हावा, याकडे आम्ही प्राधान्याने लक्ष पुरवतो.’’

फोर्टिसशी संलग्न एस.एल.रहेजा हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल पुमानिया म्हणाले, ‘‘या सेंटर ऑफ एक्सलन्सचा शुभारंभ हा मुंबई आणि मुंबईबाहेरील रुग्णांना चेहरा आणि जबड्याशी संबंधित अति-विशेषोपचार अधिक सुलभतेने उपलब्ध करुन देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचाच एक भाग आहे. रुग्णालयातील डॉक्टरांचा सखोल वैद्यकीय अनुभव आणि फोर्टिस हेल्थकेअरची अत्यंत कठोर गुणवत्ता मानके यांचा सुरेख मेळ घालून आम्ही कवटी, चेहरा आणि जबड्याशी संबंधित गुंतागुतींच्या समस्या असलेल्या रुग्णांना चांगले उपचार देतो. हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या या एकात्मिक आणि पूर्णतः रुग्ण-केंद्रीत आरोग्य व्यवस्थेमुळे रुग्णांना अधिक दर्जेदार उपचार मिळतील. 

या केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी टीएमजे आजाराशी संबंधित सामाजित उदासिनतेबाबत ज्येष्ठ अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते यांनीही आपल्या प्रतिक्रियेतून सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘ चेहरा आणि जबड्याशी संबंधित समस्या अनेकदा दुर्लक्षित केल्या जातात. या समस्या दैनंदिन जीवनात परिणामकारक ठरु लागल्या की सर्वांना ख-या अर्थाने हा त्रास सतावू लागतो. रुग्ण बरेचदा या समस्येमुळे आत्मविश्वास गमावतो. त्याला व्यक्त होत असताना अडथळा निर्माण होत असतो. अशा केंद्रांची भूमिका केवळ उपचारांपुरतीच मर्यादित नसून, लवकर निदान आणि विशेष उपचारांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही महत्त्वाची ठरते. या समस्येच्या निराकरणाकरिता वेळीच योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा जेणेकरुन योग्यवेळीच रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा घडेल, रुग्णाच्या जीवनमानातही सकारात्मक बदल घडून येईल. 

या उपक्रमाच्या शुभारंभासह मुंबई येथील एस.एल.रहेजा रुग्णालय आपल्या विशेष वैद्यकीय सेवांचा विस्तार करत असून, रुग्णांना अत्याधुनिक दर्जेदार आणि रुग्णकेंद्रित उपचार देण्याच्या आपल्या बांधिलकीला अधिक बळकटी देत आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी तत्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि सर्वांगीण उपचार पद्धती यांच्या माध्यमातून रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन सेवा देण्यावर रुग्णालयाचा भर आहे. समाजाच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेत रुग्णांना वेळेवर आणि प्रभावी उपचार उपलब्ध करुन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असून, यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास रुग्णालय व्यवस्थापननाने व्यक्त केला. 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...