सीधे मुख्य सामग्री पर जाएं

श्रेयस तळपदे प्रस्तुत, ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि ओ डी आय ग्रुप निर्मित ‘मर्दिनी’ ३ जुलै २०२६ रोजी होणार प्रदर्शित

मोठ्या पडद्यावर उलगडणार नारीसामर्थ्याची गाथा ! श्रेयस तळपदे प्रस्तुत, ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि ओ डी आय ग्रुप निर्मित ‘मर्दिनी’ ३ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित ! 

प्रत्येक स्त्रीतील मर्दिनीला जागं करणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.  नारीशक्तीचा प्रभावी आणि प्रेरणादायी आविष्कार असलेला हा सिनेमा ३ जुलै २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या या नव्या पोस्टर मध्ये एक ठाम पाऊल, उग्र रूप आणि ज्वालांनी वेढलेलं नाव ‘मर्दिनी’ पाहायला मिळतं. 

सामान्य चौकटी मोडत, स्त्रीच्या संयम, संघर्ष आणि आत्मबळाचा ठसा उमटवणारा ‘मर्दिनी’ भावनांना स्पर्श करणारा आणि मनाला प्रश्न विचारायला लावणारा अनुभव देईल असा दिसतोय. 

 प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारख्या प्रमुख कलाकारांच्या सशक्त अभिनयासोबत बालकलाकार मायरा वैकुळ हिची भूमिका कथेला एक वेगळी भावनिक उंची देते. 

अजय मयेकर यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असून, दिप्ती तळपदे यांच्या निर्मितीखाली ‘मर्दिनी’ साकारला जात आहे.  तर सह निर्माती टिना राकेश कोठारी, छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ, संगीत हितेश मोडक, पटकथा आणि संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी केले आहे. 

ताकदीला आवाज आणि धैर्याला दिशा देणारा ‘मर्दिनी’ ३ जुलै २०२६ पासून प्रदर्शित.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

"द सिनेमा प्रीमियर विथ विन्स ड्यूस," जागतिक सिनेमाच्या गौरवशाली इतिहासाला समर्पित एक भव्य कार्यक्रम

"द सिनेमा प्रीमियर विथ विन्स ड्यूस," जागतिक सिनेमाच्या गौरवशाली इतिहासाला समर्पित एक भव्य कार्यक्रम जागतिक सिनेमा, साहित्य आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मितीचा एक अनोखा उत्सव मुंबई। जागतिक सिनेमाचा इतिहास, त्याचा कलात्मक वारसा आणि चित्रपट निर्मितीच्या उत्क्रांतीला समर्पित, "द सिनेमा प्रीमियर विथ विन्स ड्यूस," या भव्य आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. हा विशेष कार्यक्रम जागतिक चित्रपट संस्कृती, साहित्य आणि सर्जनशील अभिव्यक्तीचा एक अनोखा संगम असेल. हा प्रतिष्ठित प्रकल्प ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि शोरलाइन एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने सादर केला जात आहे. या प्रसंगी "द सिनेमा - अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ वर्ल्ड सिनेमा (१८२१-२०२५)" हा प्रशंसित आंतरराष्ट्रीय चित्रपट विशेषतः प्रदर्शित केला जाईल. हा महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रकल्प जागतिक सिनेमाचा उगम, विकास, कलात्मक चळवळी, मूकपट, दिग्गज चित्रपट व्यक्तिमत्त्वे आणि तांत्रिक क्रांती यांचा आकर्षक प्रवास उलगडतो. भविष्यातील पिढ्यांसाठी सिनेमाचा अमूल्य वारसा जतन करण्याच्या उद्देशाने हा चि...

मीनाक्षी जायसवाल आणि सागर अरोरा यांचा 'तेरा नूर' हा म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे

मुंबई। अभिनेत्री मीनाक्षी जायसवालचा नवीन रोमँटिक म्युझिक व्हिडिओ 'तेरा नूर' १२ जून रोजी यूट्यूबवर प्रदर्शित झाला आणि तो प्रेक्षकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या सुंदर गाण्यात मीनाक्षीच्या विरुद्ध सागर अरोरा दिसतो. हे गाणे स्वतः सागर अरोराने लिहिले, संगीतबद्ध केले आणि गायले असून, ते त्याच्या 'डीजे सार' या अधिकृत यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले आहे. सागर अरोरा हा दुबईस्थित सुपरमॉडेल आणि अभिनेता आहे. त्याला डीजेइंगमध्ये विशेष आवड असून तो या क्षेत्रातील तज्ञही आहे. 'तेरा नूर' हे एक रोमँटिक गाणे आहे, जे प्रेमाच्या सुंदर भावनांना मनमोहक पद्धतीने टिपते. म्युझिक व्हिडिओचे अप्रतिम छायाचित्रण, सुंदर ठिकाणे आणि मीनाक्षी जायसवाल व सागर अरोरा यांच्यातील उत्कृष्ट केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. याचे चित्रीकरण भिवंडी रोडवरील सेट सिटीमध्ये करण्यात आले. कडक ऊन असूनही, संपूर्ण टीमने कठोर परिश्रम आणि समर्पणाने चित्रीकरण पूर्ण केले. मीनाक्षी जायसवालने सांगितले की, उष्ण हवामानात चित्रीकरण करणे आव्हानात्मक होते, परंतु व्हिडिओच्या अंतिम परिणामामुळे सर्व कष्...

चाहत खन्ना यांनी त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे — A to E: Actor to Entrepreneur प्रकाशन डायनमिक्स मॉलमधील क्रॉसवर्ड बुकस्टोरमध्ये केले

टाळ्या थांबल्यानंतर: चाहत खन्नाची नवी सुरुवात, एक ब्रँडची उभारणी आणि स्वतःला शोधण्याची कहाणी अभिनेत्रीतून उद्योजक बनलेल्या चाहत खन्नाने मुंबईत आपल्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन करत पडद्यामागची अनकथित कहाणी सांगितली मुंबई। अभिनेत्री आणि उद्योजक चाहत खन्ना यांनी त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे — A to E: Actor to Entrepreneur प्रकाशन मुंबईतील जुहू येथील डायनमिक्स मॉलमधील क्रॉसवर्ड बुकस्टोरमध्ये केले. या कार्यक्रमाला माध्यम प्रतिनिधी, उद्योगातील मित्र आणि शुभचिंतक उपस्थित होते. ओसवाल बुक्स अँड लर्निंग प्रायव्हेट लिमिटेडचे साहित्यिक इम्प्रिंट Ctrl+Alt+Lit यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक चाहत यांच्या टेलीव्हिजन क्षेत्रातील यशापासून ते उद्योजकतेपर्यंतच्या प्रवासाचे खरे आणि प्रामाणिक चित्रण आहे. प्रकाशन सोहळ्यात चाहत यांनी पुस्तकातील काही भाग वाचून दाखवले आणि त्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या अनुभवांबद्दल मनमोकळेपणाने बोलल्या मनोरंजन उद्योगातील आव्हानांशी दोन हात करणे, स्वतःवरील शंकेवर मात करणे, मातृत्व स्वीकारणे आणि स्वतःचा व्यवसाय उभारणे. प्रकाशन सोहळ्यात बोलताना चाहत खन्ना म्हणाल्या,...