सीधे मुख्य सामग्री पर जाएं

पीआरआयएफच्या ‘रफ्तार’ उपक्रमाने महाराष्ट्रातील १६००+ आदिवासी मुलांना खेळांपर्यंत पोहोच दिली

मुंबई। राष्ट्रीय युवा दिनी, पर्नोड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन (पीआरआयएफ) ‘रफ्तार’ उपक्रमाची तीन वर्षे पूर्ण करत आहे. ‘रफ्तार’ हा एक व्यवस्थित बांधणी असलेला अॅथलेटिक प्रशिक्षण प्रोग्राम असून ब्रिजिस ऑफ स्पोर्ट्स फाऊंडेशनसोबत भागीदारीत तो नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील तळेगाव, अवानखेड आणि करंजी या तीन गावांमध्ये १४ वर्षांखालील आदिवासी मुलांसाठी राबवण्यात येत आहे. आत्तापर्यंत ‘रफ्तार’ सामुदायिक क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून 1600 पेक्षा जास्त आदिवासी मुलांपर्यंत पोहोचला आहे, ५३१ मुलांना नियमित प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्यात २० असे खेळाडू सामील आहेत, ज्यांना स्प्रिंटिंगमध्ये खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रोग्राममध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्यांत 50% मुली आहेत. यातून सहभाग आणि आत्मविश्वास याबाबतीत मोठे परिवर्तन झाल्याचे दिसून येते. रफ्तार सारख्या प्रोग्राममधून समतापूर्ण समाजासाठी काम करताना विविधता आणि समावेशकता यांच्या प्रती असलेली पीआरआयएफची वचनबद्धता दिसून येते. या प्रोग्राममध्ये खेळांना समावेशकता, शिस्त आणि संधीसाठीचे साधन म्हणून वापरले आहे.

अहवालानुसार, भारतात संघटित खेळांपर्यंतची पोहोच मर्यादित आहे. भारतातील ३५ वर्षांखालील केवळ १% तरुण संघटित खेळांमध्ये भाग घेतात. महिलांचा सहभाग २९% आहे. जो ४०% या जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. दिंडोरी, नाशिक सारख्या भागातील आदिवासी मुलांच्या बाबतीत हे प्रमाण आणखी कमी आहे, ज्याचे कारण आहे शाळांमध्ये शारीरिक शिक्षणासाठी शिक्षक नसणे, क्रीडा साधने नसणे आणि मुलांमधील प्रतिभा शोधून काढण्याचे साधन नसणे. सामाजिक अपेक्षांमुळे मुली शारीरिक क्रियाकलापांमधून आणखी लवकर बाद होतात, ज्यामुळे सर्वांगीण विकास आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या संधींपासून वंचित राहतात.

२०२२ मध्ये रफ्तार हा प्रकल्प २० पेक्षा जास्त प्राथमिक शाळांमधील खेळांच्या ईकोसिस्टमचे मूल्यांकन करून तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्याशी बोलून सुरू करण्यात आला होता. हा प्रोग्राम फिटनेस चाचणीच्या माध्यमातून प्रतिभावान मुले निवडतो आणि त्यांना नियमित कोचिंग, स्पोर्ट्स गियर आणि पोषण देऊन त्यांना तयार करतो. ज्या मुलांमध्ये विशेष गुणवत्ता दिसते, त्यांना प्रगत प्रशिक्षण आणि राज्य-स्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. गेल्या तीन वर्षांमध्ये, या प्रोग्रामने ३०० पेक्षा जास्त प्रशिक्षण सत्रे आयोजित केली आहेत. या प्रोग्रामने त्याच समुदायातील नऊ स्थानिक कोचीसना प्रशिक्षण देऊन स्थानिक क्षमता वाढवली आहे आणि हे उपक्रम दीर्घकाळ चालत राहतील याची खातरजमा केली आहे. ‘रफ्तार’चे समर्थन मिळालेल्या खेळाडूंनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीच्या स्पर्धांमध्ये 50 पेक्षा जास्त पदके जिंकली आहेत. हा प्रोग्राम सुरू होण्यापूर्वीच्या वर्षी केवळ एक पदक होते.

गगनदीप सेठी (वरिष्ठ उपाध्यक्ष – एकात्मिक संचालन, शाश्वतता आणि जबाबदारी, पर्नोड रिकार्ड इंडिया) सांगितले, “विविधता आणि समावेशकता पीआरआयएफच्या कामात केंद्रस्थानी आहे. ‘रफ्तार’च्या माध्यमातून आम्ही आदिवासी मुलांना संरचित खेळांपर्यंत पोहोच मिळवून देण्यास मदत करत आहोत तसेच स्थानिक कोचिंग क्षमता मजबूत करत आहोत आणि महाराष्ट्राच्या आदिवासी भागांमधील मुलांना खेळांमध्ये जास्तत जास्त सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत.”

स्थानिक इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी करंजी येथील गुरुकुल शाळेत एक सामुदायिक स्पोर्ट्स जिम-कम-अॅक्टिव्हिटी रूम स्थापन करण्यात आली आहे, जेथे प्रशिक्षण सुविधांचा नियमित लाभ घेऊन शाळा आणि समुदायातील मुलांना फायदा होत आहे.

भविष्यात समुदाय-प्रेरित उपक्रमांना बळकटी देण्याबरोबरच ‘रफ्तार’चा उद्देश जास्तत जास्त आदिवासी मुलांना राष्ट्रीय क्रीडा अकादमी, क्रीडा-संबंधित कारकीर्दी आणि सशस्त्र दलातील संधींपर्यंत प्रवेश मिळवून देण्यात मदत करण्याचा आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...