सीधे मुख्य सामग्री पर जाएं

ह्युंदाई ट्रॉफी कनेक्‍टची घोषणा

क्रिकेटप्रेमींना टी२० वर्ल्‍ड कप ट्रॉफी जवळून पाहण्‍याची अभूतपूर्व संधी 

मुंबई। क्रिकेटप्रेमी २०२६ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाच्या तयारीत असताना, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) सोबत ह्युंदाई मोटर कंपनीच्या बहुवर्षीय प्रीमियर पार्टनरशीप अंतर्गत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड यांनी ‘ह्युंदाई ट्रॉफी कनेक्‍ट’ या विशेष उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत २०२६ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुंबई, बेंगळुरू आणि गुरुग्राम या भारतातील तीन प्रमुख शहरांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. ही प्रतिष्ठित २०२६ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक ट्रॉफी क्रिकेटप्रेमी आणि भेट देणाऱ्या चाहत्यांना जवळून पाहण्याची तसेच संस्मरणीय छायाचित्रे टिपण्याची एक अनोखी संधी देणार आहे.

या अनुभवाला अधिक आकर्षक बनवण्यासाठी, देशातील सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा देखील प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, क्रिकेटच्या उत्सवाबरोबरच ह्युंदाईच्या प्रगत एसयूव्ही तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.

ह्युंदाई ट्रॉफी कनेक्‍टविषयी बोलताना, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे मार्केटिंग प्रमुख विराट खुल्लर म्हणाले, “भारतामध्ये क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही, तर कोट्यवधी लोकांना एकत्र आणणारी एक भावना आहे. ‘ड्रिव्‍हन बाय पॅशनस’ या मूल्याने प्रेरित होऊन, आयसीसी आणि २०२६ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक ट्रॉफीच्या या विशेष प्रदर्शनाच्या माध्यमातून ह्युंदाई क्रिकेटप्रेमींना त्यांच्या आवडत्या खेळाच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशा चाहताकेंद्रित उपक्रमांद्वारे, क्रिकेट जगभरात निर्माण करत असलेली आवड, अभिमान आणि एकतेची भावना अधोरेखित करणारे अर्थपूर्ण अनुभव देण्याची आमची वचनबद्धता आम्ही पुन्हा एकदा अधोरेखित करत आहोत.”

या प्रसंगी प्रतिक्रिया देताना, आयसीसीचे चीफ कमर्शियल ऑफिसर अनुराग दहिया म्हणाले, “ह्युंदाई ट्रॉफी कनेक्‍टच्या माध्यमातून मुंबई, बेंगळुरू आणि गुरुग्राम येथील क्रिकेटप्रेमींना आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक ट्रॉफी अधिक जवळून अनुभवण्याची संधी मिळत असल्याचा आम्हाला आनंद आहे. हा उपक्रम खेळाच्या त्या अद्वितीय शक्तीचा उत्सव आहे, जी कोट्यवधी लोकांना एकत्र आणते, तसेच जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित प्रतीकांपैकी एका ट्रॉफीशी चाहत्यांना जोडण्याची दुर्मिळ संधी प्रदान करते. ही भागीदारी ह्युंदाई आणि आयसीसी यांच्यातील एका अर्थपूर्ण प्रवासाची सुरुवात दर्शवते, ज्यामध्ये आम्ही मिळून चाहत्यांचा सहभाग अधिक दृढ करू, क्रिकेटवरील प्रेम अधिक व्यापक पातळीवर पोहोचवू आणि स्टेडियमच्या पलीकडे जाऊन क्रिकेटला त्याच्या सर्वाधिक उत्कट चाहत्यांच्या हृदयापर्यंत घेऊन जाऊ. ह्युंदाईसोबतच्या या भागीदारीबाबत आम्ही अत्यंत उत्साहित आहोत आणि क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय क्षण निर्माण करण्यास उत्सुक आहोत.”

ह्युंदाईच्या मोबिलिटीच्या पलीकडे जाऊन चाहत्यांशी नाते जोडण्याच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगतपणे, कंपनीने अनेक आकर्षक ऑन-ग्राऊंड एंगेजमेंट अ‍ॅक्टिव्हिटीजचे नियोजन केले आहे. या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे ‘दीवानगी मीटर’, ज्यामध्ये चाहते क्रिकेटबद्दलची आपली आवड आणि उत्साह व्यक्त करू शकतील तसेच आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक सामन्यांची तिकिटे जिंकण्याची संधी मिळवू शकतील.

यासोबतच, भेट देणाऱ्या चाहत्यांना क्रिकेट स्टेडियम-शैलीतील सेटअप, क्रिकेट-प्रेरित फोटो ऑप्स आणि व्हीआर क्रिकेट गेम यांसारख्या तल्लीन करणाऱ्या अनुभवांचा आनंद घेता येईल. या सर्व उपक्रमांमुळे प्रतिष्ठित ट्रॉफीभोवती अविस्मरणीय क्षण निर्माण होतील आणि क्रिकेटप्रेमींना एक वेगळाच उत्साही अनुभव मिळेल.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमडीआर रचनेमुळे 'यूपीआय'ची शाश्वतता, नवोन्मेष आणि सुरक्षेला बळ मिळेल: असोचॅम

मुंबई। असोचॅमचे  अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी मोठ्या मूल्याच्या व्यापारी व्यवहारांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन यूपीआय फ्रेमवर्कचे स्वागत केले आहे. हे नवीन धोरण यूपीआयची शाश्वतता मजबूत करेल, नवोन्मेषाला पाठबळ देईल, फसवणूक रोखेल आणि त्याची स्वीकारार्हता वाढवेल. ही रचना पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वीकृती नेटवर्कला सक्षम करेल, ज्यामुळे यूपीआयचा विस्तार होऊन देशभरातील ग्राहक आणि व्यावसायिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल. असोचॅमने सरकारच्या संतुलित दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे, ज्याअंतर्गत सर्व व्यक्ती-ते-व्यक्ती यूपीआय व्यवहार, रक्कमेची मर्यादा न ठेवता, पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहेत. तसेच २,००० रुपयांपर्यंतची व्यापारी देयके देखील एमडीआर मुक्त राहतील. ही नवी रचना पात्र लहान व्यापाऱ्यांना, विशेषतः व्यक्ती-ते-व्यक्ती श्रेणीअंतर्गत यूपीआय क्यूआर कोडद्वारे दरमहा १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारणाऱ्या फेरीवाल्यांना आणि स्थानिक दुकानदारांना शून्य-एमडीआरचा लाभ देत राहील. यामुळे सूक्ष्म आणि लहान व्यावसायिकांना अतिरिक्त देयक खर्चापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. भारता...

सॅमसंगचा बीस्‍पोक एआय विंडफ्री एसीद्वारे स्मार्ट कूलिंगचा अनुभव

मुंबई। लाइनअप भारतातील कुटुंबांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. २३ मॉडेल्‍स, तसेच ४-स्‍टार व्‍हेरिएण्‍ट्स असलेली नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री श्रेणी सर्वोत्तम कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमतता आणि प्रीमियम डिझाइनवर लक्ष केंद्रित करते. भारतातील कुटुंबांना वाढत्‍या तापमानाचा आणि सतत बदलत असलेल्‍या हवामान स्थितींचा सामना करावा लागत असताना एअर कंडिशनिंगबाबत अपेक्षा साध्‍या कूलिंगपलीकडे जात आहेत. सॅमसंगची १०० टक्‍के बीस्‍पोक एआय विंडफ्री एअर कंडिशनर्सची २०२६ लाइनअप या परिवर्तनाचे निराकरण करते, जेथे या लाइनअपमध्‍ये सर्वोत्तम कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमता आणि प्रीमियम डिझाइन अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी भारतातील कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. हे एअर कंडिशनर्स रूममधील स्थिती आणि वापरकर्त्‍याच्‍या पसंतीशी सर्वोत्तमपणे जुळून जातात, जेथे योग्‍य कूलिंग व आरामदायीपणा देतात. रूममध्‍ये त्‍वरित कूलिंग निर्माण करायचे असल्‍यास एआय फास्‍ट व विंडफ्री कूलिंग+ वैशिष्‍ट्ये साह्य करतात, तर ड्राय कम्‍फर्ट मोड भारतातील मान्‍सूनच्‍या काळात आर्द्रतेवर देखरेख ठेवत...

दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती मुंबई। ज्येष्ठ पत्रकार आणि 'मुंबई तरंग' (गुजराती आणि हिंदी वृत्तपत्र) तसेच 'वेस्टर्न इंडिया टाइम्स' (इंग्रजी दैनिक) चे मुख्य संपादक, दिलीप पटेल यांची सरदार वल्लभभाई पटेल पार्टीच्या गुजरात राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वश्रुत आहे की, दिलीप पटेल हे पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांच्या निःपक्षपाती आणि निर्भीड लेखनासाठी ओळखले जातात. ते मुंबईत, तसेच दिल्लीसह संपूर्ण गुजरातमध्ये आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनता, सरकार आणि प्रशासनाशी सक्रियपणे संवाद साधतात. कामगार, शेतकरी आणि सैनिकांचा आवाज नेहमीच उठवणाऱ्या, तसेच सरदार साहेबांच्या 'सामर्थ्यवान भारताचा पाया, सरदारांचे विचार' आणि 'राष्ट्र प्रथम' या तत्त्वांचे पालन करणाऱ्या व्यक्तीची पक्षाच्या या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने गुजरातमध्ये पक्षाला आणखी बळकटी मिळेल.