सीधे मुख्य सामग्री पर जाएं

पेपरफ्रायने भारतातील 'होम रिपोर्ट कार्ड रिवाइंड २०२५' प्रकाशित केले

मुंबई। फर्निचर आणि होम गुड्स क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य 'ओम्नीचॅनेल' बाजारपेठ असलेल्या 'पेपरफ्राय'ने आपले लोकप्रिय 'होम रिपोर्ट कार्ड २०२५' प्रसिद्ध केले असून, या उपक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. २०२५ मध्ये भारतीय कुटुंबांनी आपल्या घरासाठी नेमकी कशी खरेदी केली, याचा सखोल आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. ७०० हून अधिक शहरांमधील प्रत्यक्ष खरेदीच्या व्यवहारांवर आधारित असलेल्या या अहवालातील काही महत्त्वाच्या निष्कर्षांनुसार, आता भारतीय ग्राहक आपले संपूर्ण घर एकाच वेळी सजवण्याऐवजी, वर्षभरात हळूहळू एका-एका खोलीचा कायापालट करण्यावर अधिक भर देत आहेत. फर्निचरच्या तुलनेत होम गुड्स (घरातील वस्तू) श्रेणीतील व्यवहार दुपटीने जास्त झाल्याचे दिसून आले आहे. यात प्रामुख्याने स्टोरेज, किचन युटिलिटीज, ऑर्गनायझर्स आणि लायटिंग या वस्तूंना मोठी मागणी होती. बेंगळुरू, पुणे आणि जयपूर यांसारख्या शहरांमध्ये घराशी संबंधित एकूण खरेदीमध्ये घरातील वस्तूंचे प्रमाण निम्म्याहून अधिक होते.

भारतीय घरांमध्ये लिव्हिंग रूम (दिवाणखाना) ही आता फक्त बसण्या-उठण्याची जागा उरलेली नसून त्या घरातील व्यक्तींचे व्यक्तिमत्व आणि सामाजिक विचार व्यक्त करणारे सर्वात महत्त्वाचे स्थान बनले आहे. लिव्हिंग रूममधील फर्निचरच्या बाबतीत ग्राहकांचा कल लक्षणीयरीत्या वाढला असून, केवळ गरजेपोटी खरेदी करण्याऐवजी जीवनशैली उंचावण्याच्या उद्देशाने नियोजनबद्ध बदल करण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. सोफा बदलण्याचा कालावधी आता मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, ग्राहक साधारणपणे दर ४ वर्षांनी आपला सोफा बदलत आहेत. बेडरूमच्या बाबतीत, संपूर्ण देशभरात क्वीन-साईज बेड आणि गाद्यांची मागणी आजही कायम आहे.

आशिष शाह, सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, पेपरफ्राय म्हणाले की, "पेपरफ्रायच्या 'होम रिपोर्ट कार्ड २०२५'ची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नेहमीप्रमाणेच, हा अहवाल केवळ भविष्यातील अंदाजांवर आधारित नसून, पेपरफ्रायवरून लाखो कुटुंबांनी प्रत्यक्षात केलेल्या खरेदीवर आणि त्यांच्या वर्तणुकीवर आधारित आहे. भारतीय घरे आता अधिक व्यक्तिगत आवडीनिवडी, व्यावहारिक दृष्टिकोन आणि विचारपूर्वक कशी सजवली जात आहेत, याचे दर्शन हा अहवाल घडवतो. दरवेळप्रमाणेच यामध्ये प्रादेशिक आवडीनिवडी आणि पसंतीबाबतची रंजक माहिती देण्यात आली आहे. यावर्षी पेपरफ्रायवर अनेक नवीन डी2सी (थेट ग्राहकांपर्यंत) ब्रँड्स लाँच झाल्यामुळे, ग्राहक आता अधिक चोखंदळ झाले असून ते वैशिष्ट्यपूर्ण आणि डिझाइन-केंद्रित उत्पादनांना पसंती देत आहेत. यावर्षी देखील पेपरफ्राय ग्राहकांसाठी आणि ब्रँड्ससाठी 'फॅशन फॉर होम' चे हक्काचे ठिकाण बनण्याचे आपले ध्येय अधिक जोमाने पुढे नेईल."

कुलभूषण अतकर, मार्केटिंग आणि फर्निचर कॅटेगरी हेड, पेपरफ्राय म्हणाले, “पेपरफ्रायच्या 'होम रिपोर्ट कार्ड २०२५' मधून एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते, ती म्हणजे ग्राहक आता अधूनमधून घर सजवण्याऐवजी सातत्याने घर घडवण्यावर भर देत आहेत. आता ग्राहक खरेदीसाठी सण-उत्सव किंवा नवीन घराची वाट पाहत बसत नाहीत, तर वर्षभरात छोटे पण खात्रीशीर निर्णय घेऊन घर अपग्रेड करत आहेत. ब्रँड्स आणि मार्केटर्ससाठी ही विचार करण्याची नवी दिशा आहे. ग्राहकांच्या जीवनातील विविध टप्पे, ऋतू आणि खास क्षणांनुसार जेव्हा त्यांचे घर बदलासाठी तयार असेल, तेव्हा योग्य सोल्यूशन्स उपलब्ध करून देणे हेच यशाचे गमक ठरेल; केवळ कॅलेंडरमधील तारखा पाहून चालणार नाही.”

यावर्षी डिझाइनच्या बाबतीत 'लायटिंग' (रोषणाई) हा सर्वात मोठा बदल म्हणून समोर आला आहे. महानगरांमध्ये हँगिंग लाइट्स आणि वॉल लॅम्प्सनी सॉफ्ट डेकोरच्या इतर वस्तूंना मागे टाकले आहे. भारतातील होम गुड्सच्या एकूण मागणीमध्ये टियर-२ शहरांचा वाटा ४० टक्क्यांहून अधिक राहिला आहे. गोवा, नागपूर, कोची आणि भोपाळ यांसारख्या शहरांनी घराची सजावट आणि उपयुक्तता वाढवणाऱ्या वस्तूंमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...