सीधे मुख्य सामग्री पर जाएं

टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍सने 'एक्‍सप्रेस' पोर्टफोलिओचा विस्‍तार केला

पेट्रोल व ट्विन-सिलिंडर सीएनजी व्‍हेरिएण्‍ट्समध्ये लॉन्च केले 

मुंबई। टाटा मोटर्स पसेंजर वेईकल्‍स (टीएमपीव्‍ही) या भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने पेट्रोल व सीएनजीमध्‍ये एक्‍सप्रेस लाँच केली, ज्‍यासह प्रशंसित एक्‍सप्रेस ईव्‍ही व्‍यतिरिक्‍त आपला उद्देशासह डिझाइन करण्‍यात आलेला फ्लीट पोर्टफोलिओ विस्‍तारित केला आहे. या लाँचमागे मोठ्या बाजारपेठेच्‍या गरजांची पूर्तता करण्‍याचा मनसुबा आहे. हा पुढाकार टीएमपीव्‍हीचा त्‍यांच्‍या मल्‍टी-पॉवरट्रेन धोरणावरील फोकस अधिक दृढ करतो, तसेच भारतभरातील व्‍यावसायिक फ्लीट ऑपरेटर्सना सानुकूल, उच्‍च अपटाइम गतीशीलता सोल्‍यूशन्‍स देते. एक्‍सप्रेस पेट्रोल व सीएनजीसाठी बुकिंग्‍ज आता अधिकृत फ्लीट डिलरशिप्‍समध्‍ये सुरू आहे, जेथे दर्जात्‍मक फ्लीट सेदान किमती पेट्रोल व्हेरिएण्‍टसाठी ५.५९ लाख रूपयांपासून आणि सीएनजी व्‍हेरिएण्‍टसाठी ६.५९ लाख रूपयांपासून सुरू होतात. या किमती एक्‍स-शोरूम दिल्‍ली आहेत. 

टीएमपीव्‍हीच्‍या प्रमाणित १.२ लिटर रेवोट्रॉन इंजिनची शक्‍ती असलेले आणि मॅन्‍युअल ट्रान्‍सशिनसह सादर करण्‍यात आलेले एक्‍सप्रेस पेट्रोल व सीएनजी व्‍हेरिएण्‍ट्स विश्वसनीय, टिकाऊ आणि शाश्वत फ्लीट वापरासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. विशेषत: व्‍यावसायिक गतीशीलतेसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या एक्‍सप्रेस सीएनजीमध्‍ये विभागातील प्रथम ७० लिटर (पाण्‍याची क्षमता) ट्विन-सिलिंडर सीएनजी फ्यूएल टँक (विभगातील सर्वोच्‍च क्षमता) आहे, ज्‍यामुळे ग्राहक टँकमध्‍ये पुन्‍हा इंधन भरण्‍याबाबत चिंता न करता लांबचा प्रवास करू शकतात. महत्त्‍वाचे म्‍हणजे इंटेलिजण्‍ट ट्विन-सिलिंडर पॅकेजिंग विभागातील सर्वोत्तम, अद्वितीय बूट स्‍पेसची खात्री देते, यामुळे फ्लीट ऑपरेटर्सच्‍या सामानासाठी कमी जागा असण्‍याच्‍या समस्‍येचे निराकरण झाले आहे आणि सेदान ताफ्यांची उत्‍पन्‍न क्षमता वाढली आहे. तसेच, पेट्रोल व्हेरिएण्‍टमध्‍ये पेट्रोल फ्लीट सेदान श्रेणीमधील ४१९ लिटरची सर्वात मोठी बूट स्‍पेस आहे.

टाटा एक्‍सप्रेस लाइन अप विस्‍तारित करण्‍याबाबत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ''टाटा एक्‍सप्रेस फ्लीट ग्राहकांना, तसेच प्रवाशांना व मालकांना सामना कराव्‍या लागणाऱ्या वास्‍तविक ऑपरेटिंग आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली. आमच्‍या फ्लीट ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आम्‍हाला विभागातील प्रथम ७०-लिटर ट्विन-सिलिंडर सीएनजी व्‍हेरिएण्‍ट सादर करण्‍याचा आनंद होत आहे, ज्‍यामध्ये विभागातील सर्वोत्तम उपयुक्‍त बूट स्‍पेस आहे, तसेच पेट्रोल व्‍हेरिएण्‍टमध्‍ये सर्वात मोठे बूट स्‍पेस आहे. आमच्‍या प्रमाणित १.२-लिटर रेवोट्रॉन पॉवरट्रेनवर आधारित आणि दीर्घकालीन वॉरंटी, सर्वोत्तम फायनान्‍स, समर्पित फ्लीट डिलरशिप्‍सच्‍या पाठबळासह टाटा एक्‍सप्रेस फ्लीट आपल्‍या इलेक्ट्रिक व आयसीई पॉवरट्रेन्‍ससह ग्राहकांना परिपूर्ण, भविष्‍यासाठी सुसज्‍ज गतीशीलता प्‍लॅटफार्म देईल, ज्‍यासह भारतातील व्‍यावसायिक गतीशीलता क्षेत्रात आमचा मार्केट शेअर वाढेल.''

ऑपरेटर्सना अधिक मन:शांती देण्‍यासाठी एक्‍सप्रेस आयसीई फ्लीट ३ वर्ष किंवा १,००,००० किमी (जे अगोदर असेल ते) प्रमाणित वॉरंटीसह येईल, जी जवळपास ५ वर्ष किंवा १,८०,००० किमीपर्यंत (जे अगोदर असेल ते) विस्‍तारित करता येईल. तसेच, प्रति किलोमीटर ०.४७ रूपये इतका कमी मेन्‍टेनन्‍स खर्च, फ्लीट ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्या आकर्षक फायनान्‍स सोल्‍यूशन्‍ससह पेट्रोल व सीएनजीमधील एक्‍सप्रेस या श्रेणीमधील खरेदी करण्‍यासाठी सर्वोत्तम वेईकल आहे.

संपूर्ण पॅकेजमध्‍ये अधिक भर करत टीएमपीव्‍हीने निवडक शहरांमध्‍ये विशेष, फ्लीट-केंद्रित डिलरशिप्‍स देखील स्‍थापित केले आहेत, जे समर्पित सेल्‍स व सर्विस पायाभूत सुविधा देतात, ज्‍या कमर्शियल ग्राहकांच्‍या विशिष्‍ट गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत. यामधून जलद टर्नअराऊंड, उच्‍च वेईकल उपलब्‍धता आणि वेईकल जीवनचक्रामध्‍ये सतत पाठिंब्‍याची खात्री मिळते. या विस्‍तारित पोर्टफोलिओसह टाटा एक्‍सप्रेस (पेट्रोल, सीएनजी व ईव्‍ही)ने उच्‍च आकारमान, उच्‍च वापर असलेल्‍या विभागांसह एअरपोर्ट ट्रान्‍सफर्स, कॅब अॅग्रीगेटर्स, इंटरसिटी ऑपरेशन्‍स, कर्मचारी परिवहन, रेण्‍ट-ए-कार सर्विसेस आणि टूरिस्‍ट टॅक्‍सी ऑपरेटर्ससाठी मोठ्या विकास संधी खुल्‍या केल्‍या आहेत. 

 


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

‘फार्म टू फॉरेन’ उपक्रम महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक पटलावर नेणार

असोचॅमच्या 'फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६' मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन  मुंबई। महाराष्ट्राचा ‘फार्म टू फॉरेन’ हा उपक्रम शेतकरी, उत्पादक, उद्योजक आणि जागतिक फॅशन उद्योगाला एकत्र जोडण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे महाराष्ट्र एक प्रमुख वस्त्रोद्योग आणि निर्यात केंद्र म्हणून नावारूपास येईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ‘द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (ASSOCHAM - असोचॅम) द्वारे मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ‘फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६’ मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेने “ॲडव्हान्सिंग इंडियाज ५एफ व्हिजन फॉर सस्टेनेबल अँड ट्रेसेबल टेक्स्टाईल व्हॅल्यू चेन्स” या संकल्पनेअंतर्गत आयोजित केलेल्या या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, उत्पादक, शाश्वतता तज्ज्ञ आणि महत्त्वाचे भागधारक एकत्र आले होते. केंद्र सरकारच्या '५एफ विजन'—फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेनला अनुसरून असलेल्या या उपक्रमात भारताची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करणे, ह...

किया इंडियाने नवीन अकॅडमीसह डीलर ट्रेनिंग नेटवर्कचा विस्तार केला

मुंबई। किया इंडिया या देशातील प्रमुख मास-प्रीमियम कार उत्पादक कंपनीने आज अहमदाबाद, गुजरात येथील सुपरनोव्हा किया येथे आपल्या नवीन डीलर ट्रेनिंग अकॅडमीचे उद्घाटन केले. दरमहा जवळपास २५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली ही अकॅडमी विक्री (सेल) आणि सेवा (सर्व्हिस) विभागांमधील कुशल व तज्ज्ञ डीलर टीम्स विकसित करण्याच्या किया इंडियाच्या दृष्टिकोनाला अधिक दृढ करते. ही अकॅडमी ग्रुप डीलरशिपमधील विक्री आणि सेवा टीम्ससाठी डीलर-नेतृत्वित लेव्हल-१ प्रशिक्षण उपक्रम राबवण्यास सक्षम करते. स्थानिक पातळीवर प्रशिक्षणाची पायाभूत सुविधा निर्माण करून किया इंडिया नवीन कर्मचारीवर्गाचे जलद समावेशन, विद्यमान टीम्सच्या कौशल्यामध्ये सतत वाढ आणि मध्यवर्ती प्रशिक्षणावरील अवलंबित्व कमी करणे सुनिश्चित करते. हा दृष्टिकोन डीलरशिप पातळीवर कर्मचाऱ्यांची स्थिरता सुधारण्यासोबत भूमिकांवर आधारित सखोल प्राविण्य निर्माण करण्यास मदत करतो. या उपक्रमामुळे ठिकाण कोणतेही असो, ग्राहकांना स्पष्ट संवाद, जलद सर्व्हिस टर्नअराउंड वेळ, समान सर्व्हिस मानक आणि अधिक सुलभ मालकीहक्काचा अनुभव मिळण्यास मदत होईल. सध्याच्या...

फुजीफिल्म इंडियाने मुंबईत भारतातील पहिले 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी' सुरू केले

भारतातील पहिल्या 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी'चे उद्घाटन जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त करण्यात आले, जो छायाचित्रणाच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. ही आकर्षक जागा फुजीफिल्मचा संपूर्ण इमेजिंग पोर्टफोलिओ, क्रिएटर अनुभव आणि समुदाय-आधारित शिक्षण एकाच छताखाली एकत्र आणते. मुंबई। फुजीफिल्म इंडियाने ' फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी 'च्या उद्घाटनाची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील पहिले आणि जागतिक स्तरावरील अकरावे केंद्र आहे, जे फोटोग्राफी आणि इमेजिंगचा एक परिपूर्ण अनुभव देते. हे उद्घाटन जागतिक फोटोग्राफी दिनाच्या (१९ ऑगस्ट) दिवशी होत असून, या वर्षी फोटोग्राफीच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे स्थित, हे दोन मजली, ५,७९५ चौरस फुटांचे केंद्र फुजीफिल्मच्या संपूर्ण इमेजिंग इकोसिस्टमला एकाच छताखाली एकत्र आणते. केवळ एक अनुभव केंद्र नसून, फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी ही एक सर्जनशील जागा आहे, जिथे इमेजिंग तंत्रज्ञान, कला आणि कथाकथन एकत्र येतात. हे नवीन फोटोग्राफर, चित्रपट निर्माते, कंटेंट क्रिएटर किंवा व्यावसायिक...