सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सॅन्डविझ्झाचे मालाडमध्ये नवे आउटलेट सुरु

मुंबई। चविष्ट सँडविचेस आणि वैविध्यपूर्ण मेनूसाठी नावाजला जाणारा, मुंबईतच सुरु झालेला, ग्राहकांना झटपट सेवा देणारा ब्रँड सॅन्डविझ्झाने आता मालाडमध्ये आणखी एक नवे आउटलेट सुरु केले आहे. मुंबईमध्येच सुरु झालेला हा ब्रँड मुंबईत सातत्याने विस्तार करत असून हे अजून एक महत्त्वाकांक्षी पाऊल त्यांनी उचलले आहे.

अगदी सुरुवातीपासूनच, सॅन्डविझ्झाने ग्राहकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनून स्वतःची अनोखी ओळख निर्माण केली. झटपट मिळणारे पदार्थ, हमखास आवडणाऱ्या चवी आणि दर्जा राखण्यातील सातत्य यामुळे हे ठिकाण लोकांच्या पसंतीस उतरले. मालाड आउटलेटमध्ये देखील याच धोरणाचा अवलंब केला जात आहे म्हणूनच निवासी वस्त्या, कार्यालये, महाविद्यालये आणि मोठ्या प्रमाणात होणारी लोकांची वर्दळ मालाडमध्ये त्यांनी आपले केंद्र सुरू केले आहे.

या विस्ताराबाबत चर्चा करताना सॅन्डविझ्झाचे संचालक पंकज शर्मा म्हणाले, "मुंबईला आम्ही नेहमीच सॅन्डविझ्झाच्या प्रवासाचा केंद्रबिंदू मानत आलो आहोत. मुंबईतील प्रत्येक आउटलेट आमच्यासाठी वैयक्तिकरित्या खास आहे, कारण ते आमच्या ग्राहकांच्या गरजा आणि त्यांच्या खाण्याच्या सवयी लक्षात घेऊन सुरू करण्यात आले आहे. मालाड हे एक असे ठिकाण आहे जिथे लोक सुविधा, परिचित चव आणि योग्य किंमत या गोष्टींना महत्त्व देतात — आणि हे सॅन्डविझ्झाच्या मूळ उद्दिष्टांशी तंतोतंत जुळणारे आहे."

मालाडच्या या नवीन आउटलेटमध्ये सॅन्डविझ्झाचे सर्व प्रकारचे शाकाहारी सँडविच, फ्राईज आणि शीतपेये मिळतील. नेहमीप्रमाणेच हे सर्व पदार्थ दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरात असतील. खाण्यासोबतच इथे मिल्कशेक, फ्रॅपे, चहा आणि कॉफीचा आनंदही घेता येईल. या दुकानाची रचना अशी केली आहे की ग्राहक सहजपणे येऊन झटपट नाश्ता करू शकतील. कामाच्या गडबडीत अगदी थोडा वेळ थांबून देखील चांगले चविष्ट  खाण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण असेल. हलका आहार मिळणारे आणि वारंवार भेटी देण्यासाठी उत्तम ठिकाण अशी याची ओळख निर्माण होईल.

मालाडमधील नवीन आउटलेटसह, सॅन्डविझ्झाने मुंबईभर विस्ताराची आगेकूच कायम ठेवली आहे. आपल्या परिसरातील ग्राहकांच्या आवडीनिवडींना प्राधान्य देण्याचे वैशिष्ट्य जपत, एका विचारपूर्वक आणि शाश्वत विस्तार धोरणाद्वारे ब्रँडची वाटचाल सुरू आहे. नुकतेच सॅन्डविझ्झाला झोमॅटोचा 'बेस्ट फास्ट फूड' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. मुंबईच्या 'क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट' क्षेत्रात हे एक अत्यंत महत्त्वाचे यश मानले जाते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...