सीधे मुख्य सामग्री पर जाएं

हाऊसिंग डॉटकॉमने १५ टियर २ शहरांमध्ये आपला विस्तार केला

मुंबई। हाऊसिंग डॉटकॉम या भारताच्या आघाडीच्या रियल इस्टेट अॅपने देशभरातील उच्च-क्षमता असलेल्या १५ टियर २ शहरांमध्ये धोरणात्मक विस्तार केल्याचे आज जाहीर केले. या धोरणाचे लक्ष्य झपाट्याने वाढत असलेल्या निवासी बाजारपेठांमध्ये हाऊसिंग डॉटकॉमची उपस्थिती सखोल करण्याचे आणि महानगरांच्या पलीकडे टियर २ शहरात राहणाऱ्या आणि घर खरेदी करू इच्छिणाऱ्या लक्षावधी लोकांपर्यंत एक सुव्यवस्थित, डिजिटल-फर्स्ट रियल इस्टेट शोध पोहोचवण्याचे आहे.

प्रस्तुत घोषणेविषयी टिप्पणी करताना आरईए इंडिया (हाऊसिंग डॉटकॉम) चे सीईओ प्रवीण शर्मा म्हणाले, “भारतातील निवासी विकासाचा पुढचा टप्पा मोठ्या महानगरांच्या पलीकडे लिहिला जाणार आहे. उभरत्या शहरांतील घर खरेदीदार ऑनलाइन मालमत्तांचा शोध घेताना सोय, विश्वसनीयता आणि पर्याय यांना प्राधान्य देत आहेत. १५ टियर २ शहरांत विस्तार करून हाऊसिंग डॉटकॉम रियल इस्टेटच्या शोधासाठी एक अधिक समावेशक डिजिटल ईकोसिस्टम उभी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. उपभोक्त्यांना दर्जेदार लिस्टिंगची पोहोच मिळवून देण्यात आणि त्यांना आत्मविश्वासाने माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे.”

या नवीन लॉन्च झालेल्या बाजारपेठांमध्ये आग्रा, संभाजीनगर, जबलपूर, जोधपूर, कानपूर, लुधियाना, मदुरई, मंगळूर, मथुरा, म्हैसूर, रांची, त्रिची, उदयपूर, वापी आणि विजायवाडा यांचा समावेश आहे. या विस्तारासह, हाऊसिंग डॉटकॉम आता आणखी जास्त शहरांमधील लोकांना स्थानिक मालमत्तांचा शोध, सत्यापित यादी आणि डेटा-आधारित इनसाइट्स तसेच पडवडण्याजोग्या आणि त्यांना हव्या त्या ठिकाणी घरांचे पर्याय शोधण्याची सहज पोहोच प्रदान करू शकेल.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

‘फार्म टू फॉरेन’ उपक्रम महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक पटलावर नेणार

असोचॅमच्या 'फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६' मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन  मुंबई। महाराष्ट्राचा ‘फार्म टू फॉरेन’ हा उपक्रम शेतकरी, उत्पादक, उद्योजक आणि जागतिक फॅशन उद्योगाला एकत्र जोडण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे महाराष्ट्र एक प्रमुख वस्त्रोद्योग आणि निर्यात केंद्र म्हणून नावारूपास येईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ‘द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (ASSOCHAM - असोचॅम) द्वारे मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ‘फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६’ मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेने “ॲडव्हान्सिंग इंडियाज ५एफ व्हिजन फॉर सस्टेनेबल अँड ट्रेसेबल टेक्स्टाईल व्हॅल्यू चेन्स” या संकल्पनेअंतर्गत आयोजित केलेल्या या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, उत्पादक, शाश्वतता तज्ज्ञ आणि महत्त्वाचे भागधारक एकत्र आले होते. केंद्र सरकारच्या '५एफ विजन'—फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेनला अनुसरून असलेल्या या उपक्रमात भारताची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करणे, ह...

किया इंडियाने नवीन अकॅडमीसह डीलर ट्रेनिंग नेटवर्कचा विस्तार केला

मुंबई। किया इंडिया या देशातील प्रमुख मास-प्रीमियम कार उत्पादक कंपनीने आज अहमदाबाद, गुजरात येथील सुपरनोव्हा किया येथे आपल्या नवीन डीलर ट्रेनिंग अकॅडमीचे उद्घाटन केले. दरमहा जवळपास २५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली ही अकॅडमी विक्री (सेल) आणि सेवा (सर्व्हिस) विभागांमधील कुशल व तज्ज्ञ डीलर टीम्स विकसित करण्याच्या किया इंडियाच्या दृष्टिकोनाला अधिक दृढ करते. ही अकॅडमी ग्रुप डीलरशिपमधील विक्री आणि सेवा टीम्ससाठी डीलर-नेतृत्वित लेव्हल-१ प्रशिक्षण उपक्रम राबवण्यास सक्षम करते. स्थानिक पातळीवर प्रशिक्षणाची पायाभूत सुविधा निर्माण करून किया इंडिया नवीन कर्मचारीवर्गाचे जलद समावेशन, विद्यमान टीम्सच्या कौशल्यामध्ये सतत वाढ आणि मध्यवर्ती प्रशिक्षणावरील अवलंबित्व कमी करणे सुनिश्चित करते. हा दृष्टिकोन डीलरशिप पातळीवर कर्मचाऱ्यांची स्थिरता सुधारण्यासोबत भूमिकांवर आधारित सखोल प्राविण्य निर्माण करण्यास मदत करतो. या उपक्रमामुळे ठिकाण कोणतेही असो, ग्राहकांना स्पष्ट संवाद, जलद सर्व्हिस टर्नअराउंड वेळ, समान सर्व्हिस मानक आणि अधिक सुलभ मालकीहक्काचा अनुभव मिळण्यास मदत होईल. सध्याच्या...

फुजीफिल्म इंडियाने मुंबईत भारतातील पहिले 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी' सुरू केले

भारतातील पहिल्या 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी'चे उद्घाटन जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त करण्यात आले, जो छायाचित्रणाच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. ही आकर्षक जागा फुजीफिल्मचा संपूर्ण इमेजिंग पोर्टफोलिओ, क्रिएटर अनुभव आणि समुदाय-आधारित शिक्षण एकाच छताखाली एकत्र आणते. मुंबई। फुजीफिल्म इंडियाने ' फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी 'च्या उद्घाटनाची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील पहिले आणि जागतिक स्तरावरील अकरावे केंद्र आहे, जे फोटोग्राफी आणि इमेजिंगचा एक परिपूर्ण अनुभव देते. हे उद्घाटन जागतिक फोटोग्राफी दिनाच्या (१९ ऑगस्ट) दिवशी होत असून, या वर्षी फोटोग्राफीच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे स्थित, हे दोन मजली, ५,७९५ चौरस फुटांचे केंद्र फुजीफिल्मच्या संपूर्ण इमेजिंग इकोसिस्टमला एकाच छताखाली एकत्र आणते. केवळ एक अनुभव केंद्र नसून, फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी ही एक सर्जनशील जागा आहे, जिथे इमेजिंग तंत्रज्ञान, कला आणि कथाकथन एकत्र येतात. हे नवीन फोटोग्राफर, चित्रपट निर्माते, कंटेंट क्रिएटर किंवा व्यावसायिक...