सीधे मुख्य सामग्री पर जाएं

डब्ल्यूएसडीएस २०२६मध्ये बहुपक्षीय सहकार्य, हवामान बदलविषयक कृती केंद्रस्थानी

मुंबई। वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट (डब्ल्यूएसडीएस) २०२६ या एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटतर्फे (टेरी) आयोजित करण्यात आलेल्या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शाश्वततेवरील जागतिक चर्चा आणखी पुढे गेली. निसर्गाच्या दृष्टीने उपकारक विकास, पर्यावरणपूरक औद्योगिक रूपांतरण, भविष्यकालीन तंत्रज्ञान आणि पुनरुज्जीवित बहुपक्षीय सहकार्य यांवर या चर्चेचा भर होता. डब्ल्यूएसडीएसचे हे २५वे पर्व आहे.

बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल एका उच्चस्तरीय सर्वसदस्यीस बैठकीत म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत सध्याच्या सरकारच्या नेतृत्वाखाली भारताच्या सागरी वाहतूक क्षेत्रात सखोल कायापालट झाला आहे, यात शाश्वतेवर आधारित क्षमता विस्तार आणि कार्यक्षमतेतील लाभाचा समावेश होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुधारणा, कामगिरी व रूपांतरण यांवर आधारित दृष्टीच्या मार्गदर्शनाखाली सागरी वाहतूक प्रशासनाने आज पर्यावरणपूरक वाढीला आर्थिक विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. भारत संस्थात्मक सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय सहयोग यांच्या पाठिंब्याने बंदरांमध्ये नवीनीकरणीय ऊर्जेच्या स्वीकृतीसाठी, कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी, पर्यावरणपूरक जहाजमार्ग तयार करण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणावर पर्यावरणपूरक हायड्रोजनचे उत्पादन करण्यासाठी बांधील आहे.”

मंत्रीस्तरीय सत्रात श्रीलंका, नेपाळ, मालदिव्ज, जर्मनी आणि स्वीडनच्या प्रतिनिधींनी हवामान बदल, हिमालयीन परिसंस्थेची नाजूक स्थिती आणि वाढती समुद्रपातळी यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रभावी बहुपक्षीय सहकार्याची गरज अधोरेखित केली.

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या (यूएनईपी) आशिया आणि पॅसिफिक विभागाच्या प्रादेशिक संचालक डेशेन त्सेरिंग म्हणाल्या, “आजचे खरे आव्हान महत्त्वाकांक्षा नसून, वित्तपुरवठा हे आहे. निसर्गासाठी जेवढी गुंतवणूक आपण करत आहोत, त्याहून खूप अधिक पैसा निसर्गाची हानी करणाऱ्या कृतींसाठी सातत्याने खर्च केला जात आहे. म्हणूनच आपल्याला वित्तीय प्रणालींमध्ये सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे, जेणेकरून, सार्वजनिक खर्च हवामान आणि निसर्ग यांसंदर्भातील उद्दिष्टांशी सुसंगत राहील, हानीकारक कारणांसाठी दिली जाणारी अनुदाने दुसरीकडे वळवली जातील आणि खासगी भांडवलही मोठ्या प्रमाणात एकत्र आणले जाईल.”

‘हिमालयन कोअॅलिशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ सत्रात पर्वतीय परिसंस्थांच्या संरक्षणासाठी विज्ञान, डेटा आणि समुदाय सहभागावर आधारित संतुलित धोरणांची गरज व्यक्त झाली. स्टार्टअप नवोन्मेष, हरित बांधकाम, ग्रीन स्टील आणि हवामान कृतीत महिलांची भूमिका यांवरही चर्चा झाली.

स्टार्टअप्समधील नवोन्मेष, नैसर्गिक आणि स्थितीस्थापक पर्यावरणाची बांधणी, सार्वजनिक खरेदीमार्फत पर्यावरणपूरक स्टीलला मागणी निर्माण करणे तसेच हवामानासंदर्भातील कृती, जैवविविधता संवर्धन आणि जमिनीचे पुनरुज्जीवन या आघाड्यांवरील स्त्रियांची महत्त्वपूर्ण भूमिका आदी विषयांवर दिवसभर चाललेल्या सत्रांमध्ये प्रकाश टाकण्यात आला. 

डब्ल्यूएसडीएस २०२६ मध्ये जागतिक नेत्यांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे: टप्प्याटप्प्याने काम करण्याचा काळ संपला आहे- या दशकात विज्ञान, ऐक्य आणि व्यापक उपायांच्या पायावर रूपांतरणात्मक कृती करणे अत्यावश्यक आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

प्रियंका अग्रवाल: मॉडेलिंगपासून चित्रपटांपर्यंतचा एक प्रेरणादायी आणि कठोर परिश्रमावर उभारलेला प्रवास

मुंबई। भारतीय चित्रपट, फॅशन आणि जाहिरात उद्योगातील आपल्या अष्टपैलू आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखली जाणारी प्रियंका अग्रवाल, या क्षेत्रात एक वेगाने उदयास येणारे नाव बनली आहे. मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून, प्रियंकाने आपले कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली आहे. प्रियंका अग्रवालने विल्स इंडिया फॅशन वीक आणि लॅक्मे इंडिया फॅशन वीक यांसारख्या मोठ्या फॅशन इव्हेंट्समध्ये रॅम्प वॉक करून आपली प्रतिभा अगदी सुरुवातीच्या काळातच दाखवून दिली. त्यानंतर तिने अनेक नामांकित फॅशन डिझायनर्ससोबत काम केले आणि मॉडेलिंग उद्योगात आपले एक भक्कम स्थान निर्माण केले. आपल्या चित्रपट कारकिर्दीत, प्रियंका 'रेडिओ' (२०१५), '१९७१: बियॉन्ड बॉर्डर्स' (२०१७) आणि 'युद्धभूमी १९७१ भारत सीमा' (२०१८) यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने '1971: बियॉन्ड बॉर्डर्स' या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता अरुणोदय सिंगच्या विरुद्ध मुख्य भूमिका साकारली, जिथे तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. प्रियांका अग्रवालने द...

मोहम्मद जावेदने ४० हून अधिक म्युझिक व्हिडिओंची निर्मिती केली आहे

प्रतापगढ़/कुंडा। उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा भागातील एका तरुणाने बॉलिवूडच्या जगात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. मूळचा मौली, कुंडा (प्रतापगढ़) येथील मोहम्मद जावेदने आपल्या आवड आणि मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत सातत्यपूर्ण यश मिळवले आहे. मोहम्मद जावेदच्या चित्रपट प्रवासाची सुरुवात प्रयागराज (इलाहाबाद) येथे झाली, जिथे त्याने आपल्या कारकिर्दीचा पाया घातला. लहानपणापासूनच त्याला बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा होती, जे स्वप्न त्याने सत्यात उतरवले आहे. आजपर्यंत जावेदने ४० हून अधिक म्युझिक व्हिडिओंची निर्मिती केली आहे. त्याने टी-सिरीज, झी म्युझिक, व्हाईट हिल, व्हीनस आणि बी4यू यांसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत काम केले आहे. त्याने एका वेब सिरीजचीही यशस्वी निर्मिती केली आहे. निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्याने इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे आणि तो सतत नवीन प्रकल्पांवर काम करत आहे. त्याची मेहनत आणि समर्पणाने त्याला हळूहळू यशाच्या उच्च शिखरावर पोहोचवले आहे. मोहम्मद जावेद म्हणतात की ही तर फक्त सुरुवात आहे आणि ते नजीकच्या भविष्यात मोठ्या पडद्यावर दणक्यात पद...

'बोलो राधे राधे' मध्ये प्रसिद्ध गायकांचा सहभाग, चित्रपटाची आध्यात्मिक खोली अधिक दृढ करत आहे

लखनऊ/मथुरा। आगामी धार्मिक हिंदी चित्रपट "बोलो राधे राधे" प्रचंड चर्चेत असून, त्यामुळे त्याच्या भक्तीपूर्ण भावना अधिकच दृढ होत आहेत. आता या चित्रपटाशी एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक संबंध जोडला गेला आहे, कारण पूजनीय संत आणि भक्तीगायक श्री गुरु स्वामी रसराज कृष्णदास यांनी आपल्या सुमधुर आवाजाने चित्रपटाच्या संगीताला समृद्ध केले आहे. भक्ती परंपरेत खोलवर रुजलेल्या स्वामी रसराज कृष्णदास यांचे हे योगदान केवळ एक संगीत सहयोग म्हणून नव्हे, तर एक आध्यात्मिक समर्पण म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाच्या मूळ संदेशाला—भक्ती, सेवा आणि शाश्वत मूल्ये—अधिक सत्यता प्राप्त होते. चित्रपटाचे संगीत मन्न मिश्रा यांनी दिले आहे, जे पारंपरिक भक्ती संगीताची खोली आणि चित्रपटीय अभिव्यक्ती यांचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न करतात. गीते लेखक-दिग्दर्शक रवी भाटिया यांनी लिहिली आहेत. या दुहेरी जबाबदारीमुळे संगीत चित्रपटाच्या कथेला आणि भावनिक प्रवाहाला खोलवर जोडले जाते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या सहयोगाला एक आशीर्वाद संबोधून कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांचा विश्वास आहे ...