सीधे मुख्य सामग्री पर जाएं

जसलोक हॉस्पिटलची मोठी कामगिरी; स्वदेशी मेनिस्कस ट्रान्सप्लांट यशस्वी

भारतात प्रथमच एकाच संस्थेत मेनिस्कस अॅलोग्राफ्ट ट्रान्सप्लांट यशस्वी 

मुंबई। भारतातील नी प्रिझर्व्हेशन शस्त्रक्रियेतील महत्त्वपूर्ण प्रगतीसह जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने एकाच संस्थेमध्ये दान केलेल्या, प्रक्रिया केलेल्या आणि प्रत्यारोपित केलेल्या ग्राफ्टचा वापर करून मेनिस्कस अॅलोग्राफ्ट ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. डॉ. प्रसाद भागुंडे, कन्सल्टन्ट ऑर्थोपेडिक्स व स्पोर्ट्स मेडिसीन एक्स्पर्ट यांच्या नेतृत्वाखालील सर्जिकल टीमने ही शस्त्रक्रिया केली. सर्जरीसाठीच्या ॲनेस्थेसीयासाठी डॉ. रजनी एम आर, कन्सल्टन्ट ॲनेस्थेसीयोलाॅजी, जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांचे मोलाचे सहाय्य लाभले. ही शस्त्रक्रिया भारतातील गुडघा जतन शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाचे पाऊल ठरले आहे, ज्‍यामधून सिद्ध झाले आहे की, देशातील संस्था आता उती दान, जतन आणि प्रत्यारोपण या संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन करू शकतात.

जसलोक हॉस्पिटलमधील ही शस्त्रक्रिया २१ वर्षीय इंजिनीअरिंग शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्यावर करण्यात आली. खेळादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्‍याला आपली मेनिस्कस (गुडघ्यातील कुर्चा) गमावावी लागली होती. यापूर्वी अनेक शस्त्रक्रिया केल्‍यानंतर देखील त्याला असह्य वेदना होत होत्या, ज्याचा परिणाम त्याच्या चालण्यावर आणि सांध्यांच्या दीर्घकालीन आरोग्यावर होत होता. हा रुग्ण आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी अर्धवेळ खेळाडू म्हणूनही काम करत होता. उपचारासाठी जसलोक हॉस्पिटलमध्‍ये येण्यापूर्वी त्याला साधे चालणे देखील कठीण झाले होते.

गुडघ्याच्या सांध्यामध्ये मेनिस्कस (कुर्चा) हा अत्यंत महत्त्वाचा शॉक अॅब्झॉर्बर म्हणून काम करतो. दुखापतीमुळे किंवा वारंवार होणाऱ्या शस्त्रक्रियांमुळे हा कुर्चा पूर्णपणे काढून टाकला जातो, तेव्हा रुग्णांना सतत वेदना, सूज आणि कमी वयात संधिवात होण्याचा धोका निर्माण होतो. तरुण आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या व्यक्तींवर याचा गंभीर परिणाम होतो, जेथे या रचनेच्या अभावामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात. मेनिस्कस पूर्णपणे नष्ट झाला की पुन्हा नैसर्गिकरित्या तयार होत नाही, आणि सध्या असे कोणतेही कृत्रिम इम्प्लांट उपलब्ध नाही जे त्याचे नैसर्गिक कार्य पूर्णपणे पूर्ववत करू शकेल. अद्याप गंभीर संधिवात झालेला नाही अशा निवडक रुग्णांसाठी दान केलेल्या उती वापरून केलेले प्रत्यारोपण एकमेव उपचार आहे, जो सांध्याचे कार्य नैसर्गिक पातळीवर आणू शकतो.

या केसमध्‍ये मेनिस्कस ग्राफ्ट जसलोक हॉस्पिटलमध्‍ये दान करण्यात आला होता आणि नंतर त्याच संस्थेतील रुग्णाच्या प्रत्यारोपणासाठी वापरला गेला. स्थानिक पातळीवर दान आणि प्रत्यारोपणाचे चक्र पूर्ण होणे ही दुर्मिळ घटना आहे. या केसमधून निदर्शनास येते की, देशांतर्गत होणारे उती दान गुंतागुंतीची सांधे जतन प्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना प्रत्‍यक्ष आधार देऊ शकते.

या डोनर ग्राफ्टचा वापर करून जसलोक हॉस्पिटलमधील शस्त्रक्रिया तज्ञांनी किमान इन्व्हेसिव्ह आर्थ्रोस्कोपिक पद्धतीने हे प्रत्यारोपण केले. गुडघ्याची नैसर्गिक कूशनिंग आणि स्थिरता परत मिळवण्यासाठी अचूक आकाराचा मेनिस्कस प्रत्यारोपित करण्यात आला. सांध्याचे कार्य सुधारणे आणि रुग्णाला पुन्हा पूर्वीसारखी हालचाल करता येणे, हा या शस्त्रक्रियेचा मुख्य उद्देश होता.

या शस्त्रक्रियेबद्दल मत व्‍यक्त करत जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. प्रसाद भागुंडे, कन्सल्टन्ट ऑर्थोपेडिक्स व स्पोर्ट्स मेडिसीन एक्स्पर्ट म्हणाले, ''मेनिस्कस प्रत्यारोपणामध्ये प्रत्यारोपित केलेला'ग्राफ्ट रुग्णाच्या मूळ उतीप्रमाणे कार्य करेल, याची खात्री घेण्‍याचे आव्‍हान असते. ग्राफ्टचा आकार किंवा त्याच्या स्थानामध्ये थोडासाही फरक असल्यास हालचाल करताना गुडघ्यावर पडणाऱ्या वजनाच्या वितरणावर परिणाम होऊ शकतो. या केसमध्‍ये आम्ही ग्राफ्टची जुळवाजुळव आणि शस्त्रक्रियेदरम्यान त्याचे स्थान निश्चित करण्यासाठी बराच वेळ नियोजन केले, ज्‍यामुळे सांध्याला नैसर्गिक लवचिकता आणि स्थिरता पुन्हा मिळाली. तरुण आणि सक्रिय रुग्णासाठी ही अत्यंत आवश्यक बाब आहे.''

ऐतिहासिकदृष्ट्या, अशा शस्त्रक्रियांमध्ये वापरले जाणारे मेनिस्कस अॅलोग्राफ्ट्स मोठ्या प्रमाणावर अमेरिकेतून आयात केले जात होते. आशियामधील व्‍यक्तींच्‍या गुडघ्याची रचना सामान्यतः: लहान असल्याने अमेरिकन ग्राफ्ट्सच्या आकाराशी सुसंगततेच्या समस्या वारंवार निर्माण होत होत्‍या. तसेच, आयातीचा खर्च हा मोठा अडथळा होता; आयात केलेल्या ग्राफ्ट्सची किंमत सुमारे १४ लाख रूपये होती, ज्यामुळे अनेक रुग्णांना हा उपचार घेणे शक्य होत नव्‍हता. पण, आता स्थानिक पातळीवर प्रक्रिया केलेले ग्राफ्ट्स उपलब्ध झाल्यामुळे यामध्‍ये बदल झाला आहे. हे ग्राफ्ट्स आता साधारण १.५ लाख रूपयांमध्‍ये उपलब्ध आहेत, ज्यामुळे आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. हे उपचार आता अधिक सुलभ झाले आहेत, तसेच भारतातील रुग्णांच्या शरीररचनेसाठी हे ग्राफ्ट्स अधिक योग्य ठरत आहेत.

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. मिलिंद खडके, डायरेक्‍टर – मेडिकल सर्व्हिसेस म्हणाले, ''अनेक वर्षांपासून भारतात विशेष बायोलॉजिकल ग्राफ्ट्सवर अवलंबून असणाऱ्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर करणे आव्‍हानात्‍मक होते, जेथे उती दान आणि जतन करण्याची परिसंस्था विकसित होत होती. यासारख्या केसेसमधून निदर्शनास येते की, आता या उपचारासंदर्भात तफावत कमी होत आहे. संस्था स्थानिक पातळीवर संपूर्ण प्रक्रिया राबवण्यास सक्षम होतात, तेव्हा डॉक्टर रुग्णांना देऊ शकणाऱ्या उपचाराचे स्वरूप बदलते. याचे खरे महत्त्व इतर देशांतील उपायांवर अवलंबून राहण्याऐवजी देशांतर्गत ही क्षमता निर्माण करण्यामधून दिसून येते.''

या केसमधून भारतातील प्रगत ऑर्थोपेडिक केअरच्या विस्तारात उती दानाची भूमिका निदर्शनास येते. डोनरची संमती आणि उती मिळवण्यापासून ते ग्राफ्टवर प्रक्रिया करणे, निर्जंतुकीकरण, साठवणूक आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रत्यारोपण करण्यापर्यंतची संपूर्ण साखळी प्रस्थापित वैद्यकीय प्रोटोकॉलअंतर्गत देशात व्यवस्थापित करण्यात आली. यातून सिद्ध होते की, समन्वित देशांतर्गत यंत्रणा भारतातील गुंतागुंतीची नी प्रिझर्व्हेशन शस्त्रक्रिया यशस्‍वीपणे होण्‍यास साह्य करू शकते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

दमदार बॅटरी आणि दणकटपणासह 'आयटेल ए३००सी' स्मार्टफोन लॉन्च

मुंबई। भारतातील प्रमुख तंत्रज्ञान ब्रँड्सपैकी एक असलेल्या आयटेलने आपल्या ' आयटेल ए३००सी' (itel A300C) या परवडणाऱ्या ४जी स्मार्टफोनच्या लाँचची घोषणा केली. 'बिल्ट फॉर रिअल लाइफ' या स्पष्ट आश्वासनासह डिझाइन केलेल्या या स्मार्टफोनची किंमत १०,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. १८ व्हॉट फास्ट चार्जिंगसह ६००० एमएएचची भव्य बॅटरी, १२ जीबी* पर्यंत इफेक्टिव्ह रॅम, अँड्रॉइड १६ गो, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.५६ इंच एचडी+ डिस्प्ले, एमआयएल-एसटीडी-८१०एच मिलिटरी-ग्रेड ड्युरेबिलिटी, पहिल्या १०० दिवसांसाठी मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट आणि अल्ट्रालिंक फ्री कॉल यांसारख्या वैशिष्ट्यांचा यात समावेश आहे. दररोजच्या उत्कृष्ट अनुभवासाठी ए३००सीमध्ये ८ एमपी मुख्य कॅमेरा आणि ५ एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून, उत्तम ऑडिओ अनुभवासाठी डीटीएस-एनहान्स साऊंड इफेक्ट्स देण्यात आले आहेत. हे सर्व फीचर्स एका स्लिम आणि हलक्या डिझाइनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आयटेल ए३००सीच्या केंद्रस्थानी ६००० एमएएचची भक्कम बॅटरी आहे, जी दैनंदिन दिनचर्या सहजतेने हाताळण्यासाठी डिझाइन केली आहे. १८ व्हॉट फास्ट चार्जिंग...

बाईकवो आपल्या ताफ्यात १०,००० वाहनांची भर घालणार

मुंबई। बाईकवो ग्रीन टेक लिमिटेड (NSE: BIKEWO) ने २०२६-२७ या आर्थिक वर्षात आपल्या ऑपरेटिंग ताफ्यात जवळपास १०,००० वाहनांपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनी यासाठी ₹७६ कोटींहून अधिक किमतीच्या वॉरंट्सच्या प्रिफरेन्शियल इश्यूद्वारे निधी उभारणार आहे. हा विस्तार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री आणि वितरणाच्या पलीकडे जाऊन ईव्ही मालमत्ता मालकी आणि लीजिंग, फ्लीट तैनाती, विशेष मोबिलिटी ॲप्लिकेशन्स, ऑपरेटिंग पार्टनरशिप्स, लाइफसायकल सपोर्ट आणि तंत्रज्ञान-आधारित लॉजिस्टिक्स या क्षेत्रांमधील कंपनीच्या मोठ्या स्थित्यंतराचे प्रतिनिधित्व करतो. बाईकवोने या पुढील टप्प्याला "बाईकवो असेन्ड" असे नाव दिले आहे. या परिवर्तनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बायो एनर्जी डिव्हिजनसोबत विशेष इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भाड्याने घेण्यासाठी आणि तैनात करण्यासाठी झालेला एक मोठा करार. जीएसटीसह या करारांचे एकूण अंदाजे मूल्य सुमारे ₹६६.४६ कोटी असून, त्यांची वैधता जुलै २०२३ पर्यंत आहे. हे ट्रॅक्टर विशेष लोडर, कॅचर आणि ग्रॅबर उपकरणांनी सुसज्ज आहेत आणि कंपनी चालक व वाहन संचालन सेवा द...

सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर पुनर्विकासातून ठाणेकरांना सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य

ठाणे: ठाणे पश्चिमेतील सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर येथील क्लस्टर पुनर्विकासाचा मुख्य उद्देश अनेक पिढ्यांपासून या परिसराला आपले घर मानणाऱ्या कुटुंबांचे राहणीमान उंचावणे हा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रहिवाशांना सुरक्षित, नियोजनबद्ध आणि उच्च दर्जाची घरे उपलब्ध करून देण्याबरोबरच आधुनिक सुविधा, सुधारित पायाभूत सुविधा आणि प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या आणि घरांची गरज लक्षात घेता, पुढील १५ वर्षांत एमएमआरमध्ये ३० लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवले असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सिद्धेश्वर तलाव क्लस्टर प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी विकासकांना हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करून नागरिकांच्या हातात घरांच्या चाव्या देण्याचे निर्देश दिले. सिद्धेश्वर तलाव परिसरात सुमारे ६ हजार नागरिक राहत असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्विकासाला आता गती मिळाली आहे. सुगी ग्रुप या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. क्लस्टर पुनर्विकासाचा प्रमुख उद्देश नागरिकांचे राहणीमान उंचा...