सीधे मुख्य सामग्री पर जाएं

‘क्लायमेट डिकेड’च्या आराखडयासह डब्ल्यूएसडीएस २०२६ची सांगता

मुंबई। द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट अर्थात टेरीने आयोजित केलेल्या वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिटी (डब्ल्यूएसडीएस) २०२६ची सांगता विचार आणि नवीन वचनासह झाली. ‘रिफ्लेक्शन्स, रिसर्जन्स अँड रिजॉल्व फॉर अवर कॉमन फ्युचर (आपल्या सर्वांच्या भविष्यकाळासाठी विचार, पुनरुत्थान आणि निर्धार)’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या निरोपाच्या सत्रात अनेक सरकारांचे प्रतिनिधी, बहुपक्षीय संस्था, व्यवसाय व नागरी समाजाचे प्रतिनिधी एकत्र आले होते.

केवळ जगभरातील मते एकत्र आणणारा नव्हे, तर हवामानासाठी ठोस कृतीला संप्रेरणा देणारा मंच ही डब्ल्यूएसडीएस २०२६ची ओळख, प्रख्यात दरबार हॉलमध्ये झालेल्या अखेरच्या सत्रामुळे आणखी दृढ झाली.

निरोपाच्या सत्रात अनेक विख्यात वक्त्यांची भाषणे झाली. हवामानविषयक कृतीच्या पुढील टप्प्यात जबाबदारी, अंमलबजावणी आणि अनेक पिढ्यांतील नेतृत्व असलेच पाहिजे हा मुद्दा या भाषणांतून अधोरेखित झाला.

भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे (एमओईएफसीसी) पर्यावरण, वन आणि हवामान बदल सचिव तन्मय कुमार म्हणाले, "हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा मुद्दा नसून विकास, प्रशासन, सुरक्षितता आणि मानवी आरोग्यासमोरील मोठे आव्हान आहे. भारताचा दृष्टीकोन विज्ञानाधारित आणि न्यायाभिमुख असून, पर्यावरणपूरक ऊर्जेला उपजीविका आणि स्थितीस्थापक विकासाशी जोडले आहे. विकसित देशांनी मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन करून औद्योगिकीकरण केले, मात्र भारत विकास, दारिद्र्यनिर्मूलन आणि कार्बनमुक्ती हे एकाच वेळी साध्य करत आहे. दरडोई केवळ २ टन उत्सर्जनासह भारताने २०३०चे अजीवाष्म ऊर्जेचे ५०% उद्दिष्ट जून २०२५ मध्येच पूर्ण करून ते ५१% पेक्षा अधिक केले आहे. मानवतावाद, विज्ञान आणि न्याय यांच्या आधारावर भविष्य सुरक्षित करण्याचा भारताचा निर्धार आहे."

संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रमाच्या सदिच्छादूत दिया मिर्झा म्हणाल्या, “हवामानातील बदलाचा परिणाम सर्व लिंगांवर सारखाच होत नाही. स्त्रिया आणि मुली जगातील बहुतांश अन्नाची पेरणी करत असल्या आणि कुटुंबं व समुदायांची जोपासना करत असल्या तरी हवामान बदलाच्या परिणामांची तीव्रता त्यांना अधिक जाणवते. तरीही हवामान आणि ऊर्जा यांसंदर्भातील निर्णय प्रक्रियेत त्यांना तेवढे प्रतिनिधीत्वही मिळत नाही. शाश्वतता हा आज ऐच्छिक विषय राहिलेला नाही, तर जगण्याचा, प्रतिष्ठेचा आणि शांतीचा पाया झाला आहे. निसर्गाशी संवाद साधणे ही आता चैनीची बाब राहिलेली नाही, तर प्रत्येक व्यक्तीची ती गरज झाली आहे.”

संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रमाच्या उपनिवासी प्रतिनिधी श्रीमती इसाबेल तुशान यांनी भारतातील ६५% तरुण लोकसंख्या शाश्वततेच्या अंमलबजावणीसाठी निर्णायक असल्याचे सांगत, यूएनडीपीने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि टेरीसोबत ‘मिशन लाइफ युथ अँबॅसडर’ कार्यक्रम सुरू केल्याचे नमूद केले.

रिन्यूच्या चेअरमन वैशाली निगम सिन्हा यांनी विकास आणि हवामान ही आता समान उद्दिष्टे असून, पर्यावरणपूरक ऊर्जा आर्थिकदृष्ट्या अपरिहार्य झाल्याचे सांगितले. ‘ग्लोबल साउथ’ उपाय सुचवत असून परिषद ही केवळ चर्चा नसून कृतीचा आदेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पीओपी (प्रोटेक्ट अवर प्लॅनेट) चळवळीचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. अॅश पचौरी यांनी डब्ल्यूएसडीएसच्या २५ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत, भूतकाळ साजरा करताना पुढील सामाईक जबाबदारी स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली.

कूल द ग्लोबच्या संस्थापक प्राची शेवगावकर यांनी वैयक्तिक छोट्या कृतीतून सुरू झालेली चळवळ आज १५० देशांपर्यंत पोहोचल्याचे सांगत, शाश्वतता दैनंदिन जीवनाचा भाग करण्याचे आवाहन केले.

टेरीचे चेअरमन नितीन देसाई यांनी सरकार, उद्योग, संशोधक आणि समुदाय यांच्या सहकार्याशिवाय शाश्वत विकास शक्य नसल्याचे सांगितले, तर महासंचालक डॉ. विभा धवन यांनी सहयोग आणि विद्यमान संशोधनाचा प्रभावी वापर हीच पुढील वाट असल्याचे नमूद केले.

क्युरेटर डॉ. शैली केडिया यांनी यंदाच्या परिषदेत विक्रमी २,३८२ सहभाग, १० पूर्णसदस्य व १४ विषयाधारित सत्रे आणि ‘हिम-कनेक्ट’सारख्या उपायाधारित चर्चांचा उल्लेख केला. समारोपात ‘वसुंधरा’ मासिकाचे अनावरण, ‘अॅक्टफॉरअर्थ मॅनिफेस्टो’ प्रकाशन आणि नितीन देसाई लिखित द पॉलिटिक्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट पुस्तकाचे प्रकाशन झाले.

डब्ल्यूएसडीएस २०२६ ने स्पष्ट संदेश दिला—हवामान दशकात वित्त व न्याय, नवोन्मेष व समावेशकता, तसेच महत्त्वाकांक्षा व जबाबदारी यांचे अभिसरण अत्यावश्यक आहे; आणि जागतिक स्तरावर रूपांतरणात्मक हवामान कृतीसाठी दृढ सहयोग हाच पुढील मार्ग आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मिन्त्राचा बिग फॅशन फेस्टिव्हल

८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, १००+ नवीन लॉन्च आणि २१,००० उदयोन्मुख लेबल्सचा सहभाग मुंबई: सणासुदीच्या खरेदी हंगामाची सुरुवात करत मिन्त्राने आपल्या प्रमुख बिग फॅशन फेस्टिव्हलची (बीएफएफ) घोषणा केली आहे. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांसाठी ८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, हजारो ब्रँड्स आणि १०० हून अधिक नवीन ब्रँड्स व कलेक्शन्स उपलब्ध असतील. यासोबतच २१,००० उदयोन्मुख ब्रँड्स आणि लेबल्स सहभागी होत असून, त्यापैकी १३,००० ब्रँड्स प्रथमच बीएफएफमध्ये सहभागी होत आहेत. मिन्त्राच्या प्रमुख शेरॉन पैस म्हणाल्या, “बिग फॅशन फेस्टिव्हल हा भारताच्या उत्सवी कॅलेंडरमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा बनला आहे. प्रादेशिक विक्रेते आणि लघुउद्योगांना सक्षम करण्यापासून ते जागतिक आणि भारतीय फॅशन व लाइफस्टाइल ब्रँड्समधील सर्वोत्तम उत्पादने लाखो घरांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत, तो संपूर्ण इकोसिस्टमला जोडतो. एआय आणि विस्तारित डिलिव्हरी नेटवर्कच्या मदतीने आम्ही ८० दशलक्षांहून अधिक ग्राहकांसाठी फॅशन अधिक सुलभ, वैयक्तिकृत आणि अखंड बनवत आहोत.” यंदाच्या बीएफएफमध्ये पुरुष व महिलांचे एथनिक वेअर, पुरुषांचे कॅज्युअल वेअर, महिला...

झेन डायमंड रेडियंट रिफ्लेक्शन्स

सादर केले करवा चौथ स्पेशल झेन डायमंड कलेक्शन मुंबई: प्रेम, समर्पण आणि आयुष्यभराची सोबत यांचा सण करवा चौथ, यंदा नैसर्गिक हिऱ्यांसह अधिक चमकदार बनवा. संध्याकाळी चंद्राचे दर्शन आणि उपवास सोडण्याच्या पवित्र क्षणी हिऱ्यांचे सदाबहार तेज तुमचा आनंद अधिक संस्मरणीय बनवेल. झेन डायमंड इंडिया या खास क्षणासाठी निवडलेले शानदार डायमंड ज्वेलरी कलेक्शन घेऊन आले आहे. तुमच्या जीवनसाथीसाठी प्रेमाची सुंदर भेट द्यायची असो किंवा तुम्हाला तुमचा करवा चौथ लुक सर्वात वेगळा आणि खास बनवायचा असेल - ही अद्वितीय डिझाइन्स तुमचा आनंद द्विगुणित करतील. प्रेमाचे अतूट बंधन आणि आयुष्यभराच्या वचनांचे प्रतीक, हा क्लासिक बँड अस्सल सॉलिटेयर हिऱ्यांच्या अद्वितीय चमकेने सजला आहे. करवा चौथला अंगठीचे खूप खास आणि भावनिक महत्त्व असते. हा सुंदर बँड तुमच्या लग्नातील अंगठीला एक आधुनिक आणि शानदार अपग्रेड देण्यासाठी परफेक्ट आहे. हा तुम्हाला त्या वचनांची आठवण करून देत राहील, जी या पवित्र रात्रीच्या चंद्राप्रमाणे कायम चमकत राहतील. रोज गोल्ड, यलो गोल्ड आणि व्हाईट गोल्डमध्ये उपलब्ध असलेली ही शानदार स्प्लिट-बँड सॉलिटेयर रिंग अतिशय...

ब्लॅक ओपल कन्सल्टंट्सचे बीएसई एसएमईवर यशस्वी पदार्पण

मुंबई। ब्लॅक ओपल कन्सल्टंट्स लिमिटेडच्या शेअर्सनी बीएसई एसएमई मंचावर यशस्वी पदार्पण केल्यानंतर मोठी तेजी नोंदवली. कंपनीचे शेअर्स २१० रुपयांच्या पातळीवर पोहोचून अप्पर सर्किटवर बंद झाले. २१० रुपयांच्या या भावावर कंपनीचा शेअर आपल्या १९७ रुपयांच्या या मूळ आयपीओ इश्यू किमतीपेक्षा ६.६०% वर व्यवहार करत होता. कंपनीच्या शेअर्सची सुरुवात २०० रुपयांच्या भावावर झाली, जी इश्यू किमतीपेक्षा १.५२% अधिक होती. त्यानंतर संपूर्ण सत्रादरम्यान शेअर्समध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळाली. कंपनीचा एकूण ५५.०८ रुपये कोटींचा आयपीओ होता. यामध्ये ४४.०९ कोटी रुपये मूल्याच्या २२.३८ लाख शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा आणि १०.९९ कोटी रुपये मूल्याच्या ५.५८ लाख शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश होता. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान खुला असलेल्या या आयपीओसाठी प्रति शेअर १८५ रुपये ते १९७ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. बोली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम इश्यू किंमत प्रति शेअर १९७ रुपये निश्चित करण्यात आली, ज्यामध्ये एका लॉटमध्ये ६० किंवा अधिक शेअर्स (६०० शेअर्सचा लॉट आकार) समाविष्ट होते. या...