सीधे मुख्य सामग्री पर जाएं

अल्केम लॅबोरेटरीजकडून परवडणाऱ्या किमतीत ‘सेमाग्लुटाइड’ इंजेक्शन लाँच

मधुमेह व वजन नियंत्रणासाठी नवी दिशा 

मुंबई। अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडने भारतात ‘सेमासाइज', ‘ओबेसेमा' आणि ‘हेपाग्लाइड' या ब्रँड नावांनी सेमाग्लुटाइड इंजेक्शनच्‍या लाँचची घोषणा केली आहे. सेमाग्लुटाइड हे आठवड्यातून एकदा त्वचेखाली टोचले जाणारे इंजेक्शन आहे.

कंपनीने आपले सेमाग्लुटाइड प्री-फिल्ड डिस्पोजेबल इंजेक्शन पेन एका महिन्याच्या डोससाठी १८०० रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिले आहे, ज्याचा साप्‍ताहिक खर्च ४५० रुपये इतका होतो. अल्‍केमचा या परवडणाऱ्या किमतीद्वारे भारतात या उपचारांची सुरुवात करण्यातील अडथळे दूर करण्‍याचा आणि उपचारांची उपलब्धता वाढवण्‍याचा मनसुबा आहे.

अल्केमने भारतात घेतलेल्या फेज ३ क्लिनिकल चाचण्यांच्या पुनरावलोकनानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)कडून टाइप २ डायबेटिस मेलिटस आणि आहार व व्यायामाला पूरक म्हणून दीर्घकालीन वजन व्यवस्थापनासाठी सेमाग्लुटाइडच्या उत्पादन आणि विक्रीसाठी मंजूरी मिळवली आहे. सेमाग्लुटाइड हे प्रिस्क्रिप्शनेच मिळणारे औषध आहे आणि फक्त योग्य वैद्यकीय देखरेखीखाली घेतले पाहिजे.

डिस्पोजेबल पेनव्यतिरिक्त अल्केम उच्‍च देखभालीच्या डोससाठी पुन्हा वापरता येणारे इंजेक्शन पेन देखील उपलब्ध करून देत आहे. हे पुन्हा वापरता येणारे इंजेक्‍शन पेन रुग्णांना प्रत्येक वेळी नवीन डिस्पोजेबल इंजेक्‍शन पेन खरेदी करण्याऐवजी फक्त औषधाचे कार्ट्रिज बदलण्याची सुविधा देते. यामुळे उपचारांचा खर्च कमी होतो आणि रुग्णांना उपचारांचे सातत्य राखण्यास मदत होते.

या लाँचबाबत मत व्‍यक्त करत अल्केमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास गुप्‍ता म्हणाले, “आमचा विश्वास आहे की, उपचाराचा खर्च सर्वसामान्‍यांना परवडणारा असेल तरच उपचारांमधील प्रगतीचा खरा परिणाम दिसून येतो. आम्ही स्वतः विकसित केलेले सेमाग्लुटाइड बाजारात आणल्यामुळे आता उच्च दर्जाचे आणि परवडणारे उपचार उपलब्ध होत आहेत. यामुळे आरोग्यसेवा पुरवठादारांना हे उपचार अधिक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल. आमचे प्रबळ वितरण नेटवर्क आणि रुग्णांसाठी सोयीस्कर असलेल्या डिवाईसेसच्‍या माध्‍यमातून आमचा हे उत्पादन अधिकाधिक व्‍यक्तींपर्यंत पोहोचवण्‍याचा आणि सर्वांगीण आरोग्य सुधारण्यात योगदान देण्‍याचा मनसुबा आहे.''



टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमडीआर रचनेमुळे 'यूपीआय'ची शाश्वतता, नवोन्मेष आणि सुरक्षेला बळ मिळेल: असोचॅम

मुंबई। असोचॅमचे  अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी मोठ्या मूल्याच्या व्यापारी व्यवहारांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन यूपीआय फ्रेमवर्कचे स्वागत केले आहे. हे नवीन धोरण यूपीआयची शाश्वतता मजबूत करेल, नवोन्मेषाला पाठबळ देईल, फसवणूक रोखेल आणि त्याची स्वीकारार्हता वाढवेल. ही रचना पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वीकृती नेटवर्कला सक्षम करेल, ज्यामुळे यूपीआयचा विस्तार होऊन देशभरातील ग्राहक आणि व्यावसायिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल. असोचॅमने सरकारच्या संतुलित दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे, ज्याअंतर्गत सर्व व्यक्ती-ते-व्यक्ती यूपीआय व्यवहार, रक्कमेची मर्यादा न ठेवता, पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहेत. तसेच २,००० रुपयांपर्यंतची व्यापारी देयके देखील एमडीआर मुक्त राहतील. ही नवी रचना पात्र लहान व्यापाऱ्यांना, विशेषतः व्यक्ती-ते-व्यक्ती श्रेणीअंतर्गत यूपीआय क्यूआर कोडद्वारे दरमहा १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारणाऱ्या फेरीवाल्यांना आणि स्थानिक दुकानदारांना शून्य-एमडीआरचा लाभ देत राहील. यामुळे सूक्ष्म आणि लहान व्यावसायिकांना अतिरिक्त देयक खर्चापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. भारता...

लखोटिया रियॅलिटीने पनवेलमध्ये ५ आठवड्यांत रु.२५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली

लखोटिया रियॅलिटीने पनवेलमध्ये ५ आठवड्यांत रु.२५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली; देशातील परवडणाऱ्या घरांच्या बाजारात मंदीला छेद परवडणाऱ्या घरांच्या बाजारात राष्ट्रीय घसरणीच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय विक्री मुंबई।  लखोटिया रियॅलिटीने सांगितले की, केवळ ५ आठवड्यांत त्यांच्या केवाळे येथील GPS (ग्रेटर पनवेल सुपरझोन) प्रकल्पातील प्रत्येकी सुमारे रु. २५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली गेली आहेत. देशभरातील परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत मोठी घट होत असताना ही विक्री राष्ट्रीय कलाला छेद देणारी ठरली आहे. रु. २५ लाखांच्या घराच्या किमतीनुसार रु.२० लाखांच्या गृहकर्जावर अंदाजे रु. १७,००० मासिक ईएमआय येतो. त्यामुळे एकत्रित मासिक उत्पन्न रु. ५०,०००–६०,००० असलेल्या कुटुंबांसाठी घरमालकीची संधी अधिक सुलभ होते. याउलट, मुंबईच्या मध्यवर्ती भागात किंमत-उत्पन्न गुणोत्तर १०:१ पेक्षा अधिक असल्याने, एवढी रक्कम सरासरी सदनिकेच्या खरेदीसाठीच्या आगाऊ रकमेचा क्वचितच पुरेशी ठरते. नाईट फ्रँकच्या माहितीनुसार, भारतातील आघाडीच्या आठ निवासी बाजारपेठांमध्ये रु. ५० लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री ...

लोणावळ्यातील कैवल्यधाम येथे जगातील पहिल्या योग महाविद्यालयाच्या प्लॅटिनम ज्युबिलीचे उपराष्ट्रपती करणार उद्घाटन

लोणावळा: शतकभराचा वारसा असलेली योग संशोधन संस्था कैवल्यधाम येथे भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 18 सप्टेंबर 2026 रोजी उपस्थित राहणार असून, ते गोर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या प्लॅटिनम ज्युबिली सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम कैवल्यधामच्या लोनावळा कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. 1951 मध्ये स्थापन झालेले गोर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस हे योग शिक्षणासाठी समर्पित जगातील पहिले महाविद्यालय होते. 1962 मध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने या संस्थेला अखिल भारतीय उच्च शिक्षण संस्था (All India Institute of Higher Education) म्हणून मान्यता दिली. अशी मान्यता मिळवणारी ही देशातील पहिली योग संस्था ठरली. गेल्या 75 वर्षांत या महाविद्यालयाने शिक्षक आणि संशोधकांच्या अनेक पिढ्यांना प्रशिक्षण दिले असून, त्यांच्या माध्यमातून कैवल्यधामच्या पद्धती 65 हून अधिक देशांमध्ये पोहोचल्या आहेत. कार्यक्रमापूर्वी बोलताना कैवल्यधामचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), सुबोध तिवारी म्हणाले, “पंचाहत्तर वर्षांपूर्वी या महाविद्यालयाने...