सीधे मुख्य सामग्री पर जाएं

किया इंडियाने ‘बकल अप’ रस्ता सुरक्षा उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू केला

मुंबई। जबाबदार गतीशीलता प्रमुख म्‍हणून आपली भूमिका अधिक दृढ करत किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास प्रीमियम कारमेकर कंपनीने रस्‍ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्‍या (एमओआरटीएच) आश्रयांतर्गत द सोशल लॅब फाऊंडेशन (टीएसएल)सोबत सहयोगाने आपला प्रमुख रस्‍ता सुरक्षा उपक्रम 'बकल अप'च्‍या लाँचची घोषणा केली. या पुढील टप्‍प्‍यानिमित्त किया इंडिया आणि टीएसएलने या उपक्रमाची अधिक पोहोच व प्रभावासाठी सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली. नवी दिल्‍लीमधील ट्रान्‍सपोर्ट भवन येथे एमओआरटीएचचे राज्‍यमंत्री अजय टम्‍टा यांच्‍या हस्‍ते फेज २ चे उद्घाटन करण्‍यात आले. याप्रसंगी वरिष्‍ठ सरकारी अधिकारी आणि किया इंडियाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

बकल-अप प्रकल्‍पाच्‍या फेज १ दरम्‍यान (फेब्रुवारी २०२४ - फेब्रुवारी २०२६), किया इंडियाने रस्‍ता सुरक्षेसंदर्भात आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी गुरूग्राम वाहतूक पोलिसांसोबत सहयोग केला, जेथे पायाभूत सुविधा आणि वर्तणूकीसंदर्भात जागरूकता यांवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले. या उपक्रमांतर्गत गुरुग्राममधील ओळखण्‍यात आलेल्‍या अत्‍यंत धोकादायक भागांमध्‍ये ७५० क्रॅश बॅरियर्स बसवण्‍यात आले, ज्‍यासह प्रत्‍यक्ष प्रतिबंधात्‍मक पायाभूत सुविधा प्रबळ करण्‍यात आल्‍या. या प्रयत्‍नांना पूरक म्‍हणून किया इंडियाने १०० शाळांमध्‍ये संरचित रस्‍ता सुरक्षा माहिती उपक्रम राबवले, ज्‍याद्वारे ते जवळपास ३२,००० विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचले आणि रस्‍त्‍यावरील तरूण वापरकर्त्‍यांमध्‍ये लवकर जागरूकता निर्माण करण्‍याला चालना दिली.

फेज १ अंतर्गत तरुणांचा सहभाग वाढवत आणि स्थानिक प्राधिकरणांसोबत सहयोगाने काम करत समुदाय-केंद्रित रस्ता सुरक्षेसाठी विकासात्मक व निष्पत्ती-केंद्रित मॉडेल तयार करण्यात आले. या मजबूत पायावर आधारित फेज २ (एप्रिल २०२६ – मार्च २०२८) मध्ये उपक्रमाचा भौगोलिक विस्तार आणि प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवले जाणार आहे. दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये १०० कॉलेजमधील सुमारे २०,००० विद्यार्थ्यांना प्रगत ड्रायव्हिंग सिम्युलेटर्स व संरचित प्रशिक्षण मॉड्यूल्सद्वारे सहभागी करून सुरक्षित ड्रायव्हिंगविषयी जागरूकता निर्माण केली जाईल. तसेच गुरगाव आणि दिल्ली-उत्तराखंड महामार्गासारख्या उच्च-जोखीम भागांमध्ये अतिरिक्त क्रॅश बॅरियर्स बसवून रस्ता सुरक्षा पायाभूत सुविधा मजबूत करण्यात येतील.

एमओआरटीएचचे राज्यमंत्री अजय टम्टा यांनी पायाभूत सुविधा व जागरूकता उपक्रमांद्वारे रस्ता सुरक्षा बळकट करण्यासाठी किया इंडियाच्या संरचित दृष्टिकोनाचे कौतुक केले आणि अपघात कमी करण्यासाठी उद्योग-सरकार सहयोगाचे महत्त्व अधोरेखित केले.

किया इंडियाचे प्रतिनिधी श्री. सूद यांनी सांगितले की, ‘बकल अप’ उपक्रमाद्वारे सुरक्षित गतीशीलता परिसंस्था निर्माण करण्याची कंपनीची दीर्घकालीन बांधिलकी अधिक दृढ होत आहे आणि फेज २ मध्ये तरुण व पहिल्यांदा वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हर्सपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाईल.

टीएसएल फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक अपूर्व शर्मा यांनी नमूद केले की, फेज १ मध्ये तयार झालेल्या ऑपरेशनल पायावर आधारित फेज २ मध्ये या उपक्रमाचा विस्तार नवीन भौगोलिक क्षेत्रे व विविध वयोगटांपर्यंत केला जाईल.

या उपक्रमाद्वारे किया इंडिया सरकार, स्थानिक प्राधिकरणे आणि समुदाय भागधारकांसोबत सहयोगाने काम करत देशभरात सुरक्षित रस्ता वर्तणूक आणि मजबूत गतीशीलता परिसंस्था निर्माण करण्यास हातभार लावत आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

३,१०० भगिनींनी गौरीशंकर चौबे यांच्यासोबत राखी बांधून आणि संरक्षणाची शपथ घेऊन रक्षाबंधन साजरे केले

मुंबई। दरवर्षीप्रमाणे, द्वारिकामाई चॅरिटी संस्थाने दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील मालाड पूर्व येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त एका भव्य 'रक्षा शक्ती सन्मान' सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यात मोठ्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे खजिनदार, आचार्य पवन त्रिपाठी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी, सुमारे ३,१०० भगिनींनी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, गौरीशंकर चौबे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या सोहळ्यादरम्यान, गौरीशंकर चौबे म्हणाले की, रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर भगिनींशी मनापासून जोडले जाण्याचा आणि त्यांचा आदर व संरक्षण करण्याची शपथ घेण्याचा एक पवित्र प्रसंग आहे. ते म्हणाले की, बहिणींचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद ही समाजसेवेसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे केल्याने प्रचंड आनंद आणि आपलेपणाची भावना अनुभवता आली. राखी बांधल्यानंतर, गौरीशंकर चौबे यांनी सर्व बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देत, त्यांना सर्वतोपरी संरक्षण, सन्मान आणि पाठ...

ॲनिमे इंडिया मुंबई २०२६: ४५,००० हून अधिक उपस्थितांची उपस्थिती आणि 'नारुतो'चे दिग्दर्शक हायातो डेट यांची ऐतिहासिक पहिली भारत भेट

● ॲनिमेशनएक्सप्रेस (AnimationXpress) द्वारे आयोजित या तीन दिवसीय संमेलनाने नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर चाहते, निर्माते आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणले. ● या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण जपानमधील आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ होते; यात 'नारुतो' (Naruto) या प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शक हायातो डेट यांच्या अत्यंत अपेक्षित अशा पहिल्या अधिकृत भारत भेटीचा समावेश होता. मुंबई। ॲनिमेशनएक्सप्रेसचा उपक्रम असलेल्या ' ॲनिमे इंडिया मुंबई २०२६' ची अधिकृत सांगता ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर झाली. ४५,००० हून अधिक लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात चाहते, निर्माते, कलाकार, सादरीकरण करणारे कलाकार, गेमर्स, कॉस्प्लेअर्स आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक एकाच छताखाली एकत्र आले. २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित या संमेलनात ॲनिमे, मांगा (manga), गेमिंग, कॉस्प्ले, जपानी संगीत, व्हॉइस ॲक्टिंग, निर्मात्यांशी संवाद, स्क्रीनिंग, स्पर्धा आणि समुदायाद्वारे आयोजित विविध उपक्रम यांचा समावेश होता. उद्घाटनाच्या दिवशी ...

मेक इन इंडियाला बळ, आरआरपी डिफेन्स भारतासाठी आणणार 'डायमंड' AI सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

मुंबई। भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा करार झाला आहे. भारतातील अग्रगण्य संरक्षण उत्पादन कंपनी ' आरआरपी डिफेन्स लिमिटेड' आणि जागतिक स्तरावर नावाजलेली इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टीम डेव्हलपर कंपनी ' ईएससी बाज ' यांनी भारतात एका विशेष भागीदारीची घोषणा केली आहे. या करारांतर्गत इस्रायलचे जगप्रसिद्ध 'डायमंड - युनिक ऑब्झर्व्हेशन सिस्टीम'हे 'एआय' (AI) आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात आणले जाणार आहे. काय आहे 'डायमंड' तंत्रज्ञान? 'डायमंड' ही एक अत्यंत प्रगत आणि बुद्धिमत्ता आधारित सर्व्हेलन्स यंत्रणा आहे. या यंत्रणेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे काळ्याकुट्ट अंधारातही ही सिस्टीम 'दिवसासारखे' स्पष्ट आणि उच्च दर्जाचे दृश्य दाखवू शकते. 80 अंश अँगल आणि हाय-रिझोल्युशन: 80 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि 4240 × 2832 रिझोल्युशनसह हे तंत्रज्ञान काम करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सपोर्ट: एआयच्या मदतीने धोक्याची किंवा घुसखोरीची ओळख अत्यंत वेगाने आणि अचूकत...