सीधे मुख्य सामग्री पर जाएं

फॉर्च्युनने स्वयंपाक घरातील सामायिक जबाबदारीवर जाहिरात प्रकाशित केली

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फॉर्च्युनची जाहिरात प्रकाशित

मुंबई। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एडब्ल्यूएल अ‍ॅग्री बिझनेस लिमिटेडच्या (पूर्वीचे अदानी विल्मर) खाद्यतेलाचा प्रमुख ब्रँड फॉर्च्युनने एक डिजिटल जाहिरात प्रदर्शित केली आहे. यात घरातील जबाबदाऱ्यांच्या सामायिक वाटपाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. पती-पत्नीमधील एका छोट्या संभाषणाचा आधार घेत, रोजच्या जगण्यातील स्त्री-पुरुषांच्या जबाबदाऱ्यांबद्दल भाष्य केले आहे. प्रेक्षकांना घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये सहभागी होण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी चांगली भागीदारी निर्माण करण्यात कसे योगदान देऊ शकतात यावर विचार करण्यास जाहिरात प्रोत्साहित करते.

स्वयंपाकघर हे नेहमीच महिलांचे कार्यक्षेत्र म्हणून पाहिले जाते, या कल्पनेभोवतीच फॉर्च्युनची महिला दिनानिमित्त केलेली जाहिरात बांधली आहे. यात रोजच्या जगण्यातील एक नेहमीचा प्रसंग मांडण्यात आला आहे. एके दिवशी नवरा बायकोला आराम करायला सांगून स्वतः स्वयंपाक करण्याचे ठरवतो. पण स्वयंपाकाला लागल्यावर त्याला हे लक्षात येते की, यासाठी आवश्यक असलेले पीठ, तेल आणि कोथिंबीर हे पदार्थ कुठे ठेवले आहेत हे तर त्याला माहीतच नाही. तेव्हा त्याची पत्नी त्याला एका गोष्टीची जाणीव करून देते, ती म्हणजे, स्वयंपाक करणे हे प्रामुख्याने बाईचे काम मानले जात असल्याने कुठे, काय ठेवले आहे याची माहिती त्यांनाच असते. त्यामुळे स्वयंपाकघराचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक प्रयत्न आणि ज्ञान बहुतेकदा गृहीत धरले जाते.

मुकेश मिश्रा, विक्री आणि विपणन विभागाचे संयुक्त अध्यक्ष, एडब्ल्यूएल अ‍ॅग्री बिझनेस लिमिटेड म्हणाले, "कुटुंबांमध्ये एकता, प्रेम आणि सांस्कृतिक एकोपा वाढवण्यासाठी आम्ही नेहमीच "घर का खाना" (घरगुती जेवणावर) भर दिला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा केवळ महिलांचा दिवस साजरा करण्याबद्दल नाही तर महिला पार पाडत असलेल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवण्याबद्दलही आहे. या नवीन जाहिरातीच्या माध्यमातून, कुटुंबांना घरातील भूमिका सामायिक करण्यास आणि जेवण बनवण्यासाठी प्रत्येकाने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करण्यासाठी फॉर्च्युन प्रेरित करते. शेवटी, जेव्हा प्रत्येकजण कुटुंबाच्या कल्याणासाठी योगदान देतो तेव्हा 'घर का खाना' खरोखरच खास बनते."

जेव्हा स्वयंपाकघर ही प्रत्येकाला आपली जबाबदारी वाटेल, तेव्हाच घरातील अन्न हे 'घर का खाना' बनेल, असा साधा पण प्रभावी संदेश देत या जाहिरातीचा शेवट करण्यात आला आहे. घरात काम करणाऱ्याला समजून घेणे, घरातील कामात सहभाग घेणे आणि जबाबदारीचे सामायिक वाटप करणे, यामुळेच घरात काम करणाऱ्यांची किंमत ठेवली जाते. या उपक्रमाद्वारे, फॉर्च्युन यावरच भर देते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

३,१०० भगिनींनी गौरीशंकर चौबे यांच्यासोबत राखी बांधून आणि संरक्षणाची शपथ घेऊन रक्षाबंधन साजरे केले

मुंबई। दरवर्षीप्रमाणे, द्वारिकामाई चॅरिटी संस्थाने दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील मालाड पूर्व येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त एका भव्य 'रक्षा शक्ती सन्मान' सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यात मोठ्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे खजिनदार, आचार्य पवन त्रिपाठी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी, सुमारे ३,१०० भगिनींनी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, गौरीशंकर चौबे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या सोहळ्यादरम्यान, गौरीशंकर चौबे म्हणाले की, रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर भगिनींशी मनापासून जोडले जाण्याचा आणि त्यांचा आदर व संरक्षण करण्याची शपथ घेण्याचा एक पवित्र प्रसंग आहे. ते म्हणाले की, बहिणींचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद ही समाजसेवेसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे केल्याने प्रचंड आनंद आणि आपलेपणाची भावना अनुभवता आली. राखी बांधल्यानंतर, गौरीशंकर चौबे यांनी सर्व बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देत, त्यांना सर्वतोपरी संरक्षण, सन्मान आणि पाठ...

ॲनिमे इंडिया मुंबई २०२६: ४५,००० हून अधिक उपस्थितांची उपस्थिती आणि 'नारुतो'चे दिग्दर्शक हायातो डेट यांची ऐतिहासिक पहिली भारत भेट

● ॲनिमेशनएक्सप्रेस (AnimationXpress) द्वारे आयोजित या तीन दिवसीय संमेलनाने नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर चाहते, निर्माते आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणले. ● या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण जपानमधील आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ होते; यात 'नारुतो' (Naruto) या प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शक हायातो डेट यांच्या अत्यंत अपेक्षित अशा पहिल्या अधिकृत भारत भेटीचा समावेश होता. मुंबई। ॲनिमेशनएक्सप्रेसचा उपक्रम असलेल्या ' ॲनिमे इंडिया मुंबई २०२६' ची अधिकृत सांगता ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर झाली. ४५,००० हून अधिक लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात चाहते, निर्माते, कलाकार, सादरीकरण करणारे कलाकार, गेमर्स, कॉस्प्लेअर्स आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक एकाच छताखाली एकत्र आले. २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित या संमेलनात ॲनिमे, मांगा (manga), गेमिंग, कॉस्प्ले, जपानी संगीत, व्हॉइस ॲक्टिंग, निर्मात्यांशी संवाद, स्क्रीनिंग, स्पर्धा आणि समुदायाद्वारे आयोजित विविध उपक्रम यांचा समावेश होता. उद्घाटनाच्या दिवशी ...

मेक इन इंडियाला बळ, आरआरपी डिफेन्स भारतासाठी आणणार 'डायमंड' AI सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

मुंबई। भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा करार झाला आहे. भारतातील अग्रगण्य संरक्षण उत्पादन कंपनी ' आरआरपी डिफेन्स लिमिटेड' आणि जागतिक स्तरावर नावाजलेली इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टीम डेव्हलपर कंपनी ' ईएससी बाज ' यांनी भारतात एका विशेष भागीदारीची घोषणा केली आहे. या करारांतर्गत इस्रायलचे जगप्रसिद्ध 'डायमंड - युनिक ऑब्झर्व्हेशन सिस्टीम'हे 'एआय' (AI) आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात आणले जाणार आहे. काय आहे 'डायमंड' तंत्रज्ञान? 'डायमंड' ही एक अत्यंत प्रगत आणि बुद्धिमत्ता आधारित सर्व्हेलन्स यंत्रणा आहे. या यंत्रणेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे काळ्याकुट्ट अंधारातही ही सिस्टीम 'दिवसासारखे' स्पष्ट आणि उच्च दर्जाचे दृश्य दाखवू शकते. 80 अंश अँगल आणि हाय-रिझोल्युशन: 80 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि 4240 × 2832 रिझोल्युशनसह हे तंत्रज्ञान काम करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सपोर्ट: एआयच्या मदतीने धोक्याची किंवा घुसखोरीची ओळख अत्यंत वेगाने आणि अचूकत...