सीधे मुख्य सामग्री पर जाएं

९१११ डोंबिवलीकरांनी रचला इतिहास,मोडला सांगलीकरांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

डोंबिवली। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ९ हजार १११ महिला आणि विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझीम वादन स्पर्धेत रविवारी येथील श्री संत सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या विद्यार्थीनी आणि महिला भगिनी आदींनी एकत्र येत ९,१११ एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. या आधी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता, अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी सांगितले. त्या ठिकाणी या आधी ७ हजार ३३८ महिलांनी एकत्र येऊन तो रेकॉर्ड रचला होता, मात्र तो रविवारी डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.

साडेपाच मिनिटांची विविध प्रात्यक्षिक सादर करून महिलांनी हा रेकॉर्ड केला. त्यावेळी स्वप्नील डांगरेकर यांनी आमदार रविंद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी रविंद्र चव्हाण यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे सर्टिफिकेट व मेडल हस्तांतरीत केले.

त्यावेळी रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानत लेझीम ही आपली संस्कृती असून ती टिकवणे हे आपले काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षी शारीरिक व्यायामावर भर देऊन जगासमोर सशक्त भारत कसा असू शकतो हे दाखवून देण्याचा संकल्प सोडला होता, त्या निमित्ताने महिला आणि विद्यार्थीनी आदींनी एकत्र येऊन हा अनोखा रेकॉर्ड केला याचा मला डोंबिवलीकर म्हणून प्रचंड आनंद आहे, हा रेकॉर्ड मी भारत मातेच्या चरणी समर्पित करतो असेही उद्गार त्यांनी यावेळी काढले. कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीचे त्यांनी आभार मानले. शिक्षक, विद्यार्थी आदींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सारा आसमंत भारत माता की जय, जय श्रीराम, वंदे मातरमने दणाणून सोडला होता. प्रत्येकाच्या चेहऱयावर वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. लेझीमचा झुंकार सर्वत्र निनादत होता, ढोल ताशांच्या गजरात त्या रेकॉर्डचे हजारो डोंबिवलीकरांनी स्वागत केले, आणि प्रत्येकाच्या सहभागाबद्दल कौतुक करण्यात आले. अशा दैदिप्यमान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पहाटेपासून डोंबिवलीकर प्रतीक्षेत होता, अखेर वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा होताच प्रचंड जल्लोषात त्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

३,१०० भगिनींनी गौरीशंकर चौबे यांच्यासोबत राखी बांधून आणि संरक्षणाची शपथ घेऊन रक्षाबंधन साजरे केले

मुंबई। दरवर्षीप्रमाणे, द्वारिकामाई चॅरिटी संस्थाने दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील मालाड पूर्व येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त एका भव्य 'रक्षा शक्ती सन्मान' सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यात मोठ्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे खजिनदार, आचार्य पवन त्रिपाठी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी, सुमारे ३,१०० भगिनींनी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, गौरीशंकर चौबे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या सोहळ्यादरम्यान, गौरीशंकर चौबे म्हणाले की, रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर भगिनींशी मनापासून जोडले जाण्याचा आणि त्यांचा आदर व संरक्षण करण्याची शपथ घेण्याचा एक पवित्र प्रसंग आहे. ते म्हणाले की, बहिणींचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद ही समाजसेवेसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे केल्याने प्रचंड आनंद आणि आपलेपणाची भावना अनुभवता आली. राखी बांधल्यानंतर, गौरीशंकर चौबे यांनी सर्व बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देत, त्यांना सर्वतोपरी संरक्षण, सन्मान आणि पाठ...

ॲनिमे इंडिया मुंबई २०२६: ४५,००० हून अधिक उपस्थितांची उपस्थिती आणि 'नारुतो'चे दिग्दर्शक हायातो डेट यांची ऐतिहासिक पहिली भारत भेट

● ॲनिमेशनएक्सप्रेस (AnimationXpress) द्वारे आयोजित या तीन दिवसीय संमेलनाने नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर चाहते, निर्माते आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणले. ● या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण जपानमधील आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ होते; यात 'नारुतो' (Naruto) या प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शक हायातो डेट यांच्या अत्यंत अपेक्षित अशा पहिल्या अधिकृत भारत भेटीचा समावेश होता. मुंबई। ॲनिमेशनएक्सप्रेसचा उपक्रम असलेल्या ' ॲनिमे इंडिया मुंबई २०२६' ची अधिकृत सांगता ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर झाली. ४५,००० हून अधिक लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात चाहते, निर्माते, कलाकार, सादरीकरण करणारे कलाकार, गेमर्स, कॉस्प्लेअर्स आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक एकाच छताखाली एकत्र आले. २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित या संमेलनात ॲनिमे, मांगा (manga), गेमिंग, कॉस्प्ले, जपानी संगीत, व्हॉइस ॲक्टिंग, निर्मात्यांशी संवाद, स्क्रीनिंग, स्पर्धा आणि समुदायाद्वारे आयोजित विविध उपक्रम यांचा समावेश होता. उद्घाटनाच्या दिवशी ...

मेक इन इंडियाला बळ, आरआरपी डिफेन्स भारतासाठी आणणार 'डायमंड' AI सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

मुंबई। भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा करार झाला आहे. भारतातील अग्रगण्य संरक्षण उत्पादन कंपनी ' आरआरपी डिफेन्स लिमिटेड' आणि जागतिक स्तरावर नावाजलेली इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टीम डेव्हलपर कंपनी ' ईएससी बाज ' यांनी भारतात एका विशेष भागीदारीची घोषणा केली आहे. या करारांतर्गत इस्रायलचे जगप्रसिद्ध 'डायमंड - युनिक ऑब्झर्व्हेशन सिस्टीम'हे 'एआय' (AI) आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात आणले जाणार आहे. काय आहे 'डायमंड' तंत्रज्ञान? 'डायमंड' ही एक अत्यंत प्रगत आणि बुद्धिमत्ता आधारित सर्व्हेलन्स यंत्रणा आहे. या यंत्रणेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे काळ्याकुट्ट अंधारातही ही सिस्टीम 'दिवसासारखे' स्पष्ट आणि उच्च दर्जाचे दृश्य दाखवू शकते. 80 अंश अँगल आणि हाय-रिझोल्युशन: 80 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि 4240 × 2832 रिझोल्युशनसह हे तंत्रज्ञान काम करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सपोर्ट: एआयच्या मदतीने धोक्याची किंवा घुसखोरीची ओळख अत्यंत वेगाने आणि अचूकत...