सीधे मुख्य सामग्री पर जाएं

किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री

वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री 

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने भारतात कार्यसंचालनांना सुरूवात केल्‍यापासून फेब्रुवारीमध्‍ये २७,६१० युनिट्सच्‍या विक्रीसह आतापर्यंतच्‍या सर्वाधिक विक्रीची नोंद केली. फेब्रुवारी २०२५ मध्‍ये विक्री करण्‍यात आलेल्‍या २५,०२६ युनिट्सच्‍या तुलनेत वार्षिक १०.३ टक्‍के वाढ झाली आहे, ज्‍यामुळे फेब्रुवारी प्रबळ दोन-अंकी वाढ केलेला सलग दुसरा महिना ठरला आहे. यामधून ब्रँडप्रती ग्राहकांचा दृढ व स्थिर विश्वास दिसून येतो. 

या प्रगतीशील विकासाला अधिक दृढ करत ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसला आकर्षक व मोठी डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान व सुरक्षितता वैशिष्‍ट्यांमुळे ग्राहकांकडून सतत चांगली मागणी मिळाली. सोनेटने आपल्‍या वैशिष्‍ट्य-संपन्‍न व मूल्‍य-संचालित तत्त्वासह कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये आघाडीची गती कायम राखली. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसने सुधारित डिझाइन, एैसपैस जागा आणि आरामदायी-केंद्रित सुधारणांसह कौटुंबिक गतीशीलता क्षेत्रात आपले स्‍थान दृढ केले आणि क्‍लॅव्हिस ईव्‍हीला सुलभ इलेक्ट्रिक गतीशीलता मालकीहक्‍क अनुभवाचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांकडून पसंती मिळाली. प्रीमियमसदंर्भात कार्निवलने लक्‍झरी एमपीव्‍ही श्रेणीमधील कियाचे स्‍थान अधिक दृढ केले, ज्‍यामधून भारतात किया ब्रँडसाठी ग्राहकांची वाढती पसंती दिसून येते.

एकूण कामगिरीला सुनियोजित उत्‍पादन धोरणाचे पाठबळ आहे, ज्‍यामध्‍ये प्रगतीशील डिझाइन, प्रगत सुरक्षितता तंत्रज्ञानांसह एडीएएस, कनेक्‍टेड कार वैशिष्‍ट्ये आणि प्रीमियम मालकीहक्‍क अनुभव देणाऱ्या ऑफरिंगचा समावेश आहे. किया इंडियाचे विशिष्‍ट मास-प्रीमियम स्‍थान ब्रँडला महत्त्वाकांक्षी उत्‍पादने देण्‍यास सक्षम करत आहे, जे ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक महत्त्वाकांक्षांची पूर्तता करतात.

किया इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्‍हणाले, ''फेब्रुवारीमधील आमच्‍या विक्रमी कामगिरीमधून भारतातील ग्राहकांचा किया ब्रँडप्रती वाढता विश्वास दिसून येतो. ऑल-न्‍यू सेल्‍टोस, सोनेट व क्‍लॅव्हिस लाइन-अप यांचा समावेश असलेल्‍या आमच्‍या पोर्टफोलिओप्रती उत्तम प्रतिसादामधून आमचे विचारशील धोरण, तसेच इलेक्ट्रिक गतीशीलतेप्रती परिवर्तनाचा अवलंब करण्‍याची आणि ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्‍याची क्षमता दिसून येते. आम्‍ही बाजारपेठेतील गरजांची पूर्तता करण्‍यासोबत नाविन्‍यता, प्रीमियम डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि ग्राहक मूल्‍य वितरित करण्‍यावर निरंतर लक्ष केंद्रित करत त्‍यांना आकार देखील देत आहोत.''

कार्यसंचालन स्थिरता आणि गतीशील पुरवठा यंत्रणा वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍याच्‍या आणि ग्राहकांना वेळेत डिलिव्‍हरी देण्‍याच्‍या किया इंडियाच्‍या क्षमतेला अधिक दृढ करत आहे. ब्रँडच्‍या ३८२ शहरांमध्‍ये ८४९ टचपॉइण्‍ट्सपर्यंत पसरलेल्‍या वाढत्‍या उपस्थितीने देशभरात विक्री व सर्विस मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध करून दिली आहे. या पोहोचला १२२ सर्टिफाईड प्री-ओन्‍ड आऊटलेट्सचा पाठिंबा आहे, ज्‍यासह खरेदी-विक्री व एक्‍स्‍चेंज प्रक्रियेमध्‍ये विश्वास आणि पारदर्शकता दिसून आली आहे, तसेच पूर्णपणे मन:शांतीसह विनासायास, सुरक्षित मालकीहक्‍क ट्रान्‍सफर सक्षम होत आहे. डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍स व ग्राहक सहभाग उपक्रमांमध्‍ये सतत गुंतवणूका एकूण मालकीहक्‍क अनुभव अधिक उत्‍साहित करत आहेत.

वर्ष २०२६ ची उत्तम सुरूवात केल्‍यानंतर किया इंडियाने शाश्वत विकास गतीवर लक्ष केंद्रित करणे सुरूच ठेवले आहे, तसेच आपली ईव्‍ही उपस्थिती वाढवत आहे आणि भविष्‍यासाठी सुसज्‍ज गतीशीलता सोल्‍यूशन्‍स देत आहे, ज्‍यामध्‍ये नाविन्‍यता, सुरक्षितता व प्रीमियम डिझाइन समाविष्‍ट आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मिन्त्राचा बिग फॅशन फेस्टिव्हल

८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, १००+ नवीन लॉन्च आणि २१,००० उदयोन्मुख लेबल्सचा सहभाग मुंबई: सणासुदीच्या खरेदी हंगामाची सुरुवात करत मिन्त्राने आपल्या प्रमुख बिग फॅशन फेस्टिव्हलची (बीएफएफ) घोषणा केली आहे. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांसाठी ८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, हजारो ब्रँड्स आणि १०० हून अधिक नवीन ब्रँड्स व कलेक्शन्स उपलब्ध असतील. यासोबतच २१,००० उदयोन्मुख ब्रँड्स आणि लेबल्स सहभागी होत असून, त्यापैकी १३,००० ब्रँड्स प्रथमच बीएफएफमध्ये सहभागी होत आहेत. मिन्त्राच्या प्रमुख शेरॉन पैस म्हणाल्या, “बिग फॅशन फेस्टिव्हल हा भारताच्या उत्सवी कॅलेंडरमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा बनला आहे. प्रादेशिक विक्रेते आणि लघुउद्योगांना सक्षम करण्यापासून ते जागतिक आणि भारतीय फॅशन व लाइफस्टाइल ब्रँड्समधील सर्वोत्तम उत्पादने लाखो घरांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत, तो संपूर्ण इकोसिस्टमला जोडतो. एआय आणि विस्तारित डिलिव्हरी नेटवर्कच्या मदतीने आम्ही ८० दशलक्षांहून अधिक ग्राहकांसाठी फॅशन अधिक सुलभ, वैयक्तिकृत आणि अखंड बनवत आहोत.” यंदाच्या बीएफएफमध्ये पुरुष व महिलांचे एथनिक वेअर, पुरुषांचे कॅज्युअल वेअर, महिला...

ब्लॅक ओपल कन्सल्टंट्सचे बीएसई एसएमईवर यशस्वी पदार्पण

मुंबई। ब्लॅक ओपल कन्सल्टंट्स लिमिटेडच्या शेअर्सनी बीएसई एसएमई मंचावर यशस्वी पदार्पण केल्यानंतर मोठी तेजी नोंदवली. कंपनीचे शेअर्स २१० रुपयांच्या पातळीवर पोहोचून अप्पर सर्किटवर बंद झाले. २१० रुपयांच्या या भावावर कंपनीचा शेअर आपल्या १९७ रुपयांच्या या मूळ आयपीओ इश्यू किमतीपेक्षा ६.६०% वर व्यवहार करत होता. कंपनीच्या शेअर्सची सुरुवात २०० रुपयांच्या भावावर झाली, जी इश्यू किमतीपेक्षा १.५२% अधिक होती. त्यानंतर संपूर्ण सत्रादरम्यान शेअर्समध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळाली. कंपनीचा एकूण ५५.०८ रुपये कोटींचा आयपीओ होता. यामध्ये ४४.०९ कोटी रुपये मूल्याच्या २२.३८ लाख शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा आणि १०.९९ कोटी रुपये मूल्याच्या ५.५८ लाख शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश होता. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान खुला असलेल्या या आयपीओसाठी प्रति शेअर १८५ रुपये ते १९७ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. बोली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम इश्यू किंमत प्रति शेअर १९७ रुपये निश्चित करण्यात आली, ज्यामध्ये एका लॉटमध्ये ६० किंवा अधिक शेअर्स (६०० शेअर्सचा लॉट आकार) समाविष्ट होते. या...

९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६, मुग्धा गोडसे हिने पुरस्कार प्रदान केले

मुंबई: रिअल्टी क्वार्टर, एक अग्रगण्य रिअल इस्टेट मीडिया, प्रकाशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने, आपला ९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६ यशस्वीरित्या आयोजित केला. उद्योग क्षेत्रातील अनुभवी पवन चौहान यांनी सुरू केलेल्या या वार्षिक प्रमुख कार्यक्रमात, कंपनीच्या प्रकाशनाची नऊ वर्षे आणि प्रॉपर्टी एक्स्पो व गुंतवणूकदार मेळाव्यांच्या आयोजनातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १७ वर्षांच्या उपस्थितीचा उत्सव साजरा करण्यात आला. या भव्य सोहळ्याची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन समारंभाने झाली, ज्याला श्री. चौहान, कंपनी संचालक शाइस्ता अन्सारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. असोसिएट डायरेक्टर सिद्धांत ठाकूर यांनी सूत्रसंचालन केलेली "बी२बी आणि बी२सी साठी एकात्मिक दृष्टिकोन आणि रिअल इस्टेटचा दृष्टिकोन २०२६" या विषयावरील माहितीपूर्ण पॅनल चर्चा हे या सायंकाळचे मुख्य आकर्षण होते. पॅनेलमध्ये सुहेल खंडवाणी (खंडवाणी ग्रुप), डॉ. अजय एल. दुबे (मीरा-भयंदर प्रॉपर्टी डीलर्स वेल्फेअर असोसिएशन), चिंतन वसानी (वाइझबिझ रियल्टी), संजीव गुप्ता...