सीधे मुख्य सामग्री पर जाएं

क्विक हीलचा ‘'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रम ठरला गेमचेंजर

८० लाखांहून अधिक तरूणांच्‍या जीवनात सकारात्‍मक प्रभाव घडवून आणला 

मुंबई। क्विक हील फाउंडेशन या सायबर सुरक्षा उपाय प्रदान करणारी जागतिक कंपनी क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडच्‍या सीएसआर शाखेने 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा: फ्युचर प्रूफ २०२५-२६' अहवाल सादर केला. २८ मार्च रोजी पुण्यात आयोजित करण्‍यात येणाऱ्या 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स'च्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालामध्‍ये फाउंडेशनच्या प्रमुख सायबर जागरूकता उपक्रमाच्या पहिल्या सर्वसमावेशक प्रभाव मूल्यांकनाचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा सर्वेक्षण आधी व नंतर केलेल्‍या मूल्‍यमापनाच्‍या रचनेवर आधारित आहे. या सर्वेक्षणामध्‍ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील १०.४ लाख विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. या मोठ्या समूहातून सविस्तर विश्‍लेषणासाठी २,१८,२२१ विद्यार्थ्यांची आकडेवारीनुसार प्रबळ नमुना म्हणून निवड करण्यात आली. हा अहवाल विविध वयोगटातील विद्यार्थ्यांचे डिजिटल जगातील ज्ञान, दृष्टिकोन आणि वर्तणूक बदलण्यात नियोजित सायबर जागरूकता सत्रांचा किती प्रभावी वाटा आहे, याचे पुरावा-आधारित निष्कर्ष देखील सादर करतो.

डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांवर आधारित 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' हा उपक्रम तरुण नागरिकांमध्ये सायबर जागरूकता वाढवणे, डिजिटल कौशल्ये विकसित करणे आणि जबाबदार ऑनलाइन वर्तणुकीला प्रोत्साहन देऊन युवा विकासावर लक्ष केंद्रित करतो. हा उपक्रम युनायटेड नेशन्‍स सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट गोल्‍स (एसडीजी) ४, ५, ८, ९ आणि १७ शी सुसंगत आहे, तसेच भारतातील तरुणांमधील डिजिटल साक्षरतेची तफावत कमी करण्यास मदत करत आहे. आढावा घेतलेल्या कालावधीत हा उपक्रम ३६ शैक्षणिक संस्थांसोबत सहयोगाने ५,१६९ नियोजित जागरूकता सत्रांच्या माध्यमातून ३२ जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. क्विक हील फाउंडेशनच्या व्यापक सायबर जागरूकता सीएसआर उपक्रमांनी संपूर्ण भारतात ८० लाखांहून अधिक तरूणांच्‍या जीवनात सकारात्‍मक परिणाम घडवून आणला आहे.

'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे की, उपक्रमानंतर सायबर सुरक्षेच्या महत्त्वाच्या संकल्पनांबाबतच्या जागरूकतेची पातळी आता ९० टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचली आहे. यामधून स्‍पष्टपणे निदर्शनास येते की, ही सत्रे पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी सुरक्षित आणि असुरक्षित डिजिटल पद्धतींमधील फरक ओळखण्यासाठी अधिक सक्षम झाले आहेत. जागरूकतेच्‍या प्रमाणात इयत्ता ५वी ते ७वी पर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये ४३ टक्‍क्‍यांवरून ८९ टक्‍क्‍यांपर्यंत, इयत्ता ८वी ते १०वी पर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये ४९ टक्‍क्‍यांवरून ९० टक्‍क्‍यांपर्यंत आणि कॉलेज विद्यार्थ्‍यांमध्‍ये ४३ टक्‍क्‍यांवरून ९० टक्‍क्‍यांपर्यंत सुधारणा झाली आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १० पैकी ८ विद्यार्थ्यांनी या सत्रांनंतर अधिक सुरक्षित ऑनलाइन वर्तन ठेवण्याचा स्पष्ट निर्धार व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीतही सकारात्मक बदल दिसून आले आहेत, सुरक्षित डिजिटल पद्धतींचा अवलंब अनुक्रमे ३९ टक्‍क्‍यांवरून ८४ टक्‍क्‍यांपर्यंत, ३९ टक्‍क्‍यांवरून ८२ टक्‍क्‍यांपर्यंत आणि २६ टक्‍क्‍यांवरून ८९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. परिणामी, सहभागींमधील डिजिटल स्थिरता देखील मोठ्या प्रमाणावर सुधारली आहे, जी विविध गटांमध्ये अनुक्रमे ९ टक्‍क्‍यांवरून ८६ टक्‍क्‍यांवर, ६८ टक्‍क्‍यांवरून ९१ टक्‍क्‍यांवर आणि ७३ टक्‍क्‍यांवरून ९१ टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे.

क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडच्‍या ऑपरेशन एक्‍सलन्‍सच्‍या प्रमुख आणि क्विक हील फाऊंडेशनच्‍या अध्‍यक्षा अनुपमा काटकर म्‍हणाल्‍या, ''मला सांगताना आनंद होत आहे की, सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा मोहिमेद्वारे आम्ही व्‍यक्तींपर्यंत पोहोचण्‍यापलीकडे जात निर्माण करत असलेल्‍या परिवर्तनाचे परिणाम वाढवत आहोत. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष मला विश्वास देतात की, भविष्य हे डिजिटल सक्षम तरुणांचे आहे. ८० लाखांहून अधिक तरुणाच्‍या जीवनात सकारात्‍मक प्रभाव घडवूण आणले हा आमच्यासाठी केवळ एक टप्पा नसून संकेत आहे की भारताचे तरुण सुरक्षित डिजिटल इंडियासाठी संरक्षकाची पहिली फळी म्हणून सज्ज आहेत. यामुळे आम्हाला अधिक मोठे स्वप्‍न पाहण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे, जेथे प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक मूल डिजिटल जगात जागरूक असण्‍यासोबत पूर्णपणे सक्षम आणि सुरक्षित असेल. आमच्या या प्रवासात सोबत असलेल्या सर्व भागीदार संस्था, शैक्षणिक संस्था आणि राज्य प्रशासनाचे मी मनापासून आभार व्‍यक्त करते.''

सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा उपक्रमाचा तरुणांमध्ये आणि व्यापक समुदायामध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्‍याचा आणि सायबर सुरक्षा जागरूकतेचा प्रसार करण्‍याचा उद्देश आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना सायबर वॉरियर्स बनण्यासाठी सक्षम करतो, ज्यामुळे ते अर्न अँड लर्न म्‍हणजेच कमवा व शिका मॉडेलद्वारे स्वतःच्या शिक्षणाला हातभार लावू शकतात आणि शाळा, कॉलेज व समुदायांमध्ये सायबर जागरूकता पसरवू शकतात. तांत्रिक ज्ञानासोबत सहभागी विद्यार्थी नेतृत्व, संवाद कौशल्य, सांघिक कार्य आणि प्रकल्प अंमलबजावणी यांसारखी आवश्यक जीवन व व्यावसायिक कौशल्ये विकसित करतात, ज्यामुळे त्यांची केवळ एक शिकाऊ म्हणून नव्हे तर जबाबदार डिजिटल नागरिक म्हणून प्रगती होण्यास मदत होते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमडीआर रचनेमुळे 'यूपीआय'ची शाश्वतता, नवोन्मेष आणि सुरक्षेला बळ मिळेल: असोचॅम

मुंबई। असोचॅमचे  अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी मोठ्या मूल्याच्या व्यापारी व्यवहारांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन यूपीआय फ्रेमवर्कचे स्वागत केले आहे. हे नवीन धोरण यूपीआयची शाश्वतता मजबूत करेल, नवोन्मेषाला पाठबळ देईल, फसवणूक रोखेल आणि त्याची स्वीकारार्हता वाढवेल. ही रचना पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वीकृती नेटवर्कला सक्षम करेल, ज्यामुळे यूपीआयचा विस्तार होऊन देशभरातील ग्राहक आणि व्यावसायिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल. असोचॅमने सरकारच्या संतुलित दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे, ज्याअंतर्गत सर्व व्यक्ती-ते-व्यक्ती यूपीआय व्यवहार, रक्कमेची मर्यादा न ठेवता, पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहेत. तसेच २,००० रुपयांपर्यंतची व्यापारी देयके देखील एमडीआर मुक्त राहतील. ही नवी रचना पात्र लहान व्यापाऱ्यांना, विशेषतः व्यक्ती-ते-व्यक्ती श्रेणीअंतर्गत यूपीआय क्यूआर कोडद्वारे दरमहा १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारणाऱ्या फेरीवाल्यांना आणि स्थानिक दुकानदारांना शून्य-एमडीआरचा लाभ देत राहील. यामुळे सूक्ष्म आणि लहान व्यावसायिकांना अतिरिक्त देयक खर्चापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. भारता...

'अंतर्मनातील शांती ते जागतिक शांती' या संदेशासह 'जागतिक शांती यात्रा'

मुंबई। अखिल भारतीय आध्यात्मिक समिति (ABAS) ने शांतता, सलोखा आणि मानवी ऐक्य या संदेशासह 'जागतिक शांती यात्रा २०२६' चे आयोजन केले. देशभरातील ३५ हून अधिक ठिकाणी आयोजित या यात्रेत १०,००० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. शांतता, ऐक्य आणि सामूहिक चेतनेचा संदेश पसरवण्यासाठी विविध क्षेत्रांतील आणि व्यवसायांतील लोक एकत्र आले. ' जागतिक शांती यात्रा' मुंबईजवळच्या ठाण्यातील उपवन तलाव परिसरात आयोजित करण्यात आली होती , जिथे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, विद्यार्थी, तरुण, कुटुंबे आणि विविध व्यवसायांतील लोक, तसेच सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि आरोग्य समुदायांच्या सदस्यांनी सहभाग घेतला. यात्रेची मुख्य संकल्पना ' जागतिक शांती ते अंतर्मनातील शांती ' ही होती. यात्रेतून असा संदेश देण्यात आला की, जगातील चिरस्थायी शांतीची सुरुवात स्वतःपासून होते. जेव्हा व्यक्ती आपल्या विचारांत आणि वर्तनात शांती, करुणा आणि सकारात्मकता स्वीकारतात, तेव्हा त्याचा प्रभाव कुटुंब, समाज आणि व्यापक समुदायामध्ये जाणवतो. यात्रेदरम्यान, शांती पदयात्रा, मानवी साखळ्या, पोस्टर्स, संवाद आणि सामूहिक...

बाईकवो आपल्या ताफ्यात १०,००० वाहनांची भर घालणार

मुंबई। बाईकवो ग्रीन टेक लिमिटेड (NSE: BIKEWO) ने २०२६-२७ या आर्थिक वर्षात आपल्या ऑपरेटिंग ताफ्यात जवळपास १०,००० वाहनांपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनी यासाठी ₹७६ कोटींहून अधिक किमतीच्या वॉरंट्सच्या प्रिफरेन्शियल इश्यूद्वारे निधी उभारणार आहे. हा विस्तार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री आणि वितरणाच्या पलीकडे जाऊन ईव्ही मालमत्ता मालकी आणि लीजिंग, फ्लीट तैनाती, विशेष मोबिलिटी ॲप्लिकेशन्स, ऑपरेटिंग पार्टनरशिप्स, लाइफसायकल सपोर्ट आणि तंत्रज्ञान-आधारित लॉजिस्टिक्स या क्षेत्रांमधील कंपनीच्या मोठ्या स्थित्यंतराचे प्रतिनिधित्व करतो. बाईकवोने या पुढील टप्प्याला "बाईकवो असेन्ड" असे नाव दिले आहे. या परिवर्तनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बायो एनर्जी डिव्हिजनसोबत विशेष इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भाड्याने घेण्यासाठी आणि तैनात करण्यासाठी झालेला एक मोठा करार. जीएसटीसह या करारांचे एकूण अंदाजे मूल्य सुमारे ₹६६.४६ कोटी असून, त्यांची वैधता जुलै २०२३ पर्यंत आहे. हे ट्रॅक्टर विशेष लोडर, कॅचर आणि ग्रॅबर उपकरणांनी सुसज्ज आहेत आणि कंपनी चालक व वाहन संचालन सेवा द...