सीधे मुख्य सामग्री पर जाएं

किया इंडियाने कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही लाइन-अपचा विस्‍तार केला

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कारमेकर कंपनीने आपल्‍या कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍हीचे मॉडेल इअर २०२६ (एमवाय२६) एडिशन लाँच केले आहे. या अपडेटमध्‍ये विद्यमान ७-सीटर पर्यायाव्‍यतिरिक्‍त ६-सीटर कॉन्फिग्‍युरेशनसह दुसऱ्या रांगेमध्‍ये कॅप्‍टन सीट्स सादर करण्‍यात आली आहे, तसेच नवीन ट्रिम्‍स आणि नवीन डिझाइन पॅक अपडेट्ससह लाइनअप विस्‍तारण्‍यात आली आहे. एकत्रित, या सुधारणांनी कियाच्‍या पहिल्‍या मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकलला ग्राहकांच्‍या बदलत्‍या पसंतींनुसार अधिक प्रबळ केले आहे.   

भारतामध्ये ईव्ही परिसंस्था विकसित होत असताना ग्राहकांची अपेक्षा रेंजपलीकडे जाऊन आराम, डिझाइन आणि प्रॅक्टिकलिटीवर केंद्रित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर किया इंडियाने कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये जीटी-लाइन आणि एक्स-लाइन ट्रिम्स सादर करत ६ व ७ सीटर पर्यायांसह एसयूव्ही-प्रेरित स्टायलिंगची भर घातली आहे.

नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या जीटी-लाइन ट्रिम्‍स (जीटीएक्‍स व जीटीएक्‍स+)मध्‍ये स्‍पोर्टियर विशिष्‍टतेसह वैशिष्‍ट्यपूर्ण स्‍टायलिंग सुधारणा, तसेच नवीन अलॉई व्‍हील डिझाइन, लाइम ब्रेक कॅलिपर्स आणि मेटल पेडल्‍स आहेत. याउलट, एक्‍स-लाइन एक्‍स्‍टेण्‍डेड रेंज व्‍हेरिएण्‍टमध्‍ये गडद, अधिक लक्षवेधक आकर्षकता आहे, जी अरोरा ब्‍लॅक पर्लसह विशेष डार्क गन मेटल एक्‍स्‍टीरिअर रंगामधून दिसून येते. नेक्‍स्‍ट-जनरेशन तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये, जसे डिजिटल की आणि सर्वोत्तम हीटर तंत्रज्ञान जीटीएक्‍स+ आणि एक्‍स-लाइन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये सादर करण्‍यात आली आहेत. स्‍टॅण्‍डर्ड रेंज ट्रिम्‍समध्‍ये नवीन डिझाइन करण्‍यात आलेले आर१६ ४०.५६ सेमी (१६ इंच) ब्‍लॅक हाय ग्‍लॉस ऐरो अलॉई व्‍हील्‍स देखील आहेत. 

एमवाय26 कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये आता 6-सीटर कॉन्फिगरेशनसह दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट्स देण्यात आल्या असून, यामुळे अधिक आरामदायी आणि प्रीमियम प्रवास अनुभव मिळतो. तसेच 7-सीटर पर्याय जीटीएक्स, जीटीएक्स+ आणि एक्स-लाइन ट्रिम्समध्ये उपलब्ध असून मोठ्या कुटुंबांसाठी अधिक सोयीस्कर ठरतो.

एमवाय२६ लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्‍हणाले, ''कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही इलेक्ट्रिक गतीशीलतेला दैनंदिन वापरासाठी व्‍यावहारिक व संबंधित करण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आली. अधिकाधिक ग्राहक ईव्‍हींचा अवलंब करत असताना ईव्‍हींसाठी अपेक्षा तंत्रज्ञानापलीकडे जात आहेत, जेथे अधिक आरामदायीपणा, स्थिर आसन व्‍यवस्‍था आणि विशिष्‍ट डिझाइनसाठी मागणी वाढत आहे. एमवाय२६ मधून नवीन ट्रिम्‍स व ६-सीटर कॉन्फिग्‍युरेशनसह या अभिप्रायाला देण्‍यात आलेला प्रतिसाद दिसून येतो, जे आरामदायीपणा व वैविध्‍यता वाढवतात, तसेच भारतातील ग्राहक महत्त्व देणारी व्‍यावहारिकता कायम ठेवतात.''

कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही एैसपैस जागा ६ व ७ सीटर पर्याय आणि दमदार इलेक्ट्रिक परफॉर्मन्सचा संगम आहे. ९९ किलोवॅट व १२६ किलोवॅट मोटर (२५५ एनएम टॉर्क) आणि ५१.४ केडब्ल्यूएच (४९० किमी) व ४२ केडब्ल्यूएच (४०४ किमी) बॅटरीसह ही ईव्ही फास्ट चार्जिंगने ३९ मिनिटांत १०-८०% चार्ज होते.

सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्ससह १८ फीचर्स, तर २६.६२-इंच ड्युअल डिस्प्ले, ८५+ कनेक्टेड फीचर्स आणि पॅनोरमिक सनरूफ प्रीमियम अनुभव देतात. मायकिया अॅपद्वारे १५,०००+ चार्जिंग पॉइंट्सची सुविधा मिळते. ही ईव्ही ६ व ७ सीटरमध्ये सात रंग पर्यायांसह उपलब्ध आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमडीआर रचनेमुळे 'यूपीआय'ची शाश्वतता, नवोन्मेष आणि सुरक्षेला बळ मिळेल: असोचॅम

मुंबई। असोचॅमचे  अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी मोठ्या मूल्याच्या व्यापारी व्यवहारांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन यूपीआय फ्रेमवर्कचे स्वागत केले आहे. हे नवीन धोरण यूपीआयची शाश्वतता मजबूत करेल, नवोन्मेषाला पाठबळ देईल, फसवणूक रोखेल आणि त्याची स्वीकारार्हता वाढवेल. ही रचना पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वीकृती नेटवर्कला सक्षम करेल, ज्यामुळे यूपीआयचा विस्तार होऊन देशभरातील ग्राहक आणि व्यावसायिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल. असोचॅमने सरकारच्या संतुलित दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे, ज्याअंतर्गत सर्व व्यक्ती-ते-व्यक्ती यूपीआय व्यवहार, रक्कमेची मर्यादा न ठेवता, पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहेत. तसेच २,००० रुपयांपर्यंतची व्यापारी देयके देखील एमडीआर मुक्त राहतील. ही नवी रचना पात्र लहान व्यापाऱ्यांना, विशेषतः व्यक्ती-ते-व्यक्ती श्रेणीअंतर्गत यूपीआय क्यूआर कोडद्वारे दरमहा १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारणाऱ्या फेरीवाल्यांना आणि स्थानिक दुकानदारांना शून्य-एमडीआरचा लाभ देत राहील. यामुळे सूक्ष्म आणि लहान व्यावसायिकांना अतिरिक्त देयक खर्चापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. भारता...

लखोटिया रियॅलिटीने पनवेलमध्ये ५ आठवड्यांत रु.२५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली

लखोटिया रियॅलिटीने पनवेलमध्ये ५ आठवड्यांत रु.२५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली; देशातील परवडणाऱ्या घरांच्या बाजारात मंदीला छेद परवडणाऱ्या घरांच्या बाजारात राष्ट्रीय घसरणीच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय विक्री मुंबई।  लखोटिया रियॅलिटीने सांगितले की, केवळ ५ आठवड्यांत त्यांच्या केवाळे येथील GPS (ग्रेटर पनवेल सुपरझोन) प्रकल्पातील प्रत्येकी सुमारे रु. २५ लाख किमतीची १०० हून अधिक घरे विकली गेली आहेत. देशभरातील परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत मोठी घट होत असताना ही विक्री राष्ट्रीय कलाला छेद देणारी ठरली आहे. रु. २५ लाखांच्या घराच्या किमतीनुसार रु.२० लाखांच्या गृहकर्जावर अंदाजे रु. १७,००० मासिक ईएमआय येतो. त्यामुळे एकत्रित मासिक उत्पन्न रु. ५०,०००–६०,००० असलेल्या कुटुंबांसाठी घरमालकीची संधी अधिक सुलभ होते. याउलट, मुंबईच्या मध्यवर्ती भागात किंमत-उत्पन्न गुणोत्तर १०:१ पेक्षा अधिक असल्याने, एवढी रक्कम सरासरी सदनिकेच्या खरेदीसाठीच्या आगाऊ रकमेचा क्वचितच पुरेशी ठरते. नाईट फ्रँकच्या माहितीनुसार, भारतातील आघाडीच्या आठ निवासी बाजारपेठांमध्ये रु. ५० लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री ...

लोणावळ्यातील कैवल्यधाम येथे जगातील पहिल्या योग महाविद्यालयाच्या प्लॅटिनम ज्युबिलीचे उपराष्ट्रपती करणार उद्घाटन

लोणावळा: शतकभराचा वारसा असलेली योग संशोधन संस्था कैवल्यधाम येथे भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 18 सप्टेंबर 2026 रोजी उपस्थित राहणार असून, ते गोर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या प्लॅटिनम ज्युबिली सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम कैवल्यधामच्या लोनावळा कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. 1951 मध्ये स्थापन झालेले गोर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस हे योग शिक्षणासाठी समर्पित जगातील पहिले महाविद्यालय होते. 1962 मध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने या संस्थेला अखिल भारतीय उच्च शिक्षण संस्था (All India Institute of Higher Education) म्हणून मान्यता दिली. अशी मान्यता मिळवणारी ही देशातील पहिली योग संस्था ठरली. गेल्या 75 वर्षांत या महाविद्यालयाने शिक्षक आणि संशोधकांच्या अनेक पिढ्यांना प्रशिक्षण दिले असून, त्यांच्या माध्यमातून कैवल्यधामच्या पद्धती 65 हून अधिक देशांमध्ये पोहोचल्या आहेत. कार्यक्रमापूर्वी बोलताना कैवल्यधामचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), सुबोध तिवारी म्हणाले, “पंचाहत्तर वर्षांपूर्वी या महाविद्यालयाने...