सीधे मुख्य सामग्री पर जाएं

टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून आयटीआय देवगिरी येथे अद्ययावत प्रयोगशाळेचे उद्घाटन

महाराष्ट्रातील आयटीआय उन्नतीकरणासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरचा पुढाकार 

मुंबई। टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय आयटीआय देवगिरी मधील अद्ययावत प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. महाराष्ट्र शासनासोबत झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत राज्यातील आयटीआय संस्थांना सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा आहे. या उपक्रमाअंतर्गत कंपनीने मराठवाडा आणि नागपूर विभागातील १६ शासकीय आयटीआयंचेही आधुनिकीकरण केले आहे. ग्रामीण भागातील युवकांना जागतिक दर्जाचे तांत्रिक कौशल्य देऊन सक्षम तंत्रज्ञ घडवणे आणि भारताच्या औद्योगिक प्रगतीत त्यांचा सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

महाराष्ट्रातील हा आराखडा प्राध्यापक विकास, प्रयोगशाळा व कार्यशाळा उन्नतीकरण आणि संस्कृती परिवर्तन या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. यामध्ये ‘ट्रेन-द-ट्रेनर’ (टी३) कार्यक्रम, ज्ञानवृद्धी सत्रे आणि कौशल्यविकास कार्यशाळांद्वारे शिक्षकांचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच उद्योगमान्य साधने, फंडामेंटल स्किल ट्रेनिंग किट्स, डेक्स्टेरिटी मॉड्युल्स आणि व्हिज्युअल लर्निंग बोर्ड्सच्या माध्यमातून प्रयोगशाळा व कार्यशाळांचे आधुनिकीकरण केले जाईल. यासोबतच शिस्तबद्ध व्यायाम, वर्गातील नैतिकता, तसेच टोयोटाच्या ५एस पद्धती, पर्यावरण जागरूकता आणि सुरक्षा प्रोटोकॉल्सचा समावेश करून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नम्रता, कृतज्ञता आणि सेवा वृत्ती यांसारखी मूल्ये विकसित करण्यावर भर दिला जाईल.

हा कार्यक्रम तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, पहिला टप्पा (२०२५–२६) मराठवाडा आणि नागपूर विभागातील १७ आयटीआयंसह पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात (२०२६–२८) अमरावती आणि नाशिक विभागांमध्ये विस्तार केला जाईल, तर तिसऱ्या टप्प्यात (२०२९–३०) मुंबई आणि पुणे विभागातील संस्थांचा समावेश केला जाणार आहे. या भागीदारीअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमधील आयटीआय देवगिरीला राज्यभर विस्तारता येईल असा कौशल्य विकासाचा डेमोन्स्ट्रेशन मॉडेल म्हणून विकसित करण्यात आले आहे. २०३० पर्यंत महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधील ४५ आयटीआय संस्थांना पाठिंबा देण्याचे टीकेएमचे उद्दिष्ट आहे.

या शैक्षणिक वर्षापासून संस्थेत उत्पादन आणि सेवा या दोन्ही प्रकारच्या कौशल्य संचांचा समावेश करण्यात येणार असून, यामुळे विद्यार्थ्यांना अधिक व्यापक रोजगाराच्या संधी मिळतील आणि बदलत्या ऑटोमोबाईल उद्योगाच्या गरजांनुसार त्यांचे कौशल्य विकसित होईल.

या प्रसंगी मंगल प्रभात लोढा, मंत्री – कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष, महाराष्ट्र शासन यांनी सांगितले की, राज्यातील तरुणांना उद्योगमान्य प्रशिक्षण देऊन त्यांचा आत्मविश्वास आणि रोजगाराच्या संधी वाढवणे हे या भागीदारीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

यावेळी विक्रम गुलाटी, एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट – कॉर्पोरेट अफेअर्स आणि गव्हर्नन्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर यांनी सांगितले की ग्रामीण भागातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य देऊन त्यांना राष्ट्राच्या प्रगतीत सक्रिय योगदान देता यावे हा कंपनीचा उद्देश आहे. “ग्रो इंडिया – ग्रो विथ इंडिया” या तत्त्वज्ञानानुसार कौशल्य विकासाला चालना देण्याची कंपनीची वचनबद्धता या उपक्रमातून अधोरेखित होते.

हा आयटीआय उन्नतीकरण उपक्रम स्किल इंडिया मिशनला पूरक असून, आयटीआय संस्थांना बळकट करून तरुणांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांनी सक्षम करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला अधिक बळ देतो

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

वर्गाबाहेरील साक्षरता: माहिती असलेला शेतकरी म्हणजे सक्षम शेतकरी

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त खावडा फेज IV-Cचा संदेश — माहितीपूर्ण समुदायच उभारतात विकासाचा मजबूत पाया माहितीच्या बळावर शेतकरी सशक्त; वर्गाबाहेरील साक्षरतेचा नवा अर्थ जमिनीचे कागदपत्र असोत वा नुकसानभरपाईची प्रक्रिया; योग्य माहिती शेतकऱ्यांना अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास सक्षम करते पालघर: साक्षरता म्हटले की डोळ्यासमोर येते ती शाळा, पुस्तक आणि वाचन-लेखनाची दुनिया. मात्र आजच्या काळात साक्षरतेचा अर्थ त्यापलीकडे गेला आहे. आपल्या हक्कांची माहिती असणे, आवश्यक कागदपत्रे समजून घेणे, सरकारी प्रक्रिया जाणून घेणे आणि अफवा व तथ्य यातील फरक ओळखणे, हीदेखील साक्षरतेचीच एक महत्त्वाची बाजू आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत ही माहिती त्यांच्या जमिनीशी आणि उपजीविकेशी थेट जोडलेली असते. जमिनीच्या नोंदी समजून घेणारा, मालकी हक्काबाबत जागरूक असणारा, नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती असणारा आणि आपल्या हक्कांची जाणीव असलेला शेतकरी अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो. याच विचारातून खावडा 4C पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडने समुदाय संवादामध्ये माहिती आणि जागरूकतेला महत्त्व दिले आहे. आंतररा...

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन, आयआयटी मुंबई यांच्यात एमसी²⁺ इग्नाइटच्या मुंबई सिटी कनेक्टदरम्यान ८ सप्टेंबर २०२६ रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार मुंबई। ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी एमसी²⁺ फाउंडेशन, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई आणि सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप (साइन), आयआयटी मुंबई यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.एमसी²⁺ इग्नाइट या ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख नवोन्मेष प्रवेगक उपक्रमांतर्गत ८ सप्टेंबर रोजी आयआयटी मुंबई येथे आयोजित मुंबई सिटी कनेक्ट कार्यक्रमादरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) आणि एमसी²⁺ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक व संशोधन संस्थांचे प्रतिनिधी, नवउद्योजक तसेच नवोन्मेष क्षेत्रातील विविध भागीदार सहभागी झाले. ऊर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान, उद्योगांसमोरील आव्हाने आणि नवोन्मेषाला गती देण्यासाठीच्या संधींवर यावेळी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे नेतृत्व ओएनजीसीचे अध्य...

सलग चार वेळा ९ थरांची सलामी देत बाल गोपाल गोविंदा पथकाची ऐतिहासिक कामगिरी

कांजूरमार्ग पूर्वच्या बाल गोपाल गोविंदा पथकाचा दहीहंडी उत्सवात डंका; ईशान्य मुंबईत अभिमानाची कामगिरी मुंबई : दहीहंडी उत्सवातील थरार, साहस आणि गोविंदांच्या जिद्दीचे दर्शन घडवत बाल गोपाल गोविंदा पथक, कांजूरमार्ग पूर्व यांनी यंदाच्या दहीहंडी उत्सवात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. २०२६ च्या दहीहंडी उत्सवात या पथकाने तब्बल चार वेळा ९ थरांची मानवी मनोरा रचना यशस्वीपणे साकारत आपल्या शिस्तबद्ध आणि दमदार कामगिरीची छाप उमटवली. विशेष म्हणजे, विविध ठिकाणी झालेल्या दहीहंडी उत्सवात बाल गोपाल गोविंदा पथकाने ९ थरांची रचना करत सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. पहिल्या प्रयत्नात मोहन चिराठ, नाहूर, दुसऱ्या प्रयत्नात राधा फाउंडेशन, चेंबूर, तिसऱ्या प्रयत्नात विक्रोली, कन्नमवार नगर येथे ९ थर यशस्वीरीत्या रचण्यात आले. तर चौथ्या वेळी कांजूरमार्ग पूर्व येथे ९ थरांचा मनोरा रचना साकारत पथकाने आपल्या कामगिरीवर कळस चढवला. या ऐतिहासिक यशामागे पथकातील गोविंदांची अथक मेहनत, नियमित सराव, शिस्त, एकजूट आणि परस्परांवरील विश्वास यांचा मोठा वाटा आहे. पथकाला कोच राजू लाखन बाबू पाटणकर आणि कोच विनोद वांगणे यांचे मोलाचे मार्ग...