सीधे मुख्य सामग्री पर जाएं

चंद्रपूरमध्ये भारतातील पहिल्या ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड कोळसा गॅसिफिकेशन आणि कार्बन कॅप्चर प्रकल्पाचा शुभारंभ

चंद्रपूर। देशात कोळसा गॅसिफिकेशन आणि कोळशापासून रसायने बनवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा बनवण्यासाठी न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशन्ल प्रायव्हेट लिमिटेड ही अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने चंद्रपूर येथे देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड कोळका गॅसिफिकेशन आणि कार्बन कॉम्प्लेक्स उभारणीसाठी भूमिपूजन सभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर येथील भद्रावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी देखील उपस्थित होते.
सुमारे १ हजार ६५० एकर विस्तीर्ण क्षेत्रावर या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. हा प्रकल्प भारतातील कोळशावर आधारित रसायन उत्पादन क्षेत्रातील सर्वात अत्याधुनिक प्रकल्प मानला जात आहे. यात अत्याधुनिक कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानासोबत कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज पायाभूत सुविधा एकत्रितपणे विकसित करण्यात येत आहेत. या प्रकल्पाद्वारे देशांतर्गत उपलब्ध असलेल्या कोळशाचे रुपांतर खत, खाणकाम, वस्त्रोद्योग आणि पॅकेजिंगसारख्या विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरल्या जाणा-या महत्त्वाच्या रसायनांमध्ये तसेच इंधनामध्ये केले जाईल. हा प्रकल्प पूर्णपणे विकसित झाल्यानंतर वर्षागणिक ५० लाख मेट्रिक टनांहून अधिक कोळशावर प्रक्रिया केली जाईल. या सोयीसुविधांमुळे हा प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक मोठा प्रकल्प ठरेल. संबंधित सरकारी संस्थांनी प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेले पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र दिले असून, कच्च्या मालाचा नियमित पुरवठा निश्चित करण्यासाठी या प्रकल्पाला एक कोळसा खाण देण्यात आली आहे.  
हा प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांत पूर्ण केला जाईल. पहिल्या टप्प्यात अमोनिया, अमोनियम नायट्रेड आणि मोनो इथिलीन ग्लायकॉल (एमईजी) आदी उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले जाईल. दुस-या टप्प्यात उत्पादन श्रेणीचा विस्तार केला जाईल. यात डीएमई (डाय मिथिल इथर), युरिया, शाश्वत विमान इंधन (एसएएफ) आणि इथेनॉलचा समावेश असेल. परिणामी, औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या देशांतर्गत कच्च्या मालाच्या उत्पादनाला मोठी चालना मिळेल. दोन्ही टप्प्यांकरिता एकूण २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल.
भारतात रसायने, खते आणि इंधन मोठ्या प्रमाणात आयात केली जातात. परदेशातून ही उत्पादने मोठ्या प्रमाणावर येत असल्याने देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यावर मोठा ताण येत आहे. चंद्रपूरातील या प्रकल्पाच्या उभारणीनंतर हा ताण कमी होईल. देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या कोळशाचे रुपांतर औद्योगिक उत्पादनांमध्ये केले जाईल. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. परकीय चलनाची बचत होईल. देशाची औद्योगिक स्वावलंबन क्षमता मजबूत होईल. 
या प्रकल्पाच्या भूमिपूजनच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले “चंद्रपूर येथे भारतातील पहिल्या हरित एकात्मिक कोळसा गॅसिफिकेशन आणि कार्बन कॅप्चर प्रकल्पाचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे. हा केवळ औद्योगिक प्रकल्प नसून, भारताने शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी मी न्यू इरा क्लीनकेट कंपनीच्या संपूर्ण टीमने मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या अथक परिश्रमांना शुभेच्छा देतो.”

न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशन्स प्रा. लि.चे अध्यक्ष मधुसूदन अग्रवाल म्हणाले,” भारताकडे कोळशाचे साठे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून इथल्या कोळसा संपत्तीचा जबाबदारीने वापर करुन देशांतर्गत औद्योगिक परिसंस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. भारतात रसायने, इंधने आणि खत मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. आम्ही अत्याधुनिक कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञान आणि कार्बन कॅप्चर सुविधांच्या माध्यमातून रसायने, इंधने आणि खतांच्या निर्मातीसाठी आवश्यक घटकांचे उत्पादन करणार आहोत. हा प्रकल्प भारताच्या उत्पादन क्षेत्राला स्वावलंबी करेल. शिवाय उत्सर्जित कार्बन उत्पादन कामांसाठी पुनर्वापराच्या माध्यमातून सर्कुलर कार्बन इकॉनॉमी निर्माण करेल. हा प्रकल्प भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षिततेला बळ देण्यास, औद्योगिक विकासाला गती देण्यास आणि अधिक स्वच्छ व शाश्वत तंत्रज्ञानाकडे होणा-या संक्रमणाला चालना देण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल.” असा आमचा विश्वास आहे. 
न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब दराडे म्हणाले,”हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक परिसंस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे देशांतर्गत अत्यावश्यक स्वरुपातील रसायने आणि इंधन उत्पादनाला चालना मिळेल. भूमिपूजन सोहळ्याद्वारे या संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामांना औपचारिक सुरवात झाली असून, पुढील काही वर्षांत हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित केला जाईल. प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर भारताचे आयातीमधून मिळणा-या रसायनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. विदर्भातील औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला महत्त्वपूर्ण चालना मिळेल.”
न्यू इरा क्लीनटेक सोल्यूशन्सची स्थापना महत्त्वकांक्षी आणि ठाम विचारसरणीतून झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कोळशाचे योग्यरित्या जबाबदारीने वापर केल्यास, अत्याधुनिक कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचे उत्पादन कार्यक्षम स्वरुपात रुपांतरित केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत होईल. देशात नवी आत्मनिर्भर औद्योगिक अर्थव्यवस्था उदयास येईल. कोळशाच्या संसाधनांचा शाश्वत, मूल्यवर्धित पद्धतीने वापर करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. यातूनच औद्योगिक विकासाला चालना देणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आरती मित्तल ही आज मनोरंजन विश्वातील एक उदयोन्मुख अभिनेत्री आहे

मुंबई। दिल्लीतील प्रतिभावान अभिनेत्री आरती मित्तल आपल्या मेहनतीने, शिस्तीने आणि प्रभावी अभिनयाने मनोरंजन विश्वात सातत्याने नवनवीन उंची गाठत आहे. अभिनयाप्रती तिची निष्ठा, प्रत्येक पात्राला सहजतेने जिवंत करण्याची तिची क्षमता आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याची तिची इच्छा, यांमुळे तिचे नाव उदयोन्मुख प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये निश्चितपणे गणले जाते. आरतीने आपल्या अभिनय कारकिर्दीचा पाया रंगभूमीवर घातला, जिथे तिने अभिनयातील बारकावे शिकले आणि आपल्या कलेला सतत अधिक निखारले. त्यानंतर तिने हरियाणवी आणि पंजाबी म्युझिक व्हिडिओंमधून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या एका पंजाबी गाण्याला एफएम रेडिओवर प्रचंड लोकप्रियता मिळाली, ज्यामुळे तिला सुरुवातीची ओळख मिळाली. तेव्हापासून तिने मॉडेलिंग, जाहिराती आणि अभिनय क्षेत्रात आपले स्थान सातत्याने निर्माण केले आहे. आरतीने 'विराग' या लघुपटातून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर ती 'अमृतजल' आणि 'हाऊस ऑफ प्लॉटर्स' यांसारख्या प्रतिष्ठित ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये दिसली. तिच्या एका आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मोहिमेचे पोस्टर...

बोरिवलीत स्काय-सिटी मॉलमध्ये 'क्रोमा' झाला दाखल

मुंबई महानगर क्षेत्रात क्रोमाची एकूण ५४ आणि संपूर्ण महाराष्ट्रात १०५ स्टोअर्स झाली मुंबई। टाटा ग्रुपच्या 'क्रोमा' या ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेल कंपनीने मुंबईतील बोरिवली येथील स्कायसिटी मॉलमध्ये आपले नवीन स्टोअर सुरू करून महाराष्ट्रातील आपल्या रिटेल विस्ताराला अधिक गती दिली आहे. या नवीन स्टोअरसह आता मुंबई महानगर क्षेत्रात क्रोमाची एकूण ५४ स्टोअर्स आणि संपूर्ण महाराष्ट्रात १०५ स्टोअर्स झाली आहेत. मुंबईतील ग्राहकांना उत्कृष्ट ओम्नी-चॅनेल शॉपिंगचा अनुभव देणे आणि या अत्यंत महत्त्वाच्या बाजारपेठेत ब्रँडची पकड अधिक मजबूत करणे, हा या लॉन्चचा मुख्य उद्देश आहे. बोरिवली येथील स्कायसिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर (युनिट नंबर एफ-२७ आणि एफ-२८) असलेले हे प्रीमियम स्टोअर ७,०७५ स्क्वेअर फूटचे आहे. बोरिवली आणि आसपासच्या परिसरातील नागरिक येथे सहज पोहोचू शकतात. या स्टोअरमध्ये कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची विस्तृत रेंज उपलब्ध आहे. मोठी उपकरणे, स्मार्टफोन आणि घरगुती वापराची तंत्रज्ञान उपकरणे खरेदी करू शकतात. यासोबतच ग्राहकांसाठी आकर्षक लॉन्च ऑफर्सही उपलब्ध आहेत. मयंक संगानी, चीफ बिझनेस ...

डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटल मध्ये दुर्मिळ अशा दुहेरी नेत्र शस्त्रक्रियेनंतर नवी मुंबईतील 62 वर्षीय व्यक्तीला दृष्टिदान

• खोल कॉर्नियल स्कार असलेल्या परिपक्व मोतीबिंदूवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि पिनहोल प्युपिलोप्लास्टी या एकत्रित उपचारानंतर रुग्णाच्या दृष्टीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. • डॉ. अमर अग्रवाल यांनी विकसित केलेल्या पिनहोल प्युपिलोप्लास्टीमुळे, पात्र रुग्णांमध्ये कॉर्नियल ट्रान्सप्लांटची गरज कमी होण्यास मदत झाली आहे आणि त्याचबरोबर दृष्टीसाठी उत्कृष्ट परिणामही मिळाले आहेत. नवी मुंबई। नवी मुंबईतील वाशी येथील 62 वर्षीय रहिवासी सुभाष विष्णू चाचे यांना 'डॉ. अग्रवालस् आय हॉस्पिटल मध्ये एका दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या दुहेरी शस्त्रक्रियेनंतर दृष्टी परत मिळाली आहे. सुभाष यांच्या डाव्या डोळ्यात पूर्णपणे विकसित झालेला मोतीबिंदू आणि कॉर्नियावर (बुबुळाच्या बाह्य आवरणावरील) खोल व्रण होता; ही एक दुर्मिळ आणि आव्हानात्मक स्थिती होती, ज्यामुळे जवळपास त्यांची दृष्टी गेलेली होती. रुग्णालयाच्या वडाळा येथील केंद्रातील नेत्रतज्ज्ञांच्या पथकाने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसोबतच पिनहोल प्युपिलोप्लास्टी (PPP) ही प्रक्रिया करून त्यांची दृष्टी यशस्वीरित्या पूर्ववत केली आहे. सुभाष चाचे यांची दृष्टी अनेक ...