सीधे मुख्य सामग्री पर जाएं

‘कामत्स लेगसी’तर्फे ‘उगादी सद्या ’निमित्त विशेष मेजवानी

मुंबई। दक्षिण भारतीय नववर्षाचे औचित्य साधून ‘विक्रम कामत हॉस्पिटॅलिटी लिमिटेड’चा मुख्य ब्रँड असलेल्या ‘कामत्स लेगसी’तर्फे ‘उगादी सद्या’ या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ ते २३ मार्च २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या उत्सवात भारताच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा वारसा, चव आणि एकत्र येण्याचा आनंद अनुभवता येईल. दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘कामत्स लेगसी’ ‘उगादी’चा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे.

पोंगल, विशू आणि ओणम यांसारखे सण साजरे करणारा पहिला आणि एकमेव हॉस्पिटॅलिटी ब्रँड म्हणून ओळख असलेल्या ‘कामत्स लेगसी’ने आपल्या ‘उगादी सद्या’च्या माध्यमातून प्रादेशिक अस्सलता आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

उत्सवाचे खास आकर्षण म्हणून पाहुण्यांना पारंपरिक केळीच्या पानावर अस्सल दक्षिण भारतीय पद्धतीने जेवणाचा आनंद घेता येणार आहे. या मेन्यूमध्ये भात, सांबर, कैरीची कढी, पारंपरिक तोंडी लावणं तसेच गोड पोंगलसारख्या मिष्टान्नांचा समावेश असेल. याशिवाय आयुष्यातील विविध अनुभवांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सहा स्वादांचे मिश्रण असलेली ‘उगादी पचडी’ ही खास डिशही या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. ही खास मेजवानी प्रति व्यक्ती ६९९ रुपयांमध्ये उपलब्ध असून मालाड, नरिमन पॉइंट, वाशी आणि मीरा रोड येथील ‘कामत्स लेगसी’च्या आउटलेट्समध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे.

‘विक्रम कामत हॉस्पिटॅलिटी लिमिटेड’चे संस्थापक डॉ. विक्रम कामत म्हणाले, की ‘कामत्स लेगसी मध्ये आमचा असा विश्वास आहे, की जेवण हे केवळ अन्नापुरते मर्यादित नसून, ती एक भावना आहे जी लोकांना एकत्र आणते. पोंगलच्या यशानंतर आता उगादी च्या माध्यमातून आम्ही भारतीय सणांचा उत्साह आणि अस्सल चव लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत.’

‘उगादी’ हा शब्द ‘युग’ (काळ) आणि ‘आदी’ (सुरुवात) या दोन शब्दांपासून बनला आहे, ज्याचा अर्थ आहे ‘नवीन युगाची सुरुवात.’ हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, जो सृष्टीच्या निर्मितीचा आणि निसर्गाच्या पुनरुज्जीवनाचा काळ मानला जातो. हा दिवस केवळ नवीन वर्षाची सुरुवात नसून, आयुष्यातील सुख-दुःखाचा समतोल स्वीकारण्याचा संदेश देणारा सण आहे.

‘उगादी उत्सवम’ हा आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांत साजरा केल्या जाणाऱ्या परंपरांना दिलेला एक सन्मान आहे. या खास मेन्यूमध्ये दक्षिण भारतीय पाककला परंपरेतील जुन्या पाककृती आणि प्रादेशिक स्वादांचा सुरेख संगम पाहायला मिळेल.

उगादी’च्या या शुभ प्रसंगी एकूण सहा विशिष्ट चवींच्या पदार्थांचा नैवेद्य (उगादी पचडी) वाढला जातो; ज्यामध्ये कडू (कडूनिंबाची फुले): आयुष्यातील दुःखाचे प्रतीक,गोड (गूळ): आनंदाचे प्रतीक, तिखट (मिरची/मिरी): रागाचे प्रतीक,खारट (मीठ): भीतीचे प्रतीक,आंबट (चिंच): आव्हानांचे प्रतीक, तुरट (कैरी): आश्चर्याचे प्रतीक.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन, आयआयटी मुंबई यांच्यात एमसी²⁺ इग्नाइटच्या मुंबई सिटी कनेक्टदरम्यान ८ सप्टेंबर २०२६ रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार मुंबई। ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी एमसी²⁺ फाउंडेशन, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई आणि सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप (साइन), आयआयटी मुंबई यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.एमसी²⁺ इग्नाइट या ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख नवोन्मेष प्रवेगक उपक्रमांतर्गत ८ सप्टेंबर रोजी आयआयटी मुंबई येथे आयोजित मुंबई सिटी कनेक्ट कार्यक्रमादरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) आणि एमसी²⁺ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक व संशोधन संस्थांचे प्रतिनिधी, नवउद्योजक तसेच नवोन्मेष क्षेत्रातील विविध भागीदार सहभागी झाले. ऊर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान, उद्योगांसमोरील आव्हाने आणि नवोन्मेषाला गती देण्यासाठीच्या संधींवर यावेळी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे नेतृत्व ओएनजीसीचे अध्य...

५ वर्षांपासून कानात येणाऱ्या 'हृदयाच्या ठोक्यांसारख्या' आवाजापासून मुक्ती

जसलोक हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार  मुंबई। महाराष्ट्रातील जळगावमधील एका २५ वर्षीय महिलेला गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून कानात हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा "व्हूशिंग" असा आवाज येत होता. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे झालेल्या मिनिमली इनव्हेसिव्ह प्रक्रियेनंतर तिला या त्रासापासून पूर्णपणे आराम मिळाला आहे. या महिला रुग्णाच्या केसमधून निदर्शनास येते की, रक्तवाहिन्यांशी संबंधित मूळ कारण ओळखून अनेक वर्षांच्या अनिश्चिततेनंतर पल्साटाईल टिनिटसच्या रुग्णांवर प्रभावी उपचार केले जाऊ शकतात. या महिला रुग्णाला हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा सतत व्हूशिंग आवाज येत होता. वर्षानुवर्षे अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊनही आणि विविध चाचण्या व उपचार करूनही तिला कायमस्वरूपी आराम न मिळता हा त्रास सहन करावा लागत होता. अखेर तिने मुंबईत येऊन जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये उपचार घेण्याचा निर्णय घेतला. जसलोक हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. फाली पोन्चा, एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन डॉ. सुधीर आंबेकर आणि हेमॅटोलॉजिस्ट डॉ. समीर शाह यांच्या टीमने रुग्णाची एमआरआय व एमआरव्ही तपासणी...

अल्केमने हेअर ग्रोथ सिरम 'रेनोशिया एक्सो' लॉन्च केले

मुंबई। अल्केम लॅबोरेटरीज लि .ने रेनोशिया एक्सो™ लाँच करण्याची घोषणा केली, जे एका सर्वसमावेशक वैज्ञानिक दृष्टिकोनाद्वारे हेअर फॉलिकलचे (केसांच्या मुळांचे) आरोग्य आणि चेतना टिकवून ठेवण्यासाठी विकसित केलेले नेक्स्ट-जनरेशन हेअर रीजनरेशन उपचार तंत्रज्ञान आहे. केस गळती ही भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या त्वचारोगविषयक समस्यांपैकी एक म्हणून समोर आली आहे, ज्याचा परिणाम केवळ वाढत्या वयाच्या व्यक्तींवर नाही, तर अनुवंशिकता, जीवनशैलीतील बदल, पर्यावरणीय तणाव आणि आरोग्यशैलीतील बदलांमुळे वाढत्या तरुण वर्गावरही होत आहे. वर्षानुवर्षे उपचारांचे पर्याय वाढले असले तरी, केस गळती अनेक जैविक घटकांच्या एकत्रित प्रभावामुळे होते हे सर्वज्ञात आहे. तरीदेखील अनेक उपचार अद्याप केसांच्या वाढीच्या चक्राच्या केवळ मर्यादित घटकांवर भर देतात. या लाँचबाबत मत व्यक्त करत अल्केमचे मॅनेजिंग डायरेक्टर संदीप सिंग म्हणाले, “केसांच्या पुनरुज्जीवनाचे विज्ञान गेल्या दशकात लक्षणीयरित्या विकसित झाले आहे आणि त्याचप्रमाणे केस पातळ होण्यामागील कारणांची आपली समजही वाढली आहे. यावर फॉलिक्युलर मिनिअॅचरायझेशन, बदललेले सेल्यूलर ...