सीधे मुख्य सामग्री पर जाएं

अमोल पालेकर यांना 'मेटा'चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई। महिंद्रा समूहाने सुरु केलेला आणि टीमवर्क आर्ट्सद्वारे निर्मित महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (मेटा) चा २१ वा सोहळा १९ ते २५ मार्च २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात देशभरातील काही अतिशय उत्कृष्ट नाट्यकृती एकत्र सादर केल्या जातील.

भारतीय रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील असाधारण योगदानाबद्दल यावर्षी अमोल पालेकर यांना ‘मेटा जीवनगौरव पुरस्कार’ दिला जाणार आहे. अनेक दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी रंगभूमीला पर्यायी जागांपर्यंत नेऊन नवे प्रयोग केले आणि १९७० च्या दशकात ‘सामान्य माणसाची’ प्रतिमा साकारत हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. पुढे त्यांनी सामाजिक विषय हाताळणारे दिग्दर्शक म्हणूनही ठसा उमटवला.

२०२६ च्या या पर्वासाठी मेटाकडे विक्रमी संख्येने तब्बल ४२२ प्रवेशिका आल्या आहेत. मेटाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. यामध्ये २० हून अधिक भारतीय राज्ये, १०० हून अधिक शहरे आणि ६० भाषा व बोलीभाषांमधील कलाकृतींचा समावेश आहे. मेटा सेक्रेटरिएटने यामधून १० सर्वोत्कृष्ट कलाकृतींची निवड केली आहे. आठवडाभर चालणार असलेल्या या महोत्सवात १३ स्पर्धात्मक श्रेणींमध्ये या १० कलाकृती सादर केल्या जातील. 

निवडलेल्या नाटकांचे प्रयोग कमानी ऑडिटोरियम आणि श्री राम सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे दररोज दोन सत्रांत होतील. महोत्सवाची सांगता २५ मार्च २०२६ रोजी कमानी ऑडिटोरियममध्ये होणाऱ्या ‘मेटा अवॉर्ड्स नाईट’ ने होईल. यावर्षीची नाटके पौराणिक कथा, लिंगभाव, ओळख, राजकारण आणि सामाजिक परिवर्तन यांसारख्या विषयांवर आधारित असून ती भारतातील विविध राज्ये व भाषांचे प्रतिनिधित्व करतात.

२०२६ च्या 'मेटा' परीक्षकांमध्ये ख्यातनाम नाट्यदिग्दर्शिका अमल अल्लाना; नाट्यदिग्दर्शिका आणि शिक्षणतज्ञ अनुराधा कपूर; गाजलेले रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते रजित कपूर; सुप्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश आळेकर; आणि ज्येष्ठ अभिनेत्री, गायिका आणि नाट्यकर्मी इला अरुण यांसारख्या भारतीय रंगभूमीवरील काही अतिशय प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे:

देशभरातून आलेल्या प्रवेशिकांचे परीक्षण करून दीपा गेहलोत, जिनो जोसेफ, केवल अरोरा, प्रा. सत्यव्रत राऊत आणि स्वरूपा घोष यांच्या प्रतिष्ठित समितीने निवड प्रक्रिया पूर्ण केली.

महिंद्रा समूहाचे कल्चरल आउटरिच विभागाचे उपाध्यक्ष आणि प्रमुख जय शाह म्हणाले की, ‘मेटा’ हा कल्पकता आणि रंगभूमीच्या शक्तीचा उत्सव असून यावर्षीच्या विक्रमी प्रवेशिका समकालीन भारतीय रंगभूमीतील वैविध्य आणि चैतन्य दर्शवतात. हे व्यासपीठ कलाकारांना पाठबळ देत प्रेक्षकांना संवाद आणि विचारांना प्रवृत्त करणाऱ्या कथा अनुभवण्याची संधी देते.

टीमवर्क आर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक संजॉय के. रॉय म्हणाले की, ‘मेटा’ दरवर्षी भारतभरातील कथा आणि नाट्यपरंपरा एकत्र आणतो. २०२६ साठी निवडलेल्या १० कलाकृती कल्पकता आणि प्रयोगशीलतेचे उत्कृष्ट उदाहरण असून त्या दिल्लीतील प्रेक्षकांसाठी सांस्कृतिक वैविध्याचा उत्सव ठरतील.

महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्सचे (मेटा) फेस्टिवल प्रोड्युसर सूरज ढींगरा म्हणाले की, ‘मेटा’ दरवर्षी प्रेक्षकांना भारतीय रंगभूमीचे वैविध्य आणि व्यापकता एका शहरात अनुभवण्याची संधी देतो. यावर्षी निवडलेली नाटके देशभरातील कथाकथनाच्या शैली आणि नाट्यपरंपरांची समृद्ध झलक सादर करतात.

‘मेटा’ २००६ मध्ये सुरू झाले असून आज ते भारतीय रंगभूमीवरील तंत्र, कौशल्य आणि नाविन्याचा गौरव करणारे एक प्रतिष्ठित व्यासपीठ मानले जाते, जे विविध भाषा व संस्कृतीतील कलाकारांना संधी देते.

२१ व्या ‘मेटा’मध्ये जीवनगौरव पुरस्कारासह एकूण १४ श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार असून त्यात सर्वोत्तम निर्मिती, दिग्दर्शक, नेपथ्य, प्रकाश, ध्वनी-संगीत, वेशभूषा, अभिनेता-अभिनेत्री, सहाय्यक भूमिका, मूळ संहिता, एन्सेंबल आणि नृत्यदिग्दर्शक अशा श्रेणींचा समावेश आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार

एमसी²⁺ फाउंडेशन, आयआयटी मुंबई आणि साइन, आयआयटी मुंबई यांच्यात एमसी²⁺ इग्नाइटच्या मुंबई सिटी कनेक्टदरम्यान ८ सप्टेंबर २०२६ रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार मुंबई। ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी एमसी²⁺ फाउंडेशन, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई आणि सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप (साइन), आयआयटी मुंबई यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.एमसी²⁺ इग्नाइट या ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख नवोन्मेष प्रवेगक उपक्रमांतर्गत ८ सप्टेंबर रोजी आयआयटी मुंबई येथे आयोजित मुंबई सिटी कनेक्ट कार्यक्रमादरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) आणि एमसी²⁺ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक व संशोधन संस्थांचे प्रतिनिधी, नवउद्योजक तसेच नवोन्मेष क्षेत्रातील विविध भागीदार सहभागी झाले. ऊर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान, उद्योगांसमोरील आव्हाने आणि नवोन्मेषाला गती देण्यासाठीच्या संधींवर यावेळी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे नेतृत्व ओएनजीसीचे अध्य...

वर्गाबाहेरील साक्षरता: माहिती असलेला शेतकरी म्हणजे सक्षम शेतकरी

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त खावडा फेज IV-Cचा संदेश — माहितीपूर्ण समुदायच उभारतात विकासाचा मजबूत पाया माहितीच्या बळावर शेतकरी सशक्त; वर्गाबाहेरील साक्षरतेचा नवा अर्थ जमिनीचे कागदपत्र असोत वा नुकसानभरपाईची प्रक्रिया; योग्य माहिती शेतकऱ्यांना अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास सक्षम करते पालघर: साक्षरता म्हटले की डोळ्यासमोर येते ती शाळा, पुस्तक आणि वाचन-लेखनाची दुनिया. मात्र आजच्या काळात साक्षरतेचा अर्थ त्यापलीकडे गेला आहे. आपल्या हक्कांची माहिती असणे, आवश्यक कागदपत्रे समजून घेणे, सरकारी प्रक्रिया जाणून घेणे आणि अफवा व तथ्य यातील फरक ओळखणे, हीदेखील साक्षरतेचीच एक महत्त्वाची बाजू आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत ही माहिती त्यांच्या जमिनीशी आणि उपजीविकेशी थेट जोडलेली असते. जमिनीच्या नोंदी समजून घेणारा, मालकी हक्काबाबत जागरूक असणारा, नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती असणारा आणि आपल्या हक्कांची जाणीव असलेला शेतकरी अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो. याच विचारातून खावडा 4C पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडने समुदाय संवादामध्ये माहिती आणि जागरूकतेला महत्त्व दिले आहे. आंतररा...

मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्सने सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंह सोखी यांची इन्व्हेस्टर आणि ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती

मुंबई: नवी मुंबईस्थित एफएमसीजी कंपनी मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, भारतातील प्रसिद्ध शेफ, पाककला तज्ज्ञ आणि रेस्टॉरेंटर शेफ हरपाल सिंह सोखी हे कंपनीसोबत इन्व्हेस्टर आणि ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून जोडले गेले आहेत. ते कंपनीच्या प्रमुख ब्रँड इंची (Inchi)चे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही काम पाहणार आहेत. 2017 मध्ये स्थापन झालेल्या आणि निखिल भारती, आर. पी. चटर्जी आणि मनीष पार्डीवाला यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या इंचीने अल्पावधीतच इंडो-चायनीज सेगमेंटमध्ये लोकप्रिय घरगुती ब्रँड म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. ब्रँडकडे 100 हून अधिक उत्पादनांचा विस्तृत पोर्टफोलिओ आहे. यामध्ये शेजवान डिप आणि स्प्रेड्स, नूडल्स, सॉसेस, गॉरमे आणि इन्स्टंट सूप्स तसेच खास कुकिंग मसाल्यांचा समावेश आहे. या उत्पादनांमुळे घरच्या घरी रेस्टॉरंटसारख्या इंडो-चायनीज पदार्थांची चव सहज अनुभवता येते. या धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करताना मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर निखिल भारती म्हणाले, “उत्पादनांची मोठी आणि ग्राहकांना आवडणारी...